फेसबुक अॅप वापरणाऱ्या काही लोकांना नुकताच कंपनीने एक सुखद धक्का दिला आहे. त्यांच्या फेसबुकवर चक्क व्हॅाट्सअॅप चे बटन दिसू लागले. हे असे का केले हे अजूनतरी स्पस्थ झाले नाही परंतु फेसबुक व व्हॅाट्सअॅप दोन्ही एकदम वापरता येवू शकेल असे संकेत मिळत आहेत. सोशल मीडियावर वावरणाऱ्या तरुणाईसाठी ही एक खूषखबर आहे. आता फेसबुकवरील अपडेट बघता बघता तुम्ही व्हॅाट्सअॅपवरील मेसेजसुद्धा वाचू शकणार आहेत.

फेसबुकने त्यांच्या अॅपवर एक व्हॅाट्सअॅप बटनचा पर्याय दिला आहे. त्या व्हॅाट्सअॅपच्या बटनावर टॅप करताच थेट व्हॅाट्सअॅप सुरु होणार आहे. सध्या फेसबुक काही देशांमध्ये या बटणाची चाचणी करत आहे. युजर्सच्या प्रतिसादानंतरच फेसबुक ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणार आहे.

फेसबुकने 2014 साली व्हॅाट्सअॅपचे सर्व आधिकार खरेदी केले होते. 19 बिलियन डॉलर्स म्हणजे तत्कालीन सुमारे एक लाख चौदा हजार कोटी रुपयांना फेसबुकने ही खरेदी केली. (अबब!) म्हणूनच व्हॅट्सअॅपचे युजर्स वाढावेत म्हणून फेसबुकने ही शक्कल लढवली आहे असे समजते.

अमेरिकेतील प्रसिद्ध संकेतस्थळ असलेल्या ‘द नेक्स्ट’ने याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. कंपनीने फेसबुक फीडमध्ये एक नवीन व्हॅाट्सअॅप बटण दिले आहे, सध्यातरी हे शॅार्टकट बटण काही अॅड्रॉइड फेसबुक अॅपच्या युजर्सच्या फोन मध्ये आहे. तुम्ही जर तुमची भाषा “डॅनिश” अशी सिलेक्ट केले तरच हे बटन सध्या दिसते. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांमध्ये असे ही काही नागरिक आहेत जे फक्त फेसबुक व अन्य सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करतात. म्हणजे व्हॅाट्सअॅप वापरत नाहीत. त्यामुळे या लोकांमध्ये व्हॅाट्सअॅपचा प्रसार करण्यासाठी या विशेष बटणाची निर्मिती केली आहे.

मात्र व्हॅाट्सअॅप अकाउंट नसणाऱ्या युजर्सने त्या बटणावर टॅप केल्यावर काय होईल याबात अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. कदाचित व्हॅाट्सअॅप अकाउंट नसणाऱ्या युजर्सने बटणावर टॅप केल्यास गुगल प्ले स्टोर उघडून तेथून युजर्स व्हॅट्सअॅप डाउनलोड करु शकतात.

WhatsApp button into Facebook, facebook, WhatsApp

नवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.

340 total views, 1 views today