नेट सर्फिंग करत असताना स्मार्टदोस्तला एक अतिविलक्षण बातमी वाचनात आली. आजपर्यंत एका पेशंटची किडनी दुसऱ्याला बसवताना पाहिले आहे. हृदयाची पण अदलाबदली बघितली आहे. पण व्हालेरी स्पिरीडोनाव्ह या रशियन माणसाचा चक्क मेंदू बदलण्याचे अचाट काम सर्जिओ कानेवेरो हे डॉक्टर करणार आहेत हे जरा अफाटच. मेडिकल सायन्स अतिप्रगत होत आहे याचे हे उदाहरण.
विचार करता करता असे जाणवले की जी काही प्रगतीची उदाहरणे आपण पाहतो त्यासारखी उदाहरणे हजारो वर्षांपूर्वी अनेक भारतीय प्राचीन ग्रंथात अनेक ठिकाणी नमूद केली आहेत. ऋग्वेदामध्ये 1/116/12 भागात असे म्हटले आहे की जेव्हा ऋषी दाध्यांगाना डोक्याचा दुर्धर आजार झाला तेव्हा ते अश्विनाकडे उपचारासाठी जातात. तेथे दाध्यांगांना तात्पुरते एका घोड्याचे डोके बसवले जाते व शस्त्रक्रीयेनंतर परत त्यांचे डोके रिप्लेस केले जाते. हे सारे हस्यास्पद वाटते पण डॉक्टर सर्जिओ कानेवेरोतर काय करणार आहेत?
या साऱ्या वाचनातून स्मार्टदोस्तला प्राचीन भारतातील मेडिकल प्रगतीबद्दल आर्टिकल लिहावे वाटले. त्याच्याबद्दल नेटवर अव्हेलेबल असलेले पुरावे तुमच्या समोर. वेगवेगळ्या ग्रंथात दिलेली ही माहिती नक्कीच तुम्हाला भारताबद्दल एक वेगळीच कल्पना देईल.

1. 8000 वर्षांपूर्वी भारतीयांना माहित होते गर्भातील अवस्थेतील बारकावे :

ई.स.पूर्व 6000 वर्षांपूर्वी म्हणजे आत्तापासून सुमारे 8000 वर्षांपूर्वी लिहलेल्या आत्रेय उपनिषदात मनुष्याची गर्भातील अवस्था कशी असते आणि त्यामध्ये कसे बदल होतात याचे विस्तृत वर्णन केले आहे. त्यात असे म्हणले आहे की गर्भ अवस्थेत प्रथम तोंडाचा काही भाग तयार होतो, नंतर नाकाचा, मग डोळे, कान, हृद्य…. विलक्षण बाब अशी की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर (जसे सोनोग्राफी) करून जेव्हा गर्भाची पाहणी प्रथम करण्यात आली तेव्हा हाजारो वर्षापूर्वी आत्रेय उपनिषदामध्ये जे लिहले होते त्याची पडताळणी व प्रचीती जगाला झाली. याचा अर्थ प्राचीन भारतात अशी काही उपकरणे होती ज्याद्वारे तत्कालीन वैद्यांना पेशंटच्या शरीरातील घडामोडीची माहिती मिळत होती. आत्रेय उपनिषद (1-1-4)

2. शरीरात प्राण कधी येतो याचे ज्ञान :

आत्रेय उपनिषदानंतर साधारणपणे ई.स.पूर्व 1500 वर्षामध्ये लिहलेल्या भगवताच्या भाग (3 – 31 – 3) मध्ये गर्भामध्ये प्राण कधी येतो याबद्दल माहिती दिली आहे. असे म्हणले आहे की जेव्हा नाकाचा भाग तयार होतो तेव्हाच गर्भात प्राण येतो. भागवत (2–10, 3-6,26) सांगते की गर्भ धारणेनंतर साधारणपणे दुसऱ्या महिन्यात हृद्य काम करायला सुरु करते. डिसेंबर 1972 ला शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगात हेच सिद्ध झाले. याच अर्थ प्राचीन भारतात मनुष्यजन्मावर व त्याच्या शरीर बदलावर आत्यंतिक बारकावीने अभ्यास केला होता.

3. शरीराचा दिशादर्शक कोण ते भारतीयांनी वैद्यांना माहित :

सन 1935 डॉक्टर रॉस व टेट यांनी एक अनोखा प्रयोग केला. भागवतात (2-1022, 3-26-55) भागात मनुष्याच्या दिशा ओळखण्याच्या अवयवाबद्दल लिहले आहे. मनुष्याच्या अनेक अवयवापैकी कानामुळे सर्व दिशा कळतात हे प्राचीन भारताला ज्ञात होते. हे न पटण्यासारखे वाटते पण हजारो वर्षांनी रॉस व टेटनी केलेल्या प्रयोगात हे सिद्ध झाले की कानामध्ये असलेल्या वेस्टीब्यूलर (vestibular apparatus) मुळे आपणाला दिशा समजतात. याचा अर्थ भारतीयांनी शरीराच्या सर्व अवयवांची अंतर्गत शास्त्रीय माहिती मिळवली होती. अन हे शस्त्रक्रियेशिवाय शक्य नाही.

4. राणी विश्पालाचा कृत्रिम पाय :

प्राचीन भारतात शस्त्रक्रिया होत होत्या याचे आणी एक उदाहरण ऋग्वेदामध्ये सापडते. भाग (1-116-15) मध्ये राणी विश्पालाला एक कृत्रिम पाय बसवला होता हे नमूद केले आहे. युद्धामध्ये राणीचा एक पाय निकामी झाला परंतु तत्कालीन वैद्यांनी तिला कृत्रिम पाय बसवला व तिने नंतरसूद्धा युद्धात भाग घेतला. सध्याच्या प्रगत मेडिकल सायन्समध्ये जे काम डॉक्टर्स करतात तेच काम पूर्वी भारतात केले जायचे.

5. नाकाची प्लास्टिक सर्जरी :

सन 1957 मध्ये डॉक्टर वर्तक यांनी सुश्रुत संहिता या ग्रंथाचा अभ्यास केला. त्या ग्रंथात एके ठिकाणी प्लास्टिक सर्जरीच्या वेदिक पद्धतीचा उल्लेख आहे. एखाद्या रुग्णाच्या बेढब नाकाच्या ठिकाणी त्याच्याच शरीराच्या इतर भागातील त्वचा बसवण्याची विस्तृत माहिती वाचून स्वतः सर्जन असणाऱ्या डॉक्टर वर्तकांनी त्यावर सविस्तर लेख लिहले. त्यानंतर सुश्रुत संहितेचा अभ्यास करून जर्मनी मध्ये प्लास्टिक सर्जरी केली गेली. जग जर्मनीला याचे श्रेय देतात परंतू वैद्य सुश्रूत यांनी सहाव्या शतकात ग्रंथ लिहला होता हे आपणाला माहित हवे अन या सुश्रुत संहितेमध्ये तब्बल 1120 आजार व त्यावरील उपचार दिले आहेत हे ही ….
संदर्भ : Medical Science from ancient Indian Shastras. by Dr. P.V. Vartak व विकीपेडिया

994 total views, 2 views today