महाराष्ट्रदिनी 1 मे 2017 रोजी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच ध्वजस्तंभ महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे.. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस याचे हस्ते त्याचे लोकार्पण… बाब महाराष्ट्राच्या अभिमानाची. म्हणूनच हा लेख..

गेल्याच वर्षी म्हणजे मार्च 2016 रोजी भारतातील सर्वात उंच अश्या ध्वजस्तंभाची उभारणी भारत पाक सीमेलगत अटारी या ठिकाणी करण्यात आली तेव्हा साऱ्या भारतीयांनी त्याचे कौतुक केले अन अभिमान व्यक्त केला. पंजाब मधील ह्या स्तंभाने “रांची” मधील त्याकाळच्या भारतातील उंच ध्वजस्तंभाची जागा घेतली. अन “रांची” चा स्तंभ दुसऱ्या क्रमांकाचा उंच स्तंभ म्हणून ओळखला जावू लागला होता. परंतु आता महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील ध्वजस्तंभ  भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच ध्वजस्तंभ म्हणून आपली ओळख जगाला करून देत आहे.

दोस्तहो, कोणता ध्वजस्तंभ उंच अन मोठा याची तुलना करण्यात स्मार्टला मोह नाही पण अश्या या देशप्रेम वाढवणाऱ्या उपक्रमांची माहिती व्हावी म्हणून आज भारतातील सर्वात उंच अश्या 5 ध्वजस्तंभांची माहिती देत आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी नोंद यात आहे. जरूर वाचा..

1. अमृतसर (360 फुट)

भारतातील सर्वात उंच असा ध्वजस्तंभ पाक सीमेवर अटारी या गावात उभा करण्यात आला तो मार्च 2016 रोजी. 120 फुट रुंद व 80 फुट उंच असा तिरंगा अगदी पाकिस्तान मधूनसुद्धा दिसतो. ध्वज उभारणीस पाकिस्तानने आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला होता परंतु आता “बिटिंग रिट्रीट” या भारत पाक सैनिकाच्या पारंपारिक कवायतीच्या वेळी हजर असणाऱ्या दोन्ही देशाचे प्रवासी या स्तंभाचे अन तिरंग्याचे कौतुक करतात.

2. कोल्हापूर (303 फुट)

कोल्हापूर, महाराष्ट्र येथील पोलीस मुख्यालयानजीक पोलीस गार्डनमध्ये  सुमारे 90 फुट लांबीचा व 60 फुट रुंदीचा हा भारतीय तिरंगा. 303 फुटाचा ध्वजस्तंभ व भारतदेशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा तिरंगा… कोणालाही थक्क करणारा अन देशप्रेमाची जाणीव करून देणारा..

असे समजते की फ्लॅग पोस्ट जमिनीलगत पाच फुट तर निमुळता होत माथ्याला सोळा इंच आहे. या संपूर्ण पोलचे वजन सुमारे 24000 किलो आहे. रात्री तिरंग्यावर सहा फ्लड लाईट्सचा उजेड सोडण्याची सोय करण्यात आली आहे ज्यामुळे सुंदरतेत  अधिकच भर. कोल्हापूरच्या इतिहासात एक अनोखी नोंद करणारा हा ध्वज, एक अनोखी अनुभूती देणारा.

“कोल्हापूर स्ट्रीट ब्युटीफिकेशन प्रोजेक्ट –KSBP” च्या माध्यमातून हा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अश्या या ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली. आता भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच ध्वजस्तंभ कोल्हापूर, महाराष्ट्र येथे आहे अशी नोंद जगभर.

3. रांची (293 फुट)

रांचीच्या पहाडी मंदीर परिसरात 293 फुट उंचीचा हा स्तंभ मार्च 2016 पर्यंत भारतातील दोन नंबरचा उंच स्तंभ होता. जेव्हा तो उभा केला गेला तेव्हा म्हणजे जानेवारी 2016 मध्ये तो भारतातील सर्वात उंच स्तंभ होता पण दोनच महिन्यांनी त्याची जागा अमृतसरच्या स्तंभाने घेतली. स्वातंत्र्य सैनिकाच्या  बलिदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ 26 जनेवारी व 15 ऑगस्ट रोजी या स्तंभावर तिरंगा फडकावला जातो.

4. हैदराबाद (291 फुट)

तेलंगाणा  राज्याच्या दुसऱ्या वर्धापनदिनी उभा केलेला 291 फुटाचा ध्वजस्तंभ. ऐतिहासिक हुसेनसागर तलावाच्या किनाऱ्यावर उभा केलेला हा स्तंभ भारतातला तिसऱ्या क्रमांकाचा उंच स्तंभ. लज्जतदार बिर्याणीसाठी प्रसिध्द असलेल्या हैदराबादची नवीन ओळख करून देणाऱ्या या स्तंभासाठी लागलेले स्टील पाईप्स खास कलकत्त्यावरून मागवण्यात आले होते.

5. रायपुर (269 फुट)

30 एप्रिल 2016 रोजी छत्तीसगडची राजधानी रायपुरमधील तेलीबंधा तलावाच्याकाठी हा स्तंभ उभा करण्यात आला. रायपूरचे मरीन ड्राइव्ह अश्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी दोन सेल्फी स्पॉटस तयार करण्यात आले आहेत ज्याठिकाणाहून लोकाना तिरंग्यासमोर उभे राहून सेल्फी काढता येतात. तसेच फ्री वाय फाय झोन तयार करण्यात आला आहे जेणेकरून तुमाचा सेल्फी तुम्ही लगेचच व्हायरल करू शकता.असो.. या इतर सेल्फी, वायफाय इ. बाबी काही महत्वाच्या नाहीत. महत्वाचे आहे ते या सर्व उपक्रमामागे असणारा राष्ट्रभक्तीचा संदेश. पुण्यातही कात्रज तलावाजवळ 237 फुटाचा ध्वजस्तंभ उभा केला आहे जो काही काळापर्यंत भारतातला पाचव्या क्रमांकाचा उंच स्तंभ होता.

स्मार्टचा प्रत्येक भारतीयांना अन विशेषतः मराठी माणसाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली त्या सर्व लोकांना, ज्यांनी या उभारणीस प्रोत्साहन दिले, सहाय्य केले त्याना सलाम.. जय हिंद…जय महाराष्ट्र..

1,568 total views, 1 views today