बाईक्सचे सुंदर मॉडेल आणि त्याचा वेग हे कोणालाही वेड लावू शकते. झपाट्याने बदलत असलेल्या जगात बाईकचा वेगही कमालीचा वाढला आहे. म्हणजेच, आता हजारो किलोमिटरचा प्रवासही बाईकने करता येऊ शकते. डॉज टॉमहॉक ही अशीच एक बाईक आहे. ही बाईक एका तासात 560 किलोमिटरचा प्रवास करू शकते. स्मार्टदोस्तने अशाच काही बाईक्सची माहिती नेटवरून जमा केली आहे.

1. डॉज टॉमहॉक:

डॉज टॉमहॉकया अनोख्या नावाची यादीत पहिल्या नंबरवर. यप्रचंड वेळ असलेल्या या बाईकमध्ये 10 सिलेंडरचा वापर करण्यात आला आहे. तसेच यामध्ये 90 डिग्री V टाइप इंजन लावण्यात आले आहे, ज्यामुळे बाईकचा वेग 350 मैल प्रति तासापर्यंत पोहोचतो. म्हणजेच ही बाईक तिच्या टॉपस्पीडमध्ये आल्यावर 560 किलोमीटर एवढे अंतर केवळ एका तासात पूर्ण करेल. म्हणजे दिल्ली ते मुंबई दरम्यान असलेले 1400 किलोमिटरचे अंतर या बाईकच्या साह्याने केवळ अडीच तासात पूर्ण करता येईल. तसेच दिल्ली ते अहमदाबाद हे 930 किलोमिटरचे अंतर या बाईकने केवळ 1.40 तासात पूर्ण करता येईल. अगदी हवाई सफरीपेक्षा फास्ट.

2. सुझुकी हायाबुसा (GSX1300R)

जपानी भाषेत हायाबुसा म्हणजे फास्टेस्ट पक्षी. या जापानी बाईकमध्ये 1340 cc इंजनसोबतच 16 सिलेंडर लावण्यात आले आहे. या बाईकमध्ये लिक्वड-कूल्ड इंजिनचा वापर करण्यात आला होता, या बाईकचा वेग 392 km/h एवढा आहे. मोटरसायकल कन्झुमर न्युजच्या मते हयाबुसा फक्त स्पीडमुळे नव्हे तर तिच्या सर्व फीचर्समुळे जगातील एक उत्तम बाईक आहे.

3. MTT टरबाइन सुपरबाइक Y2K:

या बाईकमध्ये रोल्स रॉयसचे 250-C20 टर्बो इंजन लावण्यात आले आहे. ही बाईक एका तासात 227 मैलाचा वेग पकडू शकते. म्हणजेच एका तासात ही बाईक 365 किमीचे अंतर पार करते. सोबतच या बाईकमध्ये 2 ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा वापर करण्यात आला आहे.

4. होंडा CBR1100XX ब्लॅकबर्ड :

ही बाईक जपानची लिडिंग कंपनी होंडाची आहे. या बाईकमध्ये 1137 cc लिक्वड-कूल्ड इंजिनचा वापर करण्यात आला आहे. सोबतच यामध्ये चार सिलेंडर देण्यात आले आहेत. या बाईकचे शक्तीशाली इंजिन एका तासात 190 मैल एवढा वेग पकडते. या बाईकची टॉपस्पीड 310 km/h पेक्षा जास्त वाढू शकते.

5. यामाहा YZF R1:

यामाहाच्या या बाईकमध्ये 4 सिलेंडर आणि 20 वॉल्वसोबत लिक्विड-कूल्ड आणि DOHC डबल ओव्हरहेड कॅमशाफ्ट चा वापर करण्यात आला आहे. ही बाईक एका तासात 186 मैल एवढा वेग वाढवू शकते. ही बाईक टॉपस्पीडवर असताना 297 km/h च्या वेगाने धावते.

595 total views, 1 views today