पिंक गुलाबी ओठांची बात कूछ अलग ही होती है. सौंदर्य खुलून दिसायला पिंक ओठ मदत करतात म्हणूनच आपले ओठ गुलाबी करायला स्त्रीवर्ग बरेचसे प्रयत्न करतात. यामध्ये लिपस्टिक लावण्या सारखे बाह्य उपचार असतील वा वेग वेगळे टॉनिक प्राशन करण्यासारखे औषधी उपचार असतील. नेट सर्फ करताना स्मार्टदोस्तला पिंकी ओठांसाठी कोणते नैसंर्गिक उपाय आहेत याची माहिती मिळाली. तीच आतां तुमच्या समोर. खरे पाहता सुंदरतेचं रंगाशी असे रिलेशन जोडणे बरोबर नाही असे स्मार्टदोस्तला वाटते. तरीसुद्धा “पिंकी लिप्स” पाहिजेच असतील तर…..

1. गोडवा मधाचा : लिंबू व मधाचा पॅक

ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठीचा एक उत्तम आणी असरदार उपाय म्हणून लिम्बूमधाचा पॅक उपयोगी होतो. समप्रमाणात यांचे मिश्रण ओठांना लावल्यास ओठ माऊशार होतातच पण क्लिनिंगपण होते. हे मिश्रण ओठांना लावून साधारणपणे अर्धा तास ओठावर राहुदे. नंतर पाण्याने ओठ क्लीन करा अन पहा ओठामाधला फरक. अनेक वेळा हा उपचार चांगला रिझल्ट देतो. उनांमुळे टॅन झालेल्या ओठांसाठी हा चांगला उपाय.

2. लाली बीटरुटची :

बीटरूट आपल्या हेल्थसाठी चांगले असते हे आपण जाणतोच. परंतू याच बीटरूटचा उपयोग ओठावरील टॅन घालवण्यासाठी होतो हे अनेकांना कदाचित माहित नाही. जमेल तेव्हा बीटरूटचा एक तुकडा, ओठांचा मसाज केल्यासारखा हळूवारपणे ओठावरून फिरवत रहा. लिपस्टिकच्या अतीवापरामुळे झालेले नुकसान कमी होण्यास याचा उपयोग होतो.

3. कोवळी काकडी अन कोवळे ओठ :

काकडीचा ब्युटी ट्रिटमेंटमध्ये जसा त्वचा सौंदर्यासाठी जादुई उपयोग होतो तसाच ओठांसाठीही होतो. काकडीचा रस ओठांवर लावल्यास ओठांचा ओलावा वाढण्यास उपयोग होतो. तसेच काळसरपणा आला असेल तर दूर होतो. हा उपचार असरदार आहे असे बऱ्याच वेळा लक्षात आले आहे.

4. मध – साखरेचा खरखरीतपणा :

टायटल जरा ऑड वाटते पण स्मार्टदोस्तला मध आणी साखरेने तुम्ही स्क्रबिंग करू शकता हे सांगायचे आहे. मध आणी त्यात साखरेची बारीक पूड मिक्स करून तुम्ही एक घरगुती स्क्रब करू शकता. या मिश्रणाने ओठांचा हळुवार मसाज करा. ओठावरील डेड स्कीन निघून जायला यामुळे मदत होते. अंततः ओठ गुलाबी आणि लवचिक होण्यास यामुळे मदत होते.

5. अनारदाना अनारकली :

अनारकलीसारखे म्हणजे डाळींबाच्या लालचूटूक रसदार दाण्यासारखे ओठ हवे असतील तर आनारदाना खूप उपयोगी. जरासे दाणे चुरून घ्या, त्यात पेस्ट होण्यापुरते थंड दुध मिसळा. तयार झालेली पेस्ट ओठांवर लावा अन पेस्ट पूर्ण वाळूद्या. नंतर ओठ धुवून घ्या अन मिळवा मनपसंद ओठ काही आठवड्यातच.
ता. क. : वरील उपाय करत असतानाच काही बाबी लक्षात असुद्या. पाणी शरीरासाठी एक आवश्यक घटक आहे. तेव्हा पाण्याचा इनटेक पुरेसा असावा. पुरेसा म्हणजे किती याची माहिती मिळवायचा स्मार्ट दोस्तने प्रयत्न केला असता दिवसभरात पुरुषानी अंदाजे 3 लिटर व स्त्रियांनी 2.5 लिटर पाणी प्यावे असे अनुमान नेटवर वाचनात आले. ओठांची काळजी घेणार असाल तर खाणेसुद्धा काळजीपूर्वक असावे. तयारी असेल तर पिंकी लिप्स दूर नाहीत.

3,971 total views, 1 views today