“इतिहास परत लिहावा लागेल”. बी.बी.सी. च्या टॉम होस्डेनची ही वाक्ये. 19 जानेवारी 2002 च्या BBC News मधील त्याचे हे “ancient city of Dwarka” बद्दलचे रिपोर्टिंग दोस्तहो तुम्हाला आश्चर्यचकित करेल. तो ज्याच्याबद्दल बोलत होता ती गोष्ट द्वारकानगरीची होती. कारणही तसेच होते. अरेबियन समुद्रात पाण्याखाली द्वारका नगरीच्या अवशेषाचा शोध लागला होता. अन त्याची बातमी टॉम जगाला देत होता. होय हीच ती 9000 वर्षापूर्वीची द्वारका नागरी जी एका बेटावर वसवली गेली होती अन कालांतराने समुद्राचे पाणी वाढल्यामुळे पाण्यात बुडाली होती. कृष्णाची ही नागरी खरोखरी अस्तित्वात होती या बद्दलच्या 5 बाबी पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल “इतिहास परत लिहावा लागेल”

1. योगायोगाने शोध :

डिसेंबर 2000 साली कच्छच्या खाडीत (Gulf of Cambay waters) प्रदूषणाचा अभ्यास करायला गेलेल्या भारताच्या “National Institute of Ocean Technology” (NIOT) च्या बोटीतील साईडस्कॅन सोनार यंत्राला पाण्यात सुमारे 120 फुटाखाली अनेक तासलेल्या स्वरूपातील शिळा दिसून आल्या. किनाऱ्यापासूनचे हे अंतर फार असल्यामुळे इतक्या आत पाण्यात हे काय आहे याचा शोध घेण्यासाठी सन 2001 ला परत एकदा मोहीम राबवण्यात आली अन सापडली एक प्रचंड मोठी भिंत. एखाद्या तटबंदीसारखी.

2. वय वर्षे 9000 :

NIOT च्या टिमने 2003-4 ला पाण्यात पुन्हा उत्खनन केले अन अनेक पुरातन अवशेष ज्यामध्ये मातीची भांडी, मानवी दात व हाडे, दगडी आकृत्या, 150 – 200 किलोचे दगडी नांगर किनाऱ्यावर आणण्यात आल्या. कार्बन डेटिंग C-14 या आधुनिक तंत्राने त्या अवशेषाचे अध्ययन लंडनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी व जर्मनीतील हॅनोव्हरला करण्यात आले. अन लक्षात आले की ते अवशेष थोडे थोडके नव्हे तर 7500 ते 9000 वर्षाचे आहेत. आर्कीयॉलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाने देखील हेच मत मांडले. मरीन आर्कीयॉलॉजी विभागाच्या डॉ. एस. आर. राव यांनीही हेच मत मांडले आहे.

3. मानवी इतिहास बदलणारी द्वारका :

दोस्तहो लक्षात येउद्या की जगातील सर्वात ओल्ड सिव्हिलायझेशन म्हणून ज्याची आपण ओळख करून देतो त्या चीनी, इजिप्शियन अन हरप्पण संस्कृतीला फक्त 4000 वर्षे झाली आहेत. म्हणजे समुद्रात किनाऱ्यापासून सुमारे 1.2 किलोमीटरवर पाण्याखाली जे सापडले होते ते खरोखरच इतिहास बदलून देणारे होते. कारण त्याचा अर्थ असा होतो की जगातील सर्वात ओल्ड संस्कृती भारतात द्वारकेला होती.

लेखक अन संशोधक ग्राहम हन्कोकने यावर भाष्य केले आहे. तो म्हणतो “सब बॉटम प्रोफायलिंग” तंत्राने पाहणी केली असता पाण्याखाली पक्क्या पायावर उभे असणारे दोन खांब दिसून येतात. त्याचे वय अन बनवण्याची पद्धत पाहता ही जगातील सर्वात आधीची संस्कृती, मेसोपोटामिया या माहितीतील जुन्या संस्कृतीपेक्षा जुनी आहे. त्यामुळे मानवी संस्कृतीचा इतिहास बदलण्याची वेळ आली आहे

4. विश्वकर्मा निर्मित द्वारका :

श्रीमद भगवतगीतेमध्ये (Srimad Bhagavatam) द्वारकेच्या निर्मितीचा उल्लेख आहे. कृष्ण जेव्हा मथुरेत राहत होता तेव्हा जरासंधाने मथुरेवर 17 वेळा हल्ला केला. प्रत्येकवेळा त्याची हार झाली. 18व्या युद्धावेळी कृष्णाने यादववंशा त्रास कमी करण्यासाठी राजधानी बदलण्याचा निर्णय घेतला अन समुद्रात बेट बांधून तेथे नवीन नागरी निर्माण करण्याचा आदेश महान वास्तुशास्त्रज्ञ विश्वकर्माना दिला. त्यानुसार 900 महालांची अन पाच मैल लांबीची व दोन मैल रुंदीची, चहुबाजूने संरक्षण भिंती असलेली नागरी उभी केली. जिथे फक्त बोटीने पोहचता येत होते. म्हणूनच नंतरच्या युद्धात द्वारकेवर विमानसदृश्य उडत्या वाहनांनी हल्ला झाला असा उल्लेख आही. “द्वार” म्हणजे दरवाजा अन “का” म्हणजे ब्रम्ह. Dwarka,,

5. द्वारकेचा सुनामी? :

अचानक समुद्राची पातळी भयंकर वाढली अन ही विलक्षण नागरी पाण्यात लुप्त झाली… अनेक संशोधकांच्या मते द्वारका नागरी लुप्त होण्यामागे 9000 वर्षामागे सौराष्ट्र किनाऱ्यावर आदळलेला सुनामी होता.

भागवत पुराणामध्येही (11.30.5) असाच काहीसा उल्लेख आहे. “ही भयाण शांतता (सुनामीपुर्वीची) मृत्यूचे चाहूल आहे, यादवांनी आता एक क्षणभारही येथे राहू नये” श्रीमद भगवतममध्ये 11व्या चरणात श्रीकृष्णाने दिलेला निरोप आहे. कृष्ण म्हणतात की माझ्या जाण्यानंतर द्वारकेला वाचवणारे कोणीही राह्बणार नाही अन समुद्र द्वारकेला कवटाळून घेणार. हे काहीसे सुनामी येण्याच्या संकेतासारखे वाटते…

दोस्तहो, द्वारका संशोधन पैश्याअभावी अजूनही पूर्ण झाले नाही. खरोखरच जगतील पहिली संस्कृती द्वारका होती का? सुनामीने तिला संपवले का? असे अनेक प्रश्न मनात आजही काहूर करून आहेत. 150 फुटी पाण्याखाली दडलेली द्वारका नगरी उत्तरे देणार अन भविष्यात इतिहास घडणार हे नक्की…

संदर्भ : Dwarka Mythical City Found Underwater. W. Yutani

नवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.

1,819 total views, 4 views today