आपणा सर्वांना माहीत आहे की, आपण सर्वजण एक ना अनेक प्रकारचे टॅक्सेस भरतो. व्हॅट, सर्व्हीस टॅक्स, इनकमटॅक्स, रस्ता टॅक्स , पाणी टॅक्स एक ना अनेक…  म्हणजे टॅक्स गोळा करुन करुनच देश चालवला जातो. आणि देश चांगल्याप्रकारे चालवण्यासाठी वेगवेगळे टॅक्स शोधून काढण्याचे प्रयोग अनेक देशात केले जातात.  ’स्मार्टदोस्तने’ अशाच देशातील अफलातून करांविषयी माहिती गोळा केली आहे. वाचाल तर वाचाल.

१) पत्ते टॅक्स

सोळाव्या शतकात इंग्लडमध्ये जेव्हा प्रजेकडून कर गोळा करायचे ठरले तेव्हा पत्ते खेळायचे वेड इंग्रजांना भलतेच लागले होते. राजा पहिला जेम्सने लोकांच्या या वेडाचा फायदा घेत पत्ते खेळण्यावरच टॅक्स बसवला.कोणाला पत्ते खेळायचे असतील तर त्यांनी सरकारला कर द्यायचा व मगच पत्ते खेळायचे. आहे का नाही गम्मत? अगदी ६ ऑगस्ट १९६० पर्यंत हा ’पत्ते टॅक्स’ इंग्लड मध्ये गोळा केला जायचा.

२) ’’घाबरट टॅक्स’’

नाही नाही हा टॅक्स घाबरट नाही. परंतु एखाद्या खेळात व स्पर्धेत प्रतिस्पर्ध्याविरुध्द लढायचे आपण नाकारलात तर’’घाबरट टॅक्स’’ आपणावर बसू शकला असता. राजा पहिला हेन्री ने सतराव्या शतकात हा घाबरणार्या लोकांसाठी बसवलेला कर सुरवातीच्या काळात अगदी कमी होता. परंत काही काळाने तो ३०० पट जास्त झाला. म्हणजे घाबरणे फार महाग झाले. एक नव्हे दोन नव्हे तर तिनशे वर्षे हा टॅक्स लोकांकडून गोळा केला जायचा.

३) ’’टोपी टॅक्स’’

भारतात टोप्यांचा अगदी सूळसूळाट आहे. निवडणूकीच्या काळात तर अनेक रंगाच्या चित्रविचित्र टोप्या बाजारात मिळतात. अन् सर्वसामान्य व नेतेमंडळी आनंदाने टोपी डोक्यावर घालतात. परंतु टोपी घालण्यावरच कर लावला तर? छ्या काही तरीच. परंतु सन १७८४ ला इंग्रजांच्या देशात हॅट (त्याची टोपीच) डोक्यावर ठेवण्यासाठी ना वापरण्यासाठी चक्क पैसे मोजावे लागायचे. हा टोल टॅक्स सन १८११ पर्यात लागू होता. आहे का नाही टोपी घालण्याचा धंदा?

४) ’’खिडकी टॅक्स’’

’’ मेरे सामने वाले खिडकीमें एक चॉंद का तुकडा रहता है|’’ पडोसन चित्रपटातील ह्या गाण्यात खिडकी व त्यातून दिसणार्या सुंदर हिरॉईन बद्दल उल्लेख आहे. खरे तर खिडकीचा वापर आपण अनेक कारणासाठी करतो. घराची शोभा वाढवण्यासाठी ही खिडकी खूप मदत करते. म्हणून काय घराला खिडकी असेल तर टॅक्स भरायचा हा इंग्रज राजा तिसरा विल्यमने ’’सन १६९६ ला खिडकी असणार्या घरांवर २ शिलींग असा ’खिडकी टॅक्स’ लावला होता. आणि घराला दहा पेक्षा जास्त खिडक्या असल्या तर प्रत्येक जादा खिडकीवर एकस्ट्रा टॅक्स बसवला होता.

५) ’’दाढी टॅक्स’’

आणि आता हा शेवटचा ’’दाढी टॅक्स’’ सन १५३५ मध्ये इंग्लडचा राजा हेन्रीने प्रजेवर ’’दाढी टॅक्स’’ लावला. टॅक्सचे कॅलक्युलेशन कसे करायचे हे एक गूढच आहे. म्हणते गच्च दाडीवर जास्त टॅक्स का लांब दाढीवर जादा टॅक्स. असो एक मात्र नक्की की ’’दाढी टॅक्सची कल्पना इतर देशांतील राजांना पण आवडली असे दिसते. कारण रशियन राजा झारच्या काळात ’’दाढी टॅक्स’’ होता. हे सन १७०५ च्या नाण्यावरुन दिसून येते.
तर असे हे टॅक्स पुराण. दोस्तहो आता जेव्हा टॅक्स भराल तेंव्हा असेही अफलातून टॅक्स जगात होते हे लक्षात ठेवा.

535 total views, 1 views today