पूर्वी बॉलीवूडमध्ये “जुडवा” पिक्चर आला होता. परत त्याचा रिमेक “जुडवा” वरूण धवनचा.. असल्या चित्रपटात जुळ्या मुलांच्या बिछडण्याच्या अन परत भेटण्याच्या धमाल गमती दाखवल्या जातात. कधीकधी एखादी हिरॉईन चुकून जुळ्या हिरोकडे जाते.. कोण हिरो अन कोण जुळा हे कळाले नसल्याने ती जुळ्याच्या बाहुपाशात पडणार.. इतक्यात “मै यहा हू” असे म्हणत हिरो टपकतो. पिक्चरमधील असले खोटे खोटे प्रकार बघीतल्यावर खरोखरच्या “जुळ्यां” च्या आयुष्यात काय होत असेल हे एकदा कोणत्यातरी जुळ्याला विचारायचे असे जर तुमच्या मनात आले असेल अन जुळे कोठे मिळतात हा प्रश्न असेल तर स्मार्ट तुम्हाला आज जुळ्यांचा पत्ता सांगणार आहे. म्हणजे काय जुळे असे सहजासहजी भेटत नाहीत ना? म्हणून…

वाचा तर केरळमधील जुळ्यांच्या गावाच्या खरोखरच्या गोष्टी.

1. कोडीन्हीचे कोडे

कोडीन्ही – The Mysterious Village Of Twins नावाचे केरळमधील एक शांत खेडेगावाने साऱ्या जगात खळबळ माजवली आहे. त्याच्या एका परफॉर्मन्सने.. होय या गावातील बहुतेक सर्व कुटुंबाने जुळ्यांना जन्म दिला आहे. होय हे खरे आहे… मल्लपुरम जिल्ह्यातील या सुमारे 2000 कुटुंबाच्या छोट्याश्या कोडीन्हीमध्ये फिरताना लहान, मोठे, म्हातारे अश्या अनेक वयातील जुळे तुम्हाला नक्कीच गोंधळात टाकतात. या गावात एक नव्हे, दोन नव्हे तर 800 वर जुळे राहतात. अन या सर्वांचा जन्मही याच गावात. अनेक जुळ्यांचे पालकही त्यांच्या त्यांच्या घरातील जुळेच. अन त्या पालकांच्या घरातही जुळ्यांचा वारसा.. विशेष म्हणजे या गावातील मुलींनी लग्न होऊन दुसऱ्या गावात गेल्यावरही जुळ्यांना जन्म दिल्याचे अनेक दाखले.. म्हणूनच कोडीन्ही एक जुळ्यांचे मिस्टरी गाव.

2. जगाला खुळे करणारे कोडीन्ही जुळें

साऱ्या जगात जुळ्यांचे प्रमाण अत्यल्प असताना या छोट्या गावात हजारी 42 या रेटने जुळ्यांचा जन्म होतोय. हा सारा प्रकार गेल्या तीन पिढ्यांपासून सुरु आहे. 2012 पर्यंत दोन हजार घरांच्या या गावात 350 जुळ्या जोड्या होत्या. अन त्यानंतर दर वर्षी 15 जुळे जुळ्यांच्या या गावात जन्माला येत आहेत. आजमितीला या गावात 400 जोड्या जुळे म्हणजे 800 जुळे गुण्या गोविंदाने राहतात. अन हे फक्त कोडीन्हीच्या जनतेतच होत आहे. हे असे का याचे उत्तर कोणालाच देता आलेले नाही अन म्हणूनच साऱ्या जगाला कोडीन्हीने एक प्रकारे खुळेच केलं आहे असे म्हणता येईल.

3. जुळे जन्माला यायचे सिक्रेट

एकीकडे अनेकांना जन्मभर अपत्यहीन रहायची वेळ आली असताना God’s own country Kerala मधील या गावात “आनंदी आनंद गडे इकडे तिकडे जुळेच जुळे” असे म्हणायची वेळच कशी आली हे जाणून घ्यायला जगभरातील डॉक्टर्स तळ ठोकून आहेत.

