इसवी सन पूर्व ८००० वर्षापूर्वी अमेरिकेतील फोर्ट रॉक गुंफामध्ये पहिल्या पादत्राणाचा शोध लागल्याचा उल्लेख आहे. तेव्हापासून मानव पादत्राणांचा वापर करत आला आहे.वेगवेगळ्या कामांसाठी विविध पादत्राणांचा वापर करता करता काही विचित्र चप्पलांची निर्मितीही मानवाने केली. त्यातीलच विलक्षण ’टॉप ५’ पादत्राणांची यादी.

१) “लोटस’’

चीन अनेक विलक्षण व विचित्र कल्पनांचे माहेर आहे. मुलींच्या पावलांची वाढ थांबवून त्याला छोटया कमळांच्या पाकळ्यांप्रमाणे आकार देण्याची प्रथा हजारों वर्षे चीनमध्ये होती. मुली तीन वर्षांच्या झाल्यानंतर त्यांची पावले कापडांनी घट्ट बांधून कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे टोकदार केली जात. या विचित्र प्रथेमुळे मुलींना प्रचंड त्रास होत असे. अशा मुलींसाठी नक्षीदार कापडी ’लोटस चप्पल’ वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध असत. अगदी अलीकडे म्हणजे सन २००९ पर्यंत ’झिक्यूअँग’ कारखान्यांत या चप्पलांची निर्मिती होत असे.

२) ‘कॅबकॅब’

मध्यपुर्वेतील देशामध्ये स्त्रिांसाठी वापरात असणारी ही चप्पल. रस्त्यावरील धूळ व स्नानगृहातील, जमिनीवरील ओलावा पायांना लागू नये म्हणून लाकडांनी बनविलेली ही उंच चप्पल त्याच्या होणाऱ्या आवाजामुळे ’कॅबकॅब’ म्हणून ओळखली गेली. लाकडांवर मिनाकारी केलेली ही चप्पल बहुतांशी स्त्रीयांच वापरायच्या, परंतु पुरुषांनीही ही चप्पल वापरल्याचा उल्लेख आहे.

३) ‘चॉपाइन’

सोळाव्या शतकात इटलीमध्ये चॉपाइन नावाच्या सुंदर चप्पलांचा वापर स्त्रीया करीत असत. दिसायला जरी सुंदर असल्या तरी चॉपाइन घालून चालणे फार अवघड असायचे व अनेक वेळा स्त्रिया आपल्या दासांची मदत घेवूनच चॉपाइन वर (?)चालायच्या. सिल्क व व्हेलवेटची नक्षीकाम असणाऱ्या चॉपाइन तेव्हाच्या लांब झग्यामध्ये दिसायच्यासुध्दा नाहीत पण म्हणतात ना हौसेला मोल नसते.

४) ‘हिललेस’

हिललेस किंवा टाच विरहीत चप्पल. इंग्लडचा फुटबॉल स्टार डेव्हीड बेकइमच्या बायकोने म्हणजे व्हिक्टोया बेकहमने प्रसिध्दीस आणलेली ही चप्पल. प्रसिध्द अमेरिकन गायिका लेडी गागाने सुध्दा वापर केलेली ही टाच विरहीत चप्पल साधारपणपणे २००७ साली काही काळ फॅशनमध्ये होती.

५) ‘विलक्षण पादुका’

हिंदूधर्मामध्ये महत्त्व असणाऱ्या पादुका बहुतांशी लाकडांच्या बनवल्या जातात परंतु हस्तीदंत वा चांदीच्या पादुकाही वापरात असत. पायाचा अंगठा व दुसरे बोट यामध्ये धरावयाच्या पादुका ’टॉप ५’ मधील नक्कीच एक विलक्षण वस्तू.

600 total views, 1 views today