परग्रहवासीय पृथ्वीवर आले होते का? हे एक न उलगडणारे कोडेच आहे. परंतु परग्रहावरुन आलेल्या उडत्या तबकड्या पाहिल्याचे अनेक पुरावे देणारी शेकडो माणसे पृथ्वीवर आहेत.अशीच पाच ठिकाणे जेथे उडत्या तबकड्या (UFO) आल्याची नोंद आहे. स्मार्ट दोस्तची ही यादी:

 

१) Black knight तबकडी

अमेरिकेच्या नासा संस्थेस दिसलेला हा उडता राजा (knight). नासा अंतराळवीरांनी पृथ्वीच्या भोवती उडणाऱ्या या विराचे छायाचित्र काढले. नासाच्या वेबसाईटवर अलिकडेपर्यंत ही माहिती होती.

२) लॉस एंजेलिस वरील युध्द

सन १९४२ साली अमेरिकन सैनिकांनी सुमारे चौदाशे विमानविरोधी तोफगोळे आकाशात एकाच दिशेने उडवले. कारण फक्त एकच त्या भागात आकाशामध्ये उडणारी एक तबकडी होती. एवढा सर्व मारा करुनसुध्दा त्या तबकडीला काही झाले नाही व ती नंतर सर्वादेखत पसार झाली. अमेरिकेने नंतर सारवासारव केली. परंतु विनाकारण एवढे तोफगोळे उडवण्याचे रहस्य अजुन रहस्यच आहे.

३) फोनिक्सचे दिवे

ऍरीझोना, अमेरिका येथील शांत काळोख्या रात्री आकाशात दिसलेले एका रांगेत असणारे दिवे. हजारो लोकांनी पाहिलेला, चित्रीत केलेला हा प्रसंग अमेरिका सरकारने मात्र फेटाळून लावला आहे.

४) ओहियो – पोलीसांचा UFO पाठलाग

सन १९६६ ला ओहियो प्रांतातील एक जबाबदार पोलीस अधिकाऱ्याला हवेत एक उडणारी वस्तु दिसली. अनोळख्या या वस्तुचा तब्बल ८६ मैल पाठलाग या बहाद्दर ऑफिसरने आपल्या कारमधून केला. परंतु त्या तबकडीचे छायाचित्र त्याला मिळाले नाही. तबकडी तर नाहीच नाही.

५) अपोलो IS – चंद्रावरील UFO

अमेरिकेने अपोलो IS हे चंद्रयान चंद्रावर उतरवल्यानंतर अंतराळविरांनी चंद्राची अनेक छायाचित्रे काढली. परंतु एका छायाचित्रात एक रहस्यमय तबकडी माऊंट हेडली टेकडी मागून वर येताना दिसत आहे. ती वस्तु काय होती व त्योच पुढे काय झाले हे रहस्य कधीही बाहेर आले नाही. परंतु एक मात्र सत्य. त्यानंतर अमेरिकेने पुन्हा कधीही चंद्रावर आपला माणूस उतरवला नाही.

654 total views, 1 views today