जगप्रवासाचा विचार केला तर कोणती ठिकाणे पहायची असा कदाचित प्रश्न पडेल. स्मार्ट दोस्तने हाच विचार करुन वास्तुशास्त्राचे अनोखे नमुने असणार्या ठिकाणाची यादी बनवली आहे. चला तर जावू प्रवासाला :

१) स्टोन हेंज – इंग्लंड

क्लिटशायर इंग्लंड मधील इ.स.पूर्व ३००० वर्षापूर्वी बांधलेली ही वास्तु. लंडनपासून जवळच असलेले हे ठिकाण तुम्हाला मानवजातीच्या विकासाची जाणीव करुन देते. प्रचंड मोठे आयताकृत दगड एका ठराविक व्यवस्थेमध्ये ठेवण्याचा पराक्रम तोही हजारो वर्षापूर्वी केला गेला. जरुर भेट द्या.

२) पिरॅमिडस – इजिप्त

सुमारे ८८ टनाचे एक एक दगड, एकावर एक ठेवून त्रिकोणी निमुळती होत जाणारी वास्तु. ज्यामध्ये आहेत अनेक खोल्या, गुहांसारखे रस्ते आणि मानवजातीला पडलेली कोडी. पिरॅमिडला वापरलेले दगड मिळू शकणारे एकही ठिकाण जवळपास नसताना बांधलेली ही वास्तु तुमच्या ट्रिपचा भाग जरुर असुदे.

३) पार्थेनॉन – ग्रिस

अथेनादेवीच्या सन्मानार्थ बांधलेली ही भली मोठी वास्तु. आजुबाजूला अनेक देव-देवतांच्या मुर्त्या ज्या कोठेही बघावयास मिळणार नाहीत. जागतिक किर्ती असणारे हे ग्रिसमधील ठिकाण पहावयास विसरु नका.

४) ग्रेट वॉल ऑफ चायना

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील हे चीनमधील ठिकाण. ख्रिस्तपूर्व सातव्या शतकात चीनच्या सैन्याने बांधलेली ही भिंत पूर्वेकडील मंगोलियन राजांच्यापासून बचावासाठी लढवलेली ही शक्कल नक्कीच अनोखी आणि भेट देण्यायोग्य.

५) ताजमहाल – भारत

आणि आता भारताची शान. कोटयावधी प्रवाशांची पसंती असणारा आग्य्राचा ताजमहाल. प्रेमाचे प्रतिक असणारा, वास्तुशास्त्राचा अनोखा नमुना ताजमहाल. जीवनात एकदातरी पहावयास विसरु नका.

702 total views, 1 views today