अनेक बॉलीवूड चित्रपटात बॅकग्राउंडला दिसणारा अन अनेक इमोशनल सिन्स मूकपणे अनुभवणाऱ्या मुंबईस्थित बांद्रा वरळी सी लिंकला तयार करताना इतकी तार लागली आहे की ती जर एकमेकाना जोडली तर ती अख्या पृथ्वीला वेढा घालू शकेल.

शेषाद्री श्रीनिवास नावाच्या इंजिनिअरनी डिझाईन केलेला हा 5.6 कि.मी. पूल तयार करायला जरी 2,57,00,000 इतके मनुष्य तास लागले तरी पूर्वी ज्या प्रवासाला एक तास लागायचा तो प्रवास 10 मिनिटात पूर्ण करून देण्याची किमया करून सी लिंकने वेळेचा अपव्यय वाचवलाच.

दररोज 37500 वाहने ज्या सी लिंकला पार करू शकतात त्या पूलाचे वजन 56,000 आफ्रिकन हत्तींएव्हडे होईल. लिंकमध्ये फक्त स्टीलच्या ताराच नव्हे तर 90,000 टन सिमेंटचाही वापर झाला आहे. आठ लेन्सचा हा पूल बनवण्यात फक्त भारतीयच नव्हे तर इतर 10 देशाच्या कंपन्यानी योगदान दिले आहे. एखाद्या 43 माजली इमारती एव्हडी 126 मित्र उंची लाभल्यामुळे अनेक चित्रपटात तो फ्रेममध्ये डोकावतो. एखाद्या शुटींग बघायला आलेल्या अवखळ मुलासारखा…

712 total views, 2 views today