समुद्र किनारी फेसाळणाऱ्या लाटा पाहत हात हात घेवून छान संध्याकाळ अनुभवायची संधी कोणाला नको असते? वाळूत एकेठिकाणी बांधलेला तो किल्ला अन दोघांची नावे पाण्यात विरून कधी जातात ते कळतच नाही. पण त्या आठवणी उनपावसातही चिरंतन राहतात दोघांच्या मनात… दोस्तहो आयुष्य सुंदर आहेच अन असे सुवर्णक्षण गोळा करायला आपल्या भारत देशात स्वप्नवत समुद्र किनारे अनेक आहेत. त्यातीलच 5 किनाऱ्यांची माहिती येथे.

1. कोवालम बीच, केरळ :

त्रिवेन्द्रम पासून 16 किलोमीटरवर मलबार किनारपट्टीला लागून असलेला हा कोवालम. आयुष्यातील सुवर्णकण गोळा करायला वर्षभर हजारो मने येथे येतात. चित्रात दाखवलेला लाईट हाउस बीच हे खास आकर्षण. गेले कित्येक दशके परदेशी प्रवाश्यांचे आकर्षण ठरलेला हा किनारा अनेक गोष्टींसाठी प्रसिध्द आहे. किनाऱ्यावरील नैसर्गिक दगडी सजावट अन शांत लाटा तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेवून जातात. रात्रीचा दिवस करणाऱ्यांसाठी अनेक सुविधा येथे आहेत..

2. राधानगर बीच, अंदमान :

टाईम मॅगॅझीनने आशिया मधील बेस्ट बीच म्हणून गौरवलेला किनारा. अंदमान बेटामधील राधानगर तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. शूभ्र पांढरी मुलायम वाळू, तळाचा ठाव घेऊ शकणारे निळसर पाणी…. खरोखरच वेड लावणारे. सौंदर्य अनुभवायला येणाऱ्या मनांना किनाऱ्याला लागून जंगलात फेरफटका मारायची सोय आहेच पण थ्रिल अनुभवायला येणाऱ्या स्पोर्ट्स लव्हर्सनादेखील देण्यासारखे भरपूर काही येथे आहे. स्कूबा डायव्हिंग, मासेमारी, सर्फिंग इत्यादीने पुरेपूर राधानगर नक्कीच तुम्हाला भावेल.

3. तारकर्ली बीच, महाराष्ट्र :

कारली नदी अन अरबी समुद्राच्या साथीने जगाला सुंदरतेचा संदेश देणारा हा महाराष्ट्रातील मालवणयेथील बीच. निर्मल सुरक्षित किनारा अन शांत लाटा तारकर्लीला एका वेगळ्याच उंचीला घेवून जातो. लाखह सूर्य प्रकाशात अगदी 20 फुटापर्यंत समुद्रतळ दिसू शकतो अश्या स्वर्गीय ठिकाणाला आयुष्यात एकदातरी भेट द्यावीच. किनार्याला लागून असणाऱ्या झोपडीवजा कॉटेजमध्ये राहून निवांतपणे दिवस घालवायला असे ठिकाण क्वचितच मिळेल. येथील रामनवमी उत्सव असो वा वॉटरस्पोर्ट्स असो सारे काही तुम्हाला एकदम फ्रेश करणारे अन नव्या उमेदीने आयुष्य पुढे नेणारे.

4. मेरारी बीच, केरळ :

केरळमधील आलेप्पी गावाजवळील एक झोपाळू किनारा. झोपाळू इतक्याचसाठी कारण भीड भाडवाल्या जिंदगीतून दूर – कुठेतरी जावे वाटले तर मेरारी मस्त. छोटे छोटे रिसोर्ट्स, घरगुती तसेच इतर फूड, पडून रहायला लुसलुशीत वाळूचे बेड्स… झोपून उठल्यावर नुसतीच समुद्रातील रिफ्रेशिंग डुबकी वा लाटांशी उत्साहवर्धक खेळ मजा आणतो. एक प्रोफेशनल देस्तिनतिओन म्हणून मेरारी बीच नावारूपास.

5. बंगाराम बीच, लक्षद्वीप :

चंदेरी वाळू, स्वप्नवत लाटांच्या रेषा, उबदार हवे हवेसे पाणी अन त्यातील नारळांची नक्षीदार किनार. पावसाळ्यात हेलीकॉप्टरने बेटावर उतरण्याची सोय असलेळे हे बेट जणू एक स्वर्गच. जगातील टॉप टेन किनाऱ्याच्या यादीत असलेला हा छोटासा बंगाराम. क्लीअर पाण्यातील प्रवाळ, रंगीबेरंगी मासे, तुम्हाला एखाद्या भल्यामोठ्या अक्वेरीममध्ये असल्याचा अनुभव देते. नुसत्या प्रवाश्यानाच न आकर्षित करता बंगाराम विविध पक्षांना देखील लुभावतो. त्या पक्षांचे मधुर गाणे अन स्थानिक राहिवाश्यांचे मोहवून टाकणारे आदरातिथ्य तुम्हाला स्वघर विसरून टाकायला लावणारे.

739 total views, 3 views today