दोस्तहो, या समस्त पृथ्वीतलावर असे एखादे ठिकाण असेल का जेथे रस्त्यावर जाणाऱ्या मुलींची चेष्टा होत नसेल?, जेथे वंशाच्या दिव्यांना (सो कॉल्ड मुले) नव्हे तर कुटुंबातील मुलीना संप्पती वारश्याने मिळेल?, जेथे नवरी नवऱ्याला घटस्फोट देत असेल?, मुली नव्हे तर मुलांनी बुरखा घालायचे बंधन असेल?….

केवळ अशक्य… असे जर तुमचे उत्तर असेल तर दोस्तहो, तुम्ही चुकलात. कारण ट्वारेग नावाचा प्रदेश या भूतलावर आहे जेथे लाडकों की नाही तर लाडकी की सुनी जाती है. लेक माझी लाडाची, बेटी बचावो बेटी पढावो, स्त्री समानता असे नारे तर ऐकले, आता तसेच करणाऱ्या लोकांच्या 5 सत्य कथा बघूया…अगदी सत्य..

1. ये ट्वारेग ट्वारेग क्या है?

तर ट्वारेग (Tuareg) हा एक प्रदेश आहे जेथे याच नावाची जमात राहते. लिबिया, अल्जेरीया देशाच्या दक्षिणेस अन माली देशाच्या सीमेस लागून, सहारा वाळवंटात या ट्वारेग जमातीतील लोक समूहाने राहतात. इस्लामिक धर्माचा अनुनय करणाऱ्या या जगावेगळ्या प्रदेशाची लोकसंख्या वीस लाख आसपास आहे पण आसपासच्याच नव्हे तर आपल्या सारख्या दूर दूरच्या देशांच्या कोटी कोटी लोकांना कुतूहल वाटेल असे त्यांचे वागणे आहे. सहारा वाळवंटातील व्यापारावर यांचाच प्रामुख्याने कंट्रोल. खजूर, मीठ, केशर व गुलामांच्या व्यापारात त्यांचा सहभाग. त्यामुळे पैश्याकडून बऱ्यापैकी श्रीमंती. उत्तर आफ्रिका व आजूबाजूच्या भागामध्ये इस्लामचा प्रचार व प्रसार यांच्यामुळेच झाला अशी इतिहासात नोंद. असे हे धनाने सधन, मनानेही सधन आहेत हे जगाने मान्य केले आहे.

2. पुरुषांना बुरख्याची सक्ती :

ट्वारेगमध्ये जरी पुरुष प्रधान संस्कृती असली तरी स्त्रियांसाठी असलेले त्यांचे विचार अन नियम हे जगावेगळे आहेत. त्यतीलच बुरख्याबाद्द्लचा त्यांचा नियम. येथे पुरुषांना चक्क बुरखा घालूनच फिरावे लागते. कोणीतरी वाटेल की वाळवंटात हे गरजेचे आहे तर ते तसे नाही कारण कोणतीही ट्वारेग मुलगी, स्त्री तुम्हाला बुरख्यात दिसणार नाही. फोटोग्राफर हेन्रीटा बट्लर (Henrietta Butler) जो 2001 पासून ट्वारेगना फॉलो करतोय त्याने डेलीमेल पत्रकात लीहलेय की येथील मुलीना त्यांच्या सौंदर्याचा अभिमान आहे अन त्यामुळेच बुरख्याला त्यांचा “नो” आहे.

गम्मत म्हणजे याच बुरखाधारी ट्वारेग पुरुषांना “निळे पुरुष” असेही नाव पडले होते कारण “नीळ” मध्ये रंगवलेले बुरखे सतत घातल्यामुळे त्यांचे अंग निळ्या रंगात रंगले असायचे.

3. प्रेमात मुलींना पूर्ण फ्रिडम :

महिला सबलीकरण, इक्वल राईट्सचा जगभर पुकार चालू असताना, भारतात 33 टक्केतरी द्या अशी आळवणी होत असताना ट्वारेग मुली मात्र 100 टक्के फ्रिडम एन्जॉय करतात. अन तेही प्रेमासारख्या सेन्सिटिव्ह विषयात. ट्वारेग मुली लग्ना आधी कोणत्या, किती मुलांवर कधी अन कितीवेळा प्रेम करायचे हे स्वतः ठरवतात. त्यात कोणीही आडकाठी आणायची नाही हा नियम. त्याबद्दल त्याना गल्लीत अन गावात टोमणे मारायचे नाही हा नियम.

