गेली पंच्याहत्तर वर्षे कॉमिक्स, टी.व्ही. कार्टून शो, आणि चित्रपटाव्दारे रसिकांच्या मनावर राज्य करणारा आपला सुपरमॅन खरोखरीच अव्दितीय. न्याय आणि सत्याची बाजू घेणा-या सुपरमॅनच्या आयुष्यात अनेक बदल लेखकाने घडवून आणले. सुरवातीचा सुपरमॅन फक्त लांब लांब माकडउडया मारणारा होता हे ब-याच जणांना माहित नसेल, म्हणूनच स्मार्ट दोस्तने सुपरमॅनच्या ५ अनोख्या गोष्टींची यादी केली आहे.

१. सुपरमॅनला उडता येत नव्हते :

१९४० दशकात सुपरमॅन हा फक्त उंच उंच उडया मारु शकणारा हिरो होता. क्रिप्टॉन ग्रहावरुन आलेल्या सुपरमॅनला क्रिप्टॉन ग्रहाच्या अतीगुरुत्वाकर्षणाची सवय होती, त्यामुळे पृथ्वीवर तो अंतराळवीर जसे चंद्रावर उडया मारायचे तसेच पण शेकडो फूट उंच उडी मारायचा.परंतु चित्रपट काढताना निर्मात्याला उडया मारणा-या सुपरमॅनचे अॅनिमेशन करणे अवघड जावू लागले आणि त्यांनी डी. सी. कॉमिक्सला विनंती करुन सुपरमॅनला उडायला लावले.

२. खरोखरच्या युध्दात सुपरमॅन

जगभरात सुपरमॅनच्या लोकप्रियतेला तोड नव्हती. याचाच फायदा घ्यायचा म्हणून युनीसेफ या जागतिक संघटनेने अमेरिकेच्या मदतीने सन १९९६ ला सुपरमॅन – डेडली लिगसी हे कॉमिक्स तयार केले, ज्यामध्ये भुसुरुंग बॉम्ब पासून लहान मुलांनी दूर कसे रहायचे याचे शिक्षण दिले. युध्दग्रस्त बोस्नीया देशात या कॉमिक्सचे फुकटात वाटप केले गेले. अशा रितीने कॉमिक्स मधील सुपरमॅनने खरोखरच्या युध्दात देखिल भाग घेतला. दोन वर्षांनी पुन्हा कोस्टाारीकाच्या युध्दात सुपरमॅनने दुस-यांदा भाग घेतला.

३. हिरोच्या जीवावर उठलेला सुपरमॅन :

१९५१ साली प्रसिध्द चित्रपट हिरो जॉर्ज रीव्हने टी.व्ही. वरील ऍडव्हेंचर्स ऑफ सुपरमॅन मालिकेत काम केले. ती मालिका आणि सुपरमॅन मधील जॉर्ज प्रेक्षकांना इतका आवडला की जॉर्ज हा एक सामान्य माणूस आहे आणि मॅन ऑफ स्टील नाही हे अनेकांना पटले नाही. म्हणूनच एक दिवस एका मुलाने भरलेली रिव्हॉव्हर जॉर्जच्या छाताडावर रोखली. जॉर्जच्या शरिरातून गोळी जात नाही असा समज असलेल्या त्या मुलाने जॉर्जला घामच फोडला.

४. पहिला सुपरमॅन फक्त १३० डॉलर

कोटयावधी रसिकांची पसंती असणारा व हजारो कोटी रुपयांची किंमत असणारे सुपरमॅन कॅरेक्टर जेरी सिगल व जो शस्टर या दोन हायस्कूल विद्यार्थ्यांनी तयार केले. परंतु कांही कारणास्तव त्यांनी १९३८ ला फक्त १३० डॉलर्सना सुपरमॅनचे हक्क डिटेक्टीव्ह कॉमिक्स कंपनीला विकले. ती त्यांची भयंकर चूक ठरली. डी.सी. कडून हक्क परत मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी व त्यांच्या वारसांनी खूप केला परंतु त्याला यश लाभले नाही.

५. शापीत सुपरमॅन :

सुपरमॅनचे जनक जेरी व जो यांना जसा सुपरमॅन लाभला नाही तसाच सुपरमॅनशी निगडीत अनेकांना तो लाभला नाही. म्हणूनच सुपरमॅनचा शाप असा शब्दप्रयोग सुरु झाला. वर उल्लेख केलेला हिरो जॉर्ज रीव्हने कालांतराने आत्महत्या केली. दुसरा हिरो ख्रिस्तोफर घोडयावरुन पडल्यामुळे पॅरलाईज्ड झाला. नुसते हिरोच नव्हेत तर काम करणा-या इतरांनाही आयुष्यात त्रास झाला. सगळयात वाईट म्हणजे वयाच्या केवळ सात महिन्याचा असताना बाल सुपरमॅनची भूमिका करणारा ली पण या शापातून सुटला नाही. वयाच्या १४ व्या वर्षीच अत्यंत हलाखीत ली मृत्यु पावला.

563 total views, 1 views today