गिनीज बुकमध्ये आपले नाव दर्ज करण्यासाठी लोक बऱ्याच खटपटी करतात. अजब विलक्षण असे रेकॉर्डस असलेल्या जागतिक रेकॉर्डसमधील ’स्मार्ट दोस्त’ने जमा केलेली यादी.

१) भोपळ्यासारखा भोपळा

एखाद्या जाड्याला आपण ए भोपळ्या म्हणून चिडवतो. मग जाड्या भोपळ्याला काय चिडवायचे असो.विकसिनशिल गावातील हा १८१० पौंडाचा भोपळा ऑफीसिली सर्वांत जाडा भोपळा म्हणून निवडला गेला. न्यूऑर्कमध्ये अनेक आठवडे प्रेक्षकांना खेचणारा हा नंतर प्रेक्षकांच्या पोटात विसावला.

२) टी शर्टचा थर

क्रुणोस्लाव नावाच्या एका गृहस्थाने २२ मे २०१० दिवशी एक नव्हे दोन नव्हे तब्बल २४५ ही शर्टस स्वत:च्या अंगावर चढवण्याचा पराक्रम केला. केवळ टी शर्टचे वजन ६८ किलो होते. परंतु क्रोएशिया देशाचा हा पठ्या घाबरला नाही.

३) लांब कान्या कुत्रा

इलीनॉइस ठिकाणचा ब्लडहाऊंड जातीच्या या कुत्र्याचे कान जगात सर्वांत लांबूळके ठरले. गम्मत म्हणजे उजवा कान १३.७५ इंच व डावा कान १३.५ इंच. या कुत्र्याचे नाव टायगर. टायगर तो कुत्तेका नाम होता है |

४) घेरदार शिंगे

१९९५ साली एक अनोखा रेकॉर्ड होल्डर जगासमोर आला. तोही प्रचंड घेरदार शिंगासहीत. लर्च नावाच्या या बैलोबाची शिंगे ३७.५ इंच घेराची होती.

५) रेकॉर्ड शारीरिक टोच

कान, नाक, टोचून घेणारी माणसे आपण पाहतो. टोचून घेताना किती वेदना होत असतील हे ही आपण जाणतो. परंतु ख्रिस नावाच्या या अमेरिकन बहाद्दराने केवळ सहा तास पंधरा मिनिटात हजोरा वेळा टोचून घेतले. किती माहित आहे. बरोब्बर ३१०० टोचण्या.

513 total views, 1 views today