मनापासून केलेल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला तुमच्या पत्नीचे, मैत्रिणीचे मन जिंकू शकतील असा सार्वत्रिक समज आहे. तिला आवडतात म्हणून सोन्याचे दागिने तूम्ही गिफ्ट द्याल आणि ती खूष होईल असे तुम्हाला वाटले. परंतु खुषीने पागल व्हायच्या पेक्षा तिने तुमच्यावर जास्तच भडकून तुम्हाला पागल केले असेल तर स्मार्टदोस्तची ही यादी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. कधी कधी दिलसे नही दिमाग से भी सोचना चाहीये. पुरूषांनी मनापासून केलेल्या या गोष्टी स्त्रियांना चिड आणू शकतात.

1. तिच्यासाठी दागिने आणणे

वाचायला विचीत्र वाटेल. कारण बहुतांशी स्त्रियांना दागिन्याची हौस असतेच असते. मग तिला दागिने देण्याने तिचा राग वाढण्याचे कारण असायला नको. परंतु डॉ. थॉमस यांच्या मते स्त्रिया दागिन्यांच्या बाबतीत फार पर्टिक्यूलर असतात.  तुमचे तिच्यावर मनापासून प्रेम आहे म्हणून एखादा दागिना तिला सरप्राइज म्हणून दिला आणी तो तिला सूट नसेल वा आवडीचा नसेल तर नक्कीच ती चिडू शक ते.
म्हणून तिची आवड निवड तुम्ही जाणून घ्या आणी मगच दागिन्यासारखी गिफ्ट द्या.

2. तिचे प्रॉब्लेम्स सोडवणे :

मानसशास्त्रज्ञांच्या मते स्त्री जेव्हा प्रॉब्लेममध्ये असते, उदा. तिच्या ऑफीसच्या कामामूळे वा सहकाऱ्याच्या असहकारामुळे जर चिंतेत असते तेव्हा तुम्ही तिचे हे प्रॉब्लेम सोडवावे अशी तिची अपेक्षा नसते. पण तुम्ही तिला वेळ देवून निटपणे ऐकणे व सांत्वन करणे अपेक्षित असते. अतिउत्साहात तिचे प्रॉब्लेम्स सोडवण्याचे तुम्ही प्रयत्न कराल तर तिला ते कदाचित आवडणार नाही.

स्त्रियांच्या आणि पुरूषांच्या विचार पध्दतीत फरक असतो. साध्यासाध्या गोष्टीत उदा. भिंतीवर खिळा मारणे वा कोळ्यांची जाळी काढणे यामध्ये त्या मदत मागतील पण काही बाबतीत त्या फक्त आधाराची अपेक्षा करतील मदतीची नाही.

3. तिला सतत गिफ्टस् देणे :

कधीतरी तुम्ही काही गिफ्ट तिला देणे हे कधीही चांगले. एखादे फूल, लहानशी वस्तू वा ग्रिटींग तिला खूष करेल. पण आज कपडे, उद्या परफ्यूमस, आणी काहीतरी असे सतत गिफ्टस् देत असाल तर स्त्रिला त्या गिफ्टच्या ओझ्याखाली राहायला मुळीच आवडणार नाही. तिला स्वतःची ओळख आहे हे विसरू नका.

4. तिची सतत काळजी करणे :

आपली कोणीतरी काळजी घेणारा माणूस असावा असे स्त्रिायांना वाटत असते. ते स्वाभाविकच आहे परंतु याचा अर्थ वारंवार फोन करून ती कोठे आहे, ठिक आहे का नाही याची चौकशी करणारा पुरूष स्त्रियांना चिड आणू शकतो. मग त्याने अगदी प्रेमाने मन:पूर्वक चौकशी केली तरी. तेव्हा तिची  वारंवार विचारपूस करू नका. ती एक सक्षम व्यक्ती आहे हे तिला जाणवून द्या व गरज पडेल आणि तिला हवी असेल तेव्हाच मदतिचा हात पुढे करा.

5. घरगुती कामात मदत करणे :

काही पुरूषांना एक पाऊल पुढे जाऊन पार्टनरला घरगुती कामात मदत करायची इच्छा होते. हेतू एकच की पार्टनरचा भार हलका व्हावा. परंतु एक लक्षात असू द्या मनापासून मदत करणे चांगलेच पण कामांची निवड तुम्ही डोके वापरूनच करा. उगाचच स्वयंपाक घरात वा किराणा ठरवण्यात केलेली मदत तुम्हाला अंगलट येऊ शकते. स्त्रिला तिचा पुरूष हा बायकोबाईसारखा नको असतो. तुम्ही भले काळजीने कामात मदत देऊ कराल परंतु त्यामुळे स्त्रिाची स्वत:ची इमेज जर खराब होत असेल, त्यांना कोण हुकूमशहा म्हणून ठरवत असेल तर त्या नक्कीच चिडतील.

मदत करताना कामांची निवड विचारपूर्वक करा. हा मानसशास्त्रज्ञांचा सल्ला.

780 total views, 2 views today