बोलणे अगदी उत्कट होत चाललय.. दोघांनी हातातला मोबाईल कानाला घट्ट चिकटवलाय… पलीकडच्या जिवलगाचा शब्द न शब्द कानातून रोमा रोमात पसरला जातोय.. सगळे कसे अगदी जादूमय… अन अचानक…..
मोबाईलची बॅटरी डाऊन. ओम फस्स.
जाहिरातीत असेच काहीतरी दाखवतात अन सुरु होते पॉवरफूल बॅटरीची भरमसाठ माहिती.
खरच मोबाईल, लॅपटॉपची बॅटरी डाऊन झाली तर फार पंचाईत होते. म्हणूनच स्मार्टदोस्तने डेल, अॅपल, एच.पी. सारख्या कंपन्या बॅटरीचे लाईफ वाढवण्यासाठी कोणते उपाय सुचवतात याची यादी बनवली आहे. मोबाईल, लॅपटॉपमध्ये रिचार्जेबल लिथियम आयन बॅटरी वापरली जाते. त्यांच्या वापरावेळी काही काळजी घ्यावी लागते. तशी काळजी घ्या अन वाढवा लाईफ बॅटरीचे अन रिलेशनचे.

1. फुल्ल डिस्चार्ज नको :

हे अगदी मानवी शरीरासारखे आहे. बॅटरी डीप डिस्चार्ज होईपर्यंत वापरू नका. म्हणजे बॅटरी 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी चार्ज नसावी. लिथियम आयन बॅटरीची चार्ज लेवल 40 ते 70 मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. एकदम फुल्ल चार्ज वा फुल्ल डिस्चार्ज बॅटरी लवकर खराब होते. तेव्हा थोड्या थोड्या काळाने चार्जिंग करत चला. जसे आपल्या दोन जेवणामध्ये जास्त अंतर ठेवल्याने शरीरावर परिणाम होतो तसे बॅटरीबाबतीत सुद्धा आहे.

2. कमी वापर, कमी चार्जिंग :

जर तुम्ही मोबाईल, लॅपटॉप व इतर उपकरणे काही अधिक काळासाठी (उदा. महिन्यापेक्षा जास्त) वापरणार नसाल तर बॅटरी 50 टक्के पर्यंत चार्ज करून उपकरण पॉवरडाऊन करून ठेवा. 50 टक्केपेक्षा जास्त चार्जिंग असेल तर आधी अर्ध्यापर्यंत डिस्चार्ज करा. म्हणतात ना झोपण्यापूर्वी जास्त जेवू नका. कारण काहीच काम नसते तेव्हा शरीरावर त्या जेवणाचा वाईट परिणाम होतो.

3. स्क्रिनचा बरोबर वापर :

मोबाईल स्क्रिनचा खुबीने वापर केला तर बॅटरी लाईफ वाढू शकते. स्क्रिनचा ब्राईटनेस कमी करा, स्क्रिन टाईमआउट कमी करा. म्हणजे शक्यतो जास्त वेळ स्क्रिन चालू नसावा. अॅंड्रॉइड फोनवर मिनिमम स्क्रिन टाईमआउट 15 सेकंद असतो तर आय फोन वर तो 1 मिनिट असतो. साधारणपणे सेटिंग सेकंद केले तर बरीचशी एनर्जी वाचेल.

4. डायरेक्ट उष्णता टाळा :

बऱ्याच वेळा चारचाकीमध्ये चेअरवर वा डॅशबोर्डवर मोबाईल ठेवण्याची अनेकाना सवय असते. जर तुम्ही उपकरण डायरेक्ट सूर्यप्रकाशात ते पण दुपारी जास्त वेळ ठेवले तर बॅटरी खराब होऊ शकते. 35 डिग्री किंवा जास्त उष्णता बॅटरीची कपॅसिटी कमी करते. तेव्हा शक्यतो सावलीत उपकरण ठेवण्याचा प्रयत्न करा.

5. रात्रीचे चार्जिंग काळजीपूर्वक :

अनेकाना रात्री चार्जिंग करायचे का नाही हा प्रश्न असतो. शक्यतो रात्री मोबाईल चार्जिंगसाठी प्लगला लावून झोपू नका. परंतू तशी वेळच आली तर मोबाईलची केस काढून ठेवलेली बरी. कारण चार्जिंगच्या वेळी तयार झालेली उष्णता बाहेर पडण्यासाठी तसे करणे गरजेचे. ते बऱ्याचजणांना जमणार नाही. त्यापेक्षा दिवसाच चार्जिंग बरे.
जाता जाता एक सांगतो : वाय फाय, जी.पी.एस., ब्ल्यू टूथ चालू असणे म्हणजे बॅटरीचा वापर चालू असणे. तर जेव्हा गरज नसेल तर वाय फाय, जी.पी.एस., ब्ल्यू टूथ बंद करा.

1,209 total views, 3 views today