आपण राहतो ती पृथ्वी सौरमालेचा एक भाग. या सौरमाले सारख्या लाखो सौरमाला एका विश्वात सामावलेल्या. हजारो लाखो कोटी मैल दूर या सगळया तारे तारकांच्याबघ्दल व एकंदरीत विश्वाबध्दल ङ्गार थोडी माहिती मानवाला आहे. कांही गोष्टी फारच वेगळया आहेत. स्मार्ट दोस्तने जमा केलेली विश्वाच्या ५ गोष्टींची माहिती

 

१. चंद्राचा वास गनपावडर सारखा

अपोलो यानातून चंद्रावर उतरलेल्या अंतराळविरांनी चंद्रावरील माती अत्यंत मुलायम पण वास मात्र गनपावडर सारखा आहे असे सांगितले. दिवाळीमध्ये फटाके उडवल्यावर नंतर येणा-या वासासारखे.

२. हि-यांचा तारा

मानवाला हि-याबद्दल फार आकर्षण. पेपरवेट एवढा हिरा शेकडो कोटी रुपयांना विकत घेतला जातो. परंतु त्यापेक्षा मोठा हिरा विकत घेण्याचे कोणी धाडस करेल असे वाटत नाही. परंतु २००४ साली संशोधकांना एक मोठा हिरा सापडला. मोठा म्हणजे ४००० कि.मी.लांबीचा, अब्जावधी कॅरेटचा. हिरा म्हणजे पृथ्वीपासून ५० प्रकाशवर्षे दूर असणारा एक ताराच आहे.

३. व्हिनसचा दिवस त्याच्या वर्षापेक्षा मोठा

पृथ्वी स्वतःभोवती २४ तासात फिरते व सूर्याभोवती ३६५ दिवसात चक्कर मारते. परंतु व्हिनस स्वतःभोवती इतका हळू फिरतो की त्याची सूर्याची चक्कर आधी होते.म्हणजे व्हिनसचा एक दिवस संपायच्या आधी तो सूर्याभोवती फिरुन आलेला असतो. वर्षापेक्षा दिवसच मोठा.

४. अंगावर पडणारी सुर्यकिरणे ३०,००० वर्षे जुनी असतात

ब-याच जणांना माहित आहे की सूर्यकिरणांना पृथ्वीवर पोहचायला सुमारे ८ मिनीटे लागतात. पण त्या किरणांमधील उर्जा सूर्याच्या गर्भात तयार होवून सूर्याच्या पृष्ठभागावर यायलाच त्या उर्जेला ३०,००० वर्षे लागतात, म्हणजे आपल्या अंगावर पडणारी सूर्यकिरणे ३०,००० वर्षे आणि ८ मिनीटे आधी तयार झाली असे म्हणायला हरकत नाही.

५. तरंगणारा शनी

अनेकांना माहित असलेली ही गोष्ट. पण स्मार्टदोस्तला परत सांगावी वाटली म्हणून. एक मोठा ग्लास घ्या, शनि मावेल इतका. त्यामध्ये पाणी भरा, मग शनीला त्या पाण्यात सोडा. इतका मोठा शनी पाण्यात बुडत नाही तर पाण्यावर तरंगतो. अगदी प्लॅस्टीकचा पोकळ चेंडू पाण्यावर तरंगतो तसा. हे सगळे शनीची पाण्यापेक्षा कमी असणा-या घनतेमुळे.

832 total views, 1 views today