दोस्तहो जर कोणी तुम्हाला सांगितले की पुऱ्या भारतातील लोकांचे जे उत्पन्न आहे ते एका मंदिराच्या खजिन्यापेक्षा कमी आहे तर ते कदाचित तुम्हाला पटणार नाही. परंतू हे सत्य आहे. गिनीज बुकच्या मते केरळ व तामिळनाडूच्या बोर्डरवरील थिरुअनंतपुरममधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातल्या खजिन्याची किंमत एक ट्रीलीयान डॉलर्स पेक्षा जास्त आहे. आपल्या भारतातील प्रत्येक माणसाच्या उत्पन्नाची जर बेरीज केली तरी ती पद्मनाभस्वामी मंदिराच्या खजिन्यापेक्षा कमी असेल. मित्रहो अजब वाटेल पण एक लाख विस हजार कोटीच्या हा सारा खजिना हजारो वर्षे  जमिनीखाली पडून होता. जो कोणी खजिन्याच्या खोल्या उघडेल त्याचा विनाश होईल हा भयंकर शाप खजिन्यापासून लोकांना दूर ठेवत होता. वाचा तर जगातील सर्वात मोठ्या खजिन्याच्या या पाच गोष्टी.

1. वीस फुट जमिनीखाली विसावलेले सिक्रेट चेम्बर्स:

हजारो वर्षे भारतभर प्रसिध्द असलेले पद्मनाभ मंदीर इंग्रजांच्या काळात तसे प्रसिद्धीपासून दूरच गेले होते परंतु स्वातंत्र्यानंतर विसाव्या शतकाच्या अंतास लोकल लोकांमध्ये मंदिराच्या खजिन्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात गुप्त संप्पती आहे अशी शंका वांरवार व्यक्त होवू लागली. तत्कालीन देवस्थान समिती त्यांच्या या शंकेला उत्तर द्यायला टाळाटाळ करत असे. परंतु लोकाची शंका बळावायचे मुळ कारण ठरले ते 2001 सालीचा पुरातत्वखात्याचा जस्टीस सी एस राजन व काही पुजार्यांच्या मदतीने केलेला उद्योग. त्यांनी मंदिरातील शेकडो वर्षे बंद असलेल्या खोल्यांची मोजणी अन एक खोली उघडण्याचा प्रयोग केला. पहिली खोली उघडल्यावर त्या खोलीत सोने, हिरे, जवाहीर, माणिक मोती अस्ताव्यस्त पडले आहेत अन ती खोली या सर्व खजिन्याने खचाखच भरली आहे हे दिसले. जे काही पाहिले ते शब्दात सांगता येत नाही असे राजन म्हणतात. जमिनीखाली अश्या सहा बंद खोल्या त्यांना दिसल्या. त्याला त्यांनी चेम्बर “ए’ ते “ एफ’ नावे दिली. चेम्बर “बी” च्या प्रचंड मोठ्या दरवाजावरील तीन किल्ल्यांचे कुलूप कोणालाच उघडता आले नाही अन दरवाजावरील नागांच्या आकृत्या पाहून कुलूप तोडायचा विचार सोडून त्यांनी ती मोहीम रद्द केली. हे सारे गुपित कर्णोकर्णी पसरले अन त्यांमुळेच एके दिवशी टी. पी. सुंदरराजन नावाच्या भाविकाने खजिन्याची माहिती लोकाना कळावी म्हणून सरळ कोर्टाची पायरी चढली. अन जगासमोर हा अद्भुत नजारा आला.

2. पाचशे किलोचा सोन्याचा ढीग अन आठरा फुट लांबीची सोन्याची चेन :

जून 2011 ला सुप्रीम कोर्टाने पद्मनाभस्वामी मंदिराचा खजिना खोलायचा ऐतिहासिक निर्णय दिला. विनोद राय (सी. ए. जी.) यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या सात सदस्यांच्या समितीला मंदिराच्या संपत्तीची मोजणी करण्यासाठी खजिन्याच्या बंद खोल्या उघडायला सांगितल्यावर अन जे काही जगाला पहायला मिळाले त्याने सर्व जग हैराण झाले.

समितीला नवीन दोन चेम्बर्स दिसून आल्या. आधी माहित असलेल्या खजिन्याच्या सहा अन नंतर आढळून आलेल्या दोन उप खोल्या अश्या एकूण आठ खोल्यांपैकी फक्त सहा उघडण्यात आल्या. एकेक वस्तू मोजण्याचे काम सुरु झाल्यावर खजिन्याची किंमत एकलाख कोटी रुपयापेक्षा जास्त आहे हे सत्य समोर आले. असे काय होते या खजिन्यात?

खजिन्यात होती साडेतीन फुटाची शुध्द सोन्याची हिरेजडीत महाविष्णू मूर्ती, 18 फुट लांबीची सुवर्ण साखळी, भाविकांनी अर्पण केलेला 500 किलोपेक्षा जास्त सोन्याचा ढीग, 1200 “सर्पल्ली” आभूषणे, हिरेजडीत सोन्याच्या साखळ्या, 36 किलो वजनाची सोन्याची चादर, अलीबाबाच्या गुहेत कल्पना केल्या सारखी हिरे, मोती, दाग दागिने भरलेली मोठमोठी पिंपे, रोमन साम्राज्याच्या 800 किलोच्यावर हजारो मुद्रा (प्रत्येकी किंमत 2.5 कोटी रु.), सोन्याचे असंख्य नारळ, 16 फुट लांबीच्या महाविष्णूसाठी पूर्ण सोन्याचे मुकुट अशी अगणित संप्पती.. शेकडो वर्षे धूळ खात पडून असलेली.. काहीशी शापित..

