दुसऱ्याला शिव्या द्यायच्या आहेत पण मार खायचा नाही असे वाटणारे अनेक.. कदाचित त्यांच्यासाठीच एक अॅप नेटवर आलेय. इंटरनेट हे मायाजाल आहे हे आतापर्यंत जगाला कळून चुकले आहे. या मायाजालात सागरमंथन केल्यावर जश्या चांगल्या अन वाईट गोष्टी बाहेर पडल्या तश्या चांगल्या वाईट गोष्टी बाहेर पडत आहेत. स्मार्टने ब्लू व्हेल बद्दल तुम्हाला सांगितलेच पण आज इंटरनेटवर शिव्या देवून नामानिराळे राहता येईल अश्या साराहह अॅप बद्दल सांगणार आहे. वाचा Interesting Facts About Sarahah in Marathi..

1. Sarahah साराहह चा सारा मामला :

सौदी अरेबिया आणि इजिप्तमध्ये नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले ‘साराहह’ अल्पावधीत भारतीयांच्याही मोबाईलमध्ये शिरकाव करायला लागलाय. जगभरात या Sarahah च्या डाऊनलोडस्‌ने 300 दशलक्षचा टप्पा ओलांडला, तर भारतातही 50 लाखांहून अधिक नेटकरींनी विचित्र नावाच्या ‘साराहह’ ची वाट धरली आहे. आहे काय हे सारे प्रकरण ?

फेब्रुवारी 2017 ला नेटवर आलेले हे साराहह अॅप दोन महिन्यात जगातील most popular app बनले आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही इतर युजर्सना कोणताही मेसेज पाठवू शकता. अगदी कोणताही. कारण ज्याला तुम्ही मेसेज पाठवता त्याला कोणी मेसेज पाठवला ते आजीबात कळत नाही. रिसिव्हरला फक्त तुमचा मेसेज दिसतो. तुमचे नाव, तुमचा नंबर काही काही कळत नाही. अन हीच तर मेख आहे. कारण आत तुम्ही कोणालाही शिव्या देवू शकता मार न खाता. अन हो इतर युजर्सही सेम हे तुमच्याबद्दल करू शकतात.

2. “मेरा नाम साराहह…” : म्हणजे काय?

सौदी अरेबियातील झैन अल अब्दिन तौफिक च्या सुपर डोक्यातील हे सराहह. अरेबिक भाषेत Sarahah means frank, honesty. म्हणजे प्रामाणिक मत. आपणा सर्वांचे इतराबद्दल काही ना काही मत असते. कधी ते चांगले तर कधी वाईट. कधी सांगता येण्यासारखे तर कधी मनात ठेवायला लागणारे. पण प्रामाणिक मत.

आता या मनातील मताला मनातच ठेवायला नको म्हणून या शेख साहेबांनी हे अॅप तयार केले. हेतू हा की तुम्ही तुमचे इतरांबद्दलचे प्रामाणिक मत त्यांच्या पर्यंत पोहचवा. यदी मनमे प्यार हो तो प्यार का इजहार करो…हे त्यांचे म्हणणे. हेतू चांगलाच.

परंतु जगभराच्या शेखचिल्लिंनी सारासार विचार न करता शेख साहेबांच्या या साराहहचा वापर दुसऱ्याच कारणासाठी वापर सुरु केलाय. शिव्या, अश्लील मेसेजेस, धमक्या अन काहीबाही पाठवण्यासाठी.

3. सारहह वरून सायबर बुलिंग :

म्हणतात ना, मस्करीची कुस्करी व्हायला फारसा वेळ लागत नाही. ती बाब ‘साराहह’ च्या बाबतीतही तंतोतंत लागू पडते. ‘साराहह’ डाऊनलोड केल्यानंतर शिवीगाळ तर सोडाच, काहींना चक्क अश्लील आणि ब्लॅकमेल करणारेही संदेश आले आहेत. मुलींना खासकरून अशाप्रकारच्या ‘सायबर बुलिंग’ला एरवीही ऑनलाईन सामोरे जावे लागते आणि इथे तर अनामिकांची अख्खी फौजच! त्यामुळे युजर्सच्या या ऑनलाईन छेडखानीच्या काही घटनाही उजेडात आल्या. आणी ‘साराहह’ वरून आलेल्या मेसेजेसला ट्रेस करणेही सोपे नाही. त्यामुळे तक्रार दाखल करूनही अशा केसेस कितपत निकालात निघतील, याची साशंकताच. 2016 च्या एका आकडेवारीनुसार, ‘सायबर बुलिंग’च्या घटनांमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियामध्ये ‘सायबर बुलिंग’चे प्रमाण 88टक्के, अमेरिकेत 80 टक्के, सिंगापूरमध्ये 71 टक्के, तर भारतात हेच प्रमाण 56 टक्के इतके आहे. खोटी प्रोफाईल बनवणे, लग्नाचे आमिष दाखवून मुलींची फसवणूक करणे, चुकीची माहिती शेअर करणे इत्यादी करामती आपल्या देशातील वाढत आहेत. त्यातच हे वाढून ठेवलेलं साराहह. Sarahah : Platform for cyber bullying बनतंय असे म्हणायला हरकत नाही.


4. शिव्या देणाऱ्यांची फौज :

एखाद्याच्या पिठ्पीछे चांगले बोलणाऱ्यांची संख्या जगभरातच कमी. त्यात कोण शिव्या देतय हे समजणारच नसेल तर चांदीच. ह्याच मानसिकतेचा फायदा उठवत सराहह ने डाऊनलोडसचा विक्रम गुगल प्ले स्टोअरवर केला. Android and iOS platforms वर Sarahah हे अॅप वर्क हॉट असल्यामुळे अॅपल्सच्या स्टोअरवर हे हातोहात फुकट विकले गेले. बीबीसी न्यूजच्या मते “Sarahah garnered more than 270 million views and 20 million users in just a few weeks.” म्हणजे 27 कोटी वाचक अन दोन कोटी युजर्स.. अबब.. अन हे फक्त काही आठवड्यात.

जिभेवर ताबा नसणाऱ्या कोटी लोकांची ही फौज वाढतच आहे. ही बाब चिंतेची.

5. अनसेफ सराहह :

हॅकर्स न्यूज डॉट कॉमच्या मते साराहह युजर्सची माहिती सिक्रेट ठेवते हा दावा खोटा आहे हे सांगितले आहे. जेव्हा युजर अॅप डाउनलोड करतो तेव्हा त्याच्या फोनवरील सर्व माहिती अपोआपच साराहह घेवू शकते अशी संमती देतो. “ Privacy policy of Sarahah” निट वाचल्यावर हे समजून येते. याचा अर्थ कंपनी भविष्यात तुमच्या फोनवरील माहितीचा वापर करून नवीन स्कीम राबवू शकते. याचा अर्थ तुमचे सिक्रेट्स सिक्रेट्स राहतीलच का याचा नेम नाही.

दोस्तहो जगात कोणतीच वस्तू फुकट मिळत नाही. अन सराहह त्याला अपवाद नाही. इतरांना फुकट सल्ला देण्यासाठी जरी तुम्ही सराहह हातात घेणार असाल तर जरा जपूनच घ्या. चांगलेच बोलायचे असेल तर तोंडावर बोला.

इंटरनेट वरील मायाजालात फसू नका. तसेच जरूर वाचा “आत्महत्या करायला लावणाऱ्या ब्लू व्हेल गेमच्या 5 भयानक बाजू”

नवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.

697 total views, 2 views today