एप्रिल १४, सन १९१२, म्हणजे १०२ वर्षांपूर्वी रात्री १०.४० मिनिटांनी टायटॅनिक जहाज बुडाले याबद्दल आपणास माहितच आहे. परंतु याच टायटॅनिकबद्दल ’स्मार्टदोस्त’ कडे अशा गोष्टींची माहिती आहे ती कदाचित तुम्हाला नविन असेल.

 

१) नांव : आर.एम.एस. टायटॅनिक

टायटॅनिक एक रॉयल मेल सर्विस जहाज होते. म्हणजे ब्रिटीश सरकारची पोस्टाची सेवा पुरवण्याचेही काम टायटॅनिककडे होते. त्यामुळे जहाजावर पोस्ट ऑफिस होते. ज्यामध्ये ३ क्लार्क काम करत होते. बोट बुडाली तेव्हा त्यावर अमेरिकेला पाठवलेली ७० लाख पोस्टाची पत्रे होती जी आजतागायत सापडली नाहीत.

 २) फक्त दोन स्नानगृहे

टायटॅनिक फार मोठी जहाज. हजारोंनी प्रवासी परंतु स्नानगृहे मात्र फार थोडी होती. फर्स्ट क्लास प्रवाशांसाठी दोन प्रायव्हेट व जनरल लोकांसाठी फक्त म्हणजे फक्त दोन बाथटब होते.७०० वर प्रवाशांसाठी दोन स्नानगृहे?

 ३) एक लाइफबोट – बारा माणसे

 टायटॅनिक वर जीव वाचवण्यासाठी अपूऱ्या लाइफबोट होत्या हे तर आपणास माहीतच आहे. परंतु त्या लाइफबोटींचा देखील पुरेपूर वापर केला गेला नाही. कपॅसिटीपेक्षा कमी लोकांना घेवून लाइफबोटी अक्षरश: पळवून नेल्या गेल्या. लाइफबोट नं.७ ची कपॅसिटी ६५ लोकांना न्यायची होती ती फक्त २५ लोकांनी वापरली तर लाइफबोट नं.१ मध्ये तर फक्त १२ लोक बसले. त्यापैकी सात तर जहाजाचे कर्मचारीच होते.

 ४) रद्द केलेला सुरक्षा सराव

 लाइफबोटींचा चूकीचा वापर तर आपण पाहिलाच. वाईट म्हणजे त्याच दुर्दैवी दिवशी म्हणजे १४ एप्रिल रोजी सकाळी लाइफबोटी कशा वापरायच्या याचा सुरक्षा सराव-ड्रिल आयोजित केले होते. परंतु टायटॅनिक कधीच बुडणार नाही अशी डरकाळी फोडत कॅप्टन स्मिथने तो सराव रद्द केला. म्हणतात ना संकटे एकटी येत नसतात.

 ५) टायटॅनिकचे स्वतःचे वर्तमानपत्र

 टायटॅनिक भयंकर मोठे होते. हजारो प्रवाशांना घेवून महिनोंमहिने प्रवास करण्याची क्षमता असणाऱ्या  या जहाजाचे स्वत:चे ’”अॅटलांटीक डेली बुलेटीन’’ नावाचे वर्तमानपत्रही होते. समुद्रात तरंगत असतानासूद्धा किनाऱ्यावरून तारेद्वारे लेटेस्ट बातम्या बोटीवरील प्रवाश्यांना पोहचवण्याची प्रगत सोय टायटॅनिकवर होती.

906 total views, 2 views today