जे जे जगभरातील इतर बहुतांशी पुरुष मुलींबद्द्ल जो चांगला(?) विचार करतात तो विचार प्रत्यक्षात ट्वारेग मुली मुलांबरोबर वागताना आचरणात आणतात. त्यात त्याना संपूर्ण स्वतंत्र आहे… समजलेच असेल.

4. मुलींची घटस्फोटाची पार्टी :

व्हाट्सअपवर बायकोच्या त्रासांबद्दल ढिगाने जोक्स असतात. बायको दोन दिवसासाठी जरी माहेरी गेली तरी पार्टी करुया असे अनेक त्रस्त नवऱ्यांना जगभर वाटत असते. परंतु ट्वारेग प्रदेशात मात्र सर्वच उलटे आहे. येथे लग्न मोडले तर नवरीच पार्टी करते. इतकेच नव्हे तर तिचे घरवाले देखील तिच्या या पार्टीत सहभागी होतात. तिला परत नवीन आयुष्य जगायला मिळणार म्हणून. अन हो तलाक द्यायचा का नाही हा निर्णयही बायकोच घेवू शकते.

जगभर घटस्फोट मिळाल्यावर स्त्री नवऱ्याकडून पोटगीची, पैशाची मागणी करते, तिला तिच्या भविष्यातील खर्चाबद्दल काळजी असते. पण ट्वारेग मध्ये असे काही होत नाही. घटस्फोटामुळे स्त्रीचे पैसे, मालमत्तेकडून काही नुकसान होत नाही. उलट नवऱ्याच्या संपप्तीवर मुलीचाच हक्क राहतो.

इनफॅक्ट जगभर मुलांना जो दर्जा समाजात असतो तोच ट्वारेग मुलींना असतो. त्यामुळे आई वडिलांची संप्पतीदेखील मुलींनाच मिळते.

5. बहिणीची मुले वारसदार :

संपप्तीचे पूर्ण हकदार ट्वारेग लडकी असते हे तर बघितलेच. पण स्त्रीच्या मृत्यूनंतर तिच्या संप्पतीचा वारसदार हा तिचा नवरा वा मुलगा होत नाही तर तिच्या बहिणीकडे व बहिणीच्या मुलीकडे सारी संपप्ती जाते.

ह्या असल्या मुलींच्या बाजूने असलेल्या रूढी परंपरा असणाऱ्या ट्वारेगमध्ये स्त्रीप्रधान संस्कृती असेल असे आपणास वाटेल पण तसे नाही. सुरुवातीपासून हे असले निर्णय सिनिअर पुरुषच घेत आले आहेत. स्त्रीयां आपली मते मांडू शकतात पण पडद्यामागूनच. म्हणजे स्त्री सबलीकारणाचे निर्णय अन अंमलबजावणी पुरुषांनीच घेतले आहेत हे ट्वारेगचे आणखीन एक वैशिष्ठ.

तळ टीप :

दोस्तहो जगात विविध रूढी परंपरा असतात. त्यांची त्यांची वैशिष्ठ्ये असतात. इस्लामिक असूनसुद्धा ट्वारेगचीही स्वतःची जीवन जगण्याची स्वतंत्र कल्पना आहे. थोडीशी ऑड, हटके आहे अन याच हटकेपणामुळे ट्वारेग आता “इसीस” व “बोको हराम” या अतेरेकी संघटनांच्या हिट लिस्टवर आहे…कदाचित स्त्री स्वातंत्र्याची मोठी किंमत ट्वारेगला भोगावी लागेलही वा कदाचित जगही आपला विचार बदलेल अन ट्वारेगकडून काहीतरी शिकेल..कौन जाने आगे क्या होगा..

संदर्भ : डेलीमेल युके, विकीपेडिया.

769 total views, 1 views today