जुळेच का जन्म घेतात या प्रश्नाचा पाठपुरावा घेणे तितके सोपे नाही. कारण Unsolved Mystery Of Kodinhi चा मामला नाजूक आहे अन बऱ्याच गोष्टी पर्सनल असल्यामुळे कपल्स माहिती देतीलच का ही शंकाच. परंतु जमेल तितकी माहिती अन पुरावे मिळवण्याचे काम भारत, जर्मनी, अन इंग्लंड या देशाचे संशोधक करत आहेत. मध्यंतरी त्यांनी जुळ्या लोकांची लाळ गोळा करून डी. एन. ए. टेस्टिंग केले. आजूनतरी गुंता सुटलेला नाही. आजूबाजूच्यां अनेक गावातील लोकांच्या मते कोडीन्हीतील महिला एकप्रकारचे फळ जास्त खातात त्याचे हे फल आहे असा समज. काही डॉक्टर्सच्या मते गावातील पाण्यात सापडणाऱ्या विशिष्ठ केमिकल्समुळे हे होतय. पण हे सारे तर्क.

कोठे पाणी मुरतंय अन काय केमिकल लोचा आहे हे God’s own country असल्यामुळे तिथला देवच सांगू शकेल.


4. जुळ्यांचा टाका

वाढता वाढता वाढे.. जुळ्यांचे प्रमाण वाढतच आहे. गाववाले तर आता गावाचे नाव बदलून “ट्वीन टाऊन” ठेवा असे म्हणू लागले आहेत. तर जुडव्याचा हा ठेवा जतन अन त्यांचे संवर्धन करण्यासाठी गावात “ट्वीन अॅन्ड किन असोसिएशन” (टाका) स्तापण करण्यात आली आहे. Twins and Kin Association (TAKA) पुल्लानी भास्करन याचे प्रेसिडेंट आहेत. त्यांनी स्वतः एका जुळ्याला जन्म दिला आहे. त्यामुळे जुळ्यांचे प्रॉब्लेम्स त्यांना माहित आहेत. 2017 च्या सुरुवातीला 220 जोड्यांनी संस्थेची मेंबरशिप घातली आहे. अन अनेकजण वाटेत आहेत.

“Twins and Kin Association (TAKA), the first such association of twins in India, to register and provide support for the twins and their families” असे संस्थेच्या पत्रकात म्हटले आहे.

5. मिस्टेकन आयडेन्टीटीची मजा

वेल, जुडव्यांच्या या गावातील जुळ्यांना हिंदी पिक्चरमध्ये दाखवतात तसले मिस्टेकन आयडेन्टीटीच्या प्रॉब्लेम्सना फेस करावे लागतेच. पण याची त्याना सवय झाली आहे. बाहेर गावाहून आलेल्या पर्यटकांचे आश्चर्याने मोठे झालेले डोळे बघून त्यांना सवय झाली आहे. बाहेरचेच काय पण गावातील लोकपण फसतात हे त्यांना माहित आहे. “टाका” संस्थेच्या भास्करन जेव्हा शिकत होते तेव्हा त्यांच्या शाळेत 40 जुळ्यांच्या जोड्या होत्या असे त्यांनी सांगितले. त्यामुळे कोण कौन है? खरा जोडीदार कौन है असले गुंतागुंतीचे प्रश्न अनेक वेळा पडतात हे सर्वाना माहित आहे. इनफॅक्ट हे जुळे बऱ्याच वेळा देवाने दिलेल्या रूपाचा फायदा घेवून मजा करतात. मग काय टीचर्सना गुमराह करणे, मित्रांची फसगत करणे असले उद्योग नेमिचेच.

कधी कधी लग्नानंतरही हा गोंधळ चालूच राहतो असे म्हणतात. पण तो फक्त काही दिवसच….

नवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.

715 total views, 1 views today