स्मार्टदोस्तच्या एका यादीत आपण पुरुषांच्या कोणत्या गोष्टी स्त्रीयांना आवडत नाहीत हे पाहिले. बऱ्याच दोस्तांनी स्त्रियांच्या कोणत्या गोष्टी पुरुषांना आवडत नाहीत त्याची पण यादी तयार करायला सांगितली. कदाचित आपल्या बेटर हाफला ती यादी ते वाचून दाखवणार असतील असे वाटते. असो त्यांच्या सुचनेप्रमाणे ही यादी तयार करतोय. नेटवरूनच माहिती काढलीय. वाचा पुरुषांना काय आवडत नाही.

1. पुरुषांच्या पूर्वीच्या मित्र मैत्रिणींबद्दल हेवा/मत्सर :

पुरुषांचे आणि स्त्रियांचे विश्वच वेगळे असते. मुलांचे बालपण, त्यानंतर त्यांनी कॉलेजमध्ये तयार केलेला ग्रुप अन त्यांच्या त्या गमती जमती बऱ्याच वेळा स्त्रियांमध्ये हेवा निर्माण करू शकतो. म्हणजे समजा लग्नानंतर त्याने त्याच्या पूर्वीच्या मित्रांबरोबर काही काळ घालवायचे असे म्हटले तरी काही अर्धांगिनी धुसफूस करू लागतात. त्यामागचे त्यांचे लॉजीक काहीही असो पण एक मात्र नक्की पुरुषांना स्त्रियांचे हे वागणे पटत नाही.

2. एखाद्या गोष्टीबद्दल वारंवार विचारणा करणे :

काही स्त्रीयांना एखादी गोष्ट पाहिजे असते तेव्हा ती गोष्ट जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत त्या पुरुषांना सतत त्याबद्दल विचारत राहतात. मग ती गोष्ट हेअर पिन आणण्यासारखी सिम्पल असो वा त्यांच्या मनात बसलेला दागिना असो, एकदा का त्यांनी ठरवले तर ती गोष्ट अचिव्ह करेस्तोवर त्या थांबत नाहीत. त्यांच्या याच सततच्या विचारणेला काही पुरुष नक्कीच कंटाळतात.

3. फसवे फर्स्ट इम्प्रेशन :

बऱ्याच मुलींना स्वतःबद्दल एक चुकीचे इम्प्रेशन तयार करायला आवडते. म्हणजे त्या खरोखरच्या जीवनात जश्या असतात तश्या त्या मुलांबरोबर रिलेशन डेव्हलप करताना नसतात. फसवा मेकअप, वागण्यातून स्वतःचे एक चुकीचे चित्र त्या तयार करायचा प्रयत्न करतात. पुरुषांना नेमके हेच नको असते. म्हणजे फसव्या इम्प्रेशनमुळे नंतर खटके उठू शकतात. Be true to yourself, always.

4. अतिघाईने चुकीची समजूत करून घेणे :

खरे पाहता दोघानांही ही बाब लागू होते. परंतु काही स्त्रिया एखाद्या गोष्टीबद्दल चटकन चुकीची समजूत करून घेतात. त्यातून बऱ्याचदा वादाचे प्रसंग उद्भवतात. पुरुषांना गडबडीत निर्णयाला पोहचणाऱ्या स्त्रीयाबद्दल काहीसा रागच असतो. Play it safe and have an open mind at all times.

5. त्याच्या प्रत्येक हलचालींवर लक्ष :

आपल्या सख्यावर स्त्रीचे फार प्रेम. यातूनच कदाचित तो काय करत असेल, कोठे असेल याची सतत चिंता काही स्त्रीयांना असते. मग काय फोनवर व प्रत्यक्ष भेटल्यावर त्याला अनेक प्रश्न विचारायची त्या स्त्रीयांना हौस असते. त्यामुळे प्रेम वाढायचे सोडून दुरावाच निर्माण होतो. तर लेडी दोस्तांनो Be sure to avoid these 5 big mistakes! संदर्भ : www.boldsky.com

874 total views, 1 views today