व्हेज चीज बर्गर खाता खाता करीना कॅटरीनाच्या फिगरची चवीने चर्चा करणारे करणाऱ्या खाद्यप्रेमी मंडळीना बऱ्याचदा हे स्टार्स आपली फिगर मेंटेन कशी ठेवतात असा प्रश्न पडत असतो. कपड्याचे शॉपिंग करताना चेंजिंग रूममध्ये कपडे पोटावर फारच टाईट होतात हे पाहून आपण कधीच फिगरमध्ये येणार नाहीका अशी शंकाही अनेकाना पडत असते. परंतु असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी आपली प्रमाणाबाहेर असलेली शरीरयष्टी परफेक्ट शेपमध्ये आणली आहे हे आपल्याला माहित असले तर आपणसुद्धा ते करू शकतो हे कळेल म्हणून स्मार्टदोस्तने वजन कमी केलेल्या स्टार्सची यादी तयार केली आहे. तर चला शेप मध्ये येवूया.

1. कॅटरिना कैफ :

शिलाकी जवानी या गाण्यातील ही चवळीची शेंग एकेकाळी तितकी सडसडीत नव्हती. हा! एकदम ढब्बू ढब्बू नसली तरी लाखो दिलोंकी धडकन कॅटरिना बऱ्यापैकी हेल्दी होती हे चित्रात दिसतेच आहे. तरी एखाद्या बाहुलीसारखी फिगर होण्यासाठी कॅटरिनाने प्रमाणात कष्ट केलेत हे सत्य. योगा अन अॅब एक्झरसायझेस त्याचबरोबर जॉगिंग व पोहणे रेग्युलरली करणारी ही तारका आपल्या खाण्याबद्दल तितकीच सजग आहे. “ईट राईट फूड अॅट राईट टाईम” असे सांगताना ती भरपूर पाणी प्या हे सांगायला विसरत नाही. फलाहार तितकाच महत्वाचा हे ती ठासून सांगते. (म्हणूनच कदाचित ती जाहिरातीत आंबे खाताना बऱ्याचवेळा दिसते वाटते.)

2. अदनान सामी :

हल्ली जास्त चर्चेत नसतानासूद्धा आपल्या यादीत अदनान आहे त्याचे कारण म्हणजे त्याने केलेला चमत्कार. एखाद्याचे वजन 130 किलो असते व त्याने ते कमी केले तर आपण फार चर्चा करतो. परंतु या पठ्याने चक्क 130 किलो वजनच कमी केले. म्हणजे त्याचे आधीचे वजन किती असेल याचा विचारच करायला नको. एखाद्या फुग्यासारख्या असणाऱ्या अदनानला विमानात खास सीटवर बसायला लागायचे. त्याच्या आकाराची खुर्ची मिळणे अशक्यच होते. केवळ पाच पायऱ्या सलग चढणे अदनानला दमवायचे. पण आज तो टेनिस खेळू शकतो. त्याच्या या चमत्काराचे रहस्य प्रमाणात व डायेटीशीयननीच सांगितलेले खाणे.

3. करीना कपूर :

एकेकाळची एक फॅटी टीनएजर करीनाचे एका झेरो साईज ग्लॅमरस हिरॉइनमध्ये रुपांतर हे तिच्या कष्टाचे व स्वतःवरील कंट्रोलचे फळ आहे. कुणी झिरो साईज व्हावे असे स्मार्टदोस्तचे अजिबात मत नाही. परंतु तुम्ही जर कमिटेड असाल तर वजन कमी करणे शक्य आहे हे कळावे म्हणून करीनाचे उदाहरण. हेल्दी खाणे ज्यामध्ये डाळ, पालेभाजी, प्रोटीन व कॅर्बोहायड्रेड याचा बॅलंस असलेले खाणे असा न्युट्रीशियनने ठरवून दिलेला डायेट व त्याच बरोबर योग, सूर्यनमस्कार असा व्यायाम हे करीनाच्या फिगारचे रहस्य आहे असे दिसते. झिरो कार्ब म्हणजे कार्बोहायड्रेट्स नसलेले खाणे चुकीचे आहे हे तिचे मत. म्हणजे खाण्यात सर्व पदार्थ पण प्रमाणात असावेत असेही ती म्हणते.

  4. समीरा रेड्डी :

अगडबंब म्हणता येईल असा 105 किलोंचा देह असणारी ही समीरा नंतर स्लिम अन सेक्सी होईल असे कोणाला स्वप्नातसुद्धा वाटले नसेल. खाण्याची अत्यंत आवड असणाऱ्या समीराने दिसेल ते खाण्यापेक्षा हेल्दी व “प्रमाणात” खाणे सुरु केले. त्याच बरोबर बॉडी फीट कारण्यासाठी “प्रमाणात” व्यायाम (एक्झरसाइज) सुरु केला. फळ तुम्हाला दिसतेच आहे. इथे प्रमाणात हा शब्द तिने वापरला आहे कारण कोणतीही गोष्ट मग खाणे असो वा व्यायाम अतिप्रमाणात केला तर चुकीचा परिणाम होऊ शकतो असे तिचे म्हणणे. जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका असेही ती म्हणते. फिटनेस एका रात्रीत होत नाही तर त्याला पेशंस पाहिजे व कष्टाची जोड तर हवीच असे म्हणणारी समीरा वजनाची काळजी करणार्याना हुरूप देईल हे नक्की.

5. अर्जुन कपूर :

कपूर खानदानातील हा चिराग. चुलत बहिण सोनम कपूर प्रमाणेच हा ही थोडा जास्तच हेल्दी होता. म्हणजे फक्त 140 किलोचा. बोनी कपूरच्या या चिरंजीवाला बॉलीवूडमध्ये यायचे नव्हते म्हणे. परंतू ईश्कजादे चित्रपटानंतर तो अनेक तरूणीच्या दिल की धडकन बनला. या ओव्हरवेट मुलाचे पिळदार शरीरयष्टी असणाऱ्या हिरोमध्ये रुपांतर होण्यामागे सल्लुमियाचे योगदान आहे हे अनेकांना माहित नाही. सलमानने अर्जुनसाठी खास मेहनत घेतलीय. सलमानने अर्जुनसाठी वर्कआउट प्लॅन तर केलाच परंतु त्याला आपला जिमपार्टनर करून घेतला. नंतर दोन वर्षे जिम व डायटवर कष्ट केल्यावरच आजका अर्जुन आपल्याला दिसला. खाण्यामध्ये जंक फूड नको व जास्त स्वीट्स नकोत असे अर्जुनचे मत. “शो स्वीट”

740 total views, 1 views today