चेम्बर “बी” आजून उघडण्यात आले नाही अन असे म्हणतात की याच चेंबरमध्ये सर्वात मोठा खजिना आहे.

3. शापित चेम्बर “बी” अन दोन विषारी कोब्रांचा पहारा :

श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या खजिन्याबद्दल अनेक अफवा आहेत. “बी” चेम्बरमध्ये अतिविषारी कोब्रा नाग पहारा देतात हा समज अनेकाना त्या गाभाऱ्यापासून दूर ठेवत आला आहे. जो कोणी त्या गाभाऱ्यात खजिना लुटण्याच्या बेताने शिरेल त्याला या नागांना सामना करावा लागेल अन त्या चोराला दर्द्नाक मृत्यू येईल हा शाप शेकडो वर्षे चोरांना खजिन्या पासून दूर ठेवत आला आहे. या शापित खोलीवरील दरवाजावरील कोरलेल्या नागांच्या आकृत्या तसेच दक्षिण द्वारावर रंगवलेले नरसिंहाचे भीतीदायक चित्रही जगाला या खाजीन्या पासून दूर ठेवत असेल. त्यातच ज्याने मंदिराविरुद्ध कोर्ट केस केली अन इतर खजिन्याच्या खोल्यांना उघडावे लागले त्या टी. पी. सुंदरराजनचा कोर्ट केसचा निकाल झाल्यावर अचानक मृत्यू झाला हे सत्य अनेकाना भय दाखवून गेले.

फार पूर्वी म्हणजे 1908 साली तत्कालीन राजाने पैश्याची चणचण भासली म्हणून “बी” चेम्बर उघडण्याचा प्रयत्न केला होता म्हणे परंतु चेम्बरमधील भयानक काळोख व अतिविषारी सापांचा सूळसूळाट अन एक गूढ कुबट दुर्गंध सहन न झाल्यामुळे चेम्बर परत बंद करण्यात आला तो कायमचाच… एक शापित चेंबर म्हणून.

(संदर्भ: त्रावणकोर: अ गाईडबुक फॉर व्हिजिटर्स, ऑक्सफर्ड प्रेस, 1933)

4. शेषशाही विष्णू मूर्तीचा अनोखा इतिहास :

श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील अनोख्या शेषशाही विष्णूच्या मूर्तीबद्दल अनेक नवल कथा आहेत. असे म्हणतात की एकदा दिवाकर मुनींकडे भगवान विष्णू लहान मुलाच्या स्वरूपात आले. गूढ वलय असलेल्या या लहान मुलाला मुनींनी त्यांच्या सोबत रहायची विनंती केली. मला त्रास द्यायचा नाही या अटीवर हा लहानगा रहायला लागला. पण मुनींची परीक्षा घ्यायाला तो सतत त्यांच्या खोड्या काढायला लागला. एके दिवशी मुनी रागावले अन भगवान दर्शन देवून विष्णू निघून गेले. रागावून गेलेल्या भगवान विष्णूना शोधायला दिवाकर अनवाणी प्रवास करू लागले अन काही दिवसांनी थिरुअनंतपूरमच्या जंगलात पोहचले. अचानक एक बांबू सारखे असणारे भले मोठे झाड त्यांच्या समोर आडवे झाले अन भगवान विष्णू शेषशाही स्वरूपात प्रकट झाले. नंतर त्यांनी लहान मूर्तीत प्रवेश केला अन त्या मुर्तीसभोवाताली सध्याचे मंदीर नंतर बांधण्यात आले.

5. संपूर्ण “माया” देवाच्या नावावर :

सतराव्या शतकात वयाच्या 23 व्या वर्षी राजा मार्तंड वर्माने त्रावणकोर राज्याची स्थापना केली. तो अन त्याचे वारस भगवान विष्णूच्या तर्फे राज्य चालवतील अन राज्याची सर्व संपत्ती ही श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील विष्णूच्या नावे केली जाईल अशी प्रतिज्ञा केली. अन तेव्हापासून मंदिरातील खाजीन्याच्या प्रचंड मोठ्या आकाराच्या सीलबंद खोल्यांमध्ये हिरे, माणके, सुवर्ण मुद्रा अन मुर्त्या अश्या अनमोल वस्तू ठेवण्यास सुरुवात झाली.

त्रावणकोरचा प्रदेश इतिहासात सोन्याच्या खाणीसाठी प्रसिध्द होता अन हजारो वर्षे त्या भागाचा युरोप अन इतर देशाशी असलेल्या व्यापारातून जमा झालेली अमाप माया (खजिन्यातील 800 किलो सोन्याची रोमन नाणी) अन अन मार्तंड वर्माने मिळवलेली संप्पती मंदिराची झाली. नंतरच्या काळात बहुतांशी दक्षिण भारतातून जमा झालेला सारा (टॅक्स) याच मंदिराच्या खजिन्यात जमा होत गेला. त्यातच राणी गौरी लक्ष्मीच्या शासन काळात जारी झालेल्या हुकुमामुळे राज्यातील शकडो मंदिराची मायाही पद्मनाभ मंदिरात जमा करण्यात आली.

अशा रीतीने हजारो वर्षे विविध राजांनी दान केलेल्या मौल्यवान वस्तू, संप्पती, सारा, सर्व काही मंदिराच्या प्रचंड मोठ्या दगडी चेम्बर्समध्ये बंद झाला… शेकडो वर्षे हा शापित खजिना उघडायचे धाडस कोणीच केले नाही. पण जेव्हा काही दरवाजे उघडण्यात आले तेव्हा काळोख्या खोल्यांतील कोळीकाष्टकाचा मागे जे काही दिसले त्याने जगाचे डोळे दिपून गेले…

1,346 total views, 3 views today