भारतीय टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओचे आगमन होताच ग्राहकांची चांदी झाली. आजवर महागडे असणारे फोन कॉलचे दर भलतेच स्वस्त झाले. स्वस्त कॉल आणि फ्री डेटा हा सिलसीला यापूढेही कायम राहण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर कॉल रेट जबरदस्त कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय ग्राहकांची पुन्हा एकदा दिवाळी होणार आहे.

प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, ट्रायकडून आपल्या मोबाईल ऑपरेटर्ससोबत कनेक्टिंग कॉल्सच्या दरात आकारल्या जाणाऱ्या शुल्कात कपात केली जाणार आहे. या शुल्काला इंटरकनेक्ट यूजेस चार्ज (आईयूसी) म्हटले जाते. हे शुल्क म्हणजे कॉल टर्मिनेट करण्यासाठी ऑपरेटर दुसऱ्या ऑपरेटरकडून जी रक्कम आकारतो ते शुक्ल होय. सद्यस्थितीत आईयूसी शुल्क प्रतिमिनीट 14 पैसे या दराने आकारले जाते. पण आता दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आययूसी रेट 14 पैशांवरून ते सहा पैसे प्रतिमिनिट करण्याचा निर्णय घेतला आहे. या कपातीचा लाभ ग्राहकांना मोबाईल कंपन्यांनी दिल्यास कॉल दर कमी होतील. पोस्टपेड ग्राहकांना याचा सर्वाधिक लाभ होणार आहे.

या निर्णयाची 1 ऑक्टोबर 2017 पासून प्रभावीपणे अंमलबजावणी होईल. यासह इतर सर्व प्रकारच्या कॉलवरील (वायर-लाईन टू मोबाईल, वायर-लाईन टू वायर-लाईन) टर्मिनेशन शुल्क आकारणी 1 जानेवारी 2020 पासून पूर्णपणे बंद करण्यात येईल, अशी माहिती ‘ट्राय’ने दिली आहे.
एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर आदी कंपन्यांसाठी ‘ट्राय’चा हा निर्णय मोठा झटका मानला जातो. या कंपन्यांनी इंटरकनेक्ट वापर शुल्क दुप्पट म्हणजेच 30 पैसे प्रतिमिनिट करण्यात यावा, अशी मागणी केली होती. तर रिलायन्स जिओने हा चार्ज बंद करण्याची मागणी केली होती. ट्रायच्या या निर्णयाचा फायदा थेट जिओला होण्याची शक्यता आहे. कारण जिओच्या नेटवर्कवरुन एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोनवर मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग कॉल केले जातात. त्यामुळे जिओचा आता आययूसी खर्च कमी होणार आहे.

आययूसीची सुरुवात 2003 साली करण्यात आली. इनकमिंग कॉल फ्री झाल्यानंतर ट्रायने कॉल करणाऱ्या ऑपरेटरकडून चार्ज वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला हा चार्ज 15 पैसे प्रती मिनिट ते 50 पैसे प्रती मिनिट होता. ट्रायने 2004 साली हा दर घटवून 20 पैसे प्रती मिनिट केला, तर 2015 मध्ये हा दर 14 पैसे प्रती मिनिट करण्यात आला होता. अन आता तो दर निम्म्यापेक्षा जास्त कमी होणार…वाह..
दोस्तहो, टेलिकॉम क्षेत्रात खासगी कंपन्यांमध्ये सुरू झालेली जीवघेणी स्पर्धा ग्राहकांचा चांदी करणार हे नक्की.

नवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.

383 total views, 1 views today