स्टिव्ह बॉल्मर मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ. जगातल्यां सर्वात शक्तिशाली अश्या एका कंपनीचे नेतृत्व केलेल्या या यशस्वी नायकाने निवृत्तीनंतर वॉशिंग्टन विद्यापीठातल्या पदवीदान सोहळ्यात एक भाषण केले. जगभरातून विद्यापीठात शिकायला आलेले विद्यार्थी त्यांचे पालक त्या सोहळ्याला उपस्थित होते. अत्यंत सकारात्मकता आणि प्रचंड उत्साह यांनी ठासून भरलेल्या शब्दात स्टिव्ह बॉल्मर यांनी त्यावेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केलं. यशाची काही सूत्रं पण सांगितली. स्मार्टदोस्तने तुमच्यासाठी त्या भाषणातील यशाची 5 सूत्रं जमा केली आहेत. यशस्वी भव …..

1. संधी हे नव्या काळाचं खरं रूप आहे

“देअर हॅज नेव्हर बीन अ बेटर टाइम, अपॉर्च्यूनिटी हे या नव्या काळाचं खरं रूप आहे. संधी तुमची वाट पाहत आहे…
सगळीकडे संधी आहेत, सगळीकडे यशाच्या शक्यता ठासून भरलेल्या आहेत. नाराज व्हावं, निराशा रहावं असं अवतीभोवती काहीच नाही अशा काळात तुम्ही जन्माला आला आहात. शिकून पदवी घेऊन काम करायला सज्ज व्हा”
फक्त अमेरिकेत हे असं चित्र आहे, आणि इतर देशात नाही असं काही नाही. संधीचं नवं वारं सगळीकडे खेळतंय.

2. दिमागसे नही तो दिलसे काम करना है….

स्टिव्ह म्हणाले “शाळा सोडली. शाळेत मन रमत नव्हतं. अभ्यासात काही मजाच येत नव्हती. तिथं शिकायचं म्हणून शिकत बसलो असतो तरी वेळ वायाच गेला असता. मग मी शाळा सोडली. किंवा शाळेनं मला सोडलं असं म्हणा. म्हणजे मी एक साधा स्कूल ड्रॉप आउट. तरी मायक्रोसॉफ्टर्पयत पोहचलो. माङया आई वडिलांना तर वाटत होतंच की माझं डोकं सटकलेलं आहे. त्यात माझं नशीब चांगलं म्हणून त्यांनाही शिक्षणातलं फारसं काही कळत नव्हतं. ग्रॅज्युएशन पूर्ण करणं म्हणजे आयुष्याची पूर्तता असं त्यांना वाटलं नाही कारण त्यांच्यापैकी कुणीही ग्रॅज्युएट नव्हतं. त्यामुळे नाही शिकलं पोरगं याचं फार काही वाटण्यापेक्षा माझ्यामुळे मायक्रोसॉफ्टचंच काही खरं नाही असं त्यांना वाटत होतं.
मी माझ्या मनाचा कौल ऐकला. मला हवं तेच मी जगलो. भरभरून जगलो. जे वाटलं ते करून मोकळा झालो. अन तेच महत्वाचे आहे. दिमागसे नाही तो दिलसे काम करना है….

3. हॅव अ पॉईण्ट ऑफ व्हयू.

संधी काय हे तुम्हाला दिसलं पाहिजे. मुळात तुमच्या नजरेलाच वेगवेगळ्या संधी दिसल्या पाहिजेत. काही माणसांना फक्त अडचणी दिसतात, वाटेतले अडसर दिसतात, काटेकुटे दिसतात. काहींना त्या अडथळ्यातही वाट दिसते, त्या वाटेच्या पलीकडच्या काही गोष्टी दिसतात.
त्यामुळे आव्हान आणि अडचणी यांच्याकडे तुम्ही कसं पाहता हा तुमचा दृष्टिकोन महत्वाचा. तो शिकता येत नाही किंवा उसना मागून आणता येत नाही. तो आपला आपल्याला बदलावा लागतो. विकसित करावा लागतो. मला काय हवं हे माहिती असेल तर मी ते कसं शोधणार हा माझा दृष्टिकोन.
अनेकदा तर समोर काहीच संधी नसतात, वाटाही नसतात. पण केवळ तुमच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी त्या वाटा निर्माण होतात. ‘पॉईण्ट ऑफ व्ह्यू क्रिएट्स अपॉर्च्यूनिटी’. ट्वी¦टरचा सहसंस्थापक जॅक डोर्सी. त्यानं ट्वीटरची आयडिया लोकांना सांगितली तेव्हा कुणाला वाटलं तरी होतं का की हे माध्यम इतकं प्रभावी ठरेल. ती संधी त्यानं स्वत:साठी तयार केली. संधीची वाट पाहत बसणं, ती कुणी देईल म्हणून इतरांकडे पाहणं हे आता नव्या काळात चालणार नाही. आता आपल्याला त्या स्वत:साठी तयार कराव्या लागतील.

4. आपल्या कामाविषयी खात्री बाळगा

‘मायक्रोसॉफ्ट’ने आपली सॉफ्टवेअर्स व्यावसायिकांना विकायचा प्रयत्न केला तेव्हा अनेकांनी आम्हाला सांगितलं होतं की हे चालणार नाही. हे कुणी वापरणार नाही, याचा काही उपयोगही होणार नाही. या सगळ्या नकारात्मकतेचा आमच्यावर इतका मारा होता की खरंच आपल्याला काहीच व्यावसायिक यश लाभणार नाही असं वाटण्याची शक्यता होती. पण तसं वाटून थांबलो असतो तर मग आपलाच आपल्यावर आपल्या कामावर विश्वास नाही हे सिद्ध झालं असतं. लोकांना आपल्या कामाविषयी काय वाटतं हे महत्त्वाचं नाही. आपल्याला आपल्या कामाविषयी किती खात्री आहे हे जास्त महत्त्वाचं. हे कायम लक्षात ठेवायला हवं की, पिकलं फळ आयतं आपल्या खिशात पडत नसतं. आपण रोप लावून, झाड वाढवून, फळं येण्याची वाट पहायची असते.

5. बी हार्डकोअर

आपण नेल्सन मंडेलांच उदाहरण घेऊ. कृष्णवर्णीयांसाठी त्यांनी दक्षिण अफ्रिकेत लढा पुकारला तेव्हा त्यांना लोकांनी सांगितलंच असेल ना की तुम्ही जे म्हणताय ते या जन्मात होणं शक्य नाही. जमणारच नाही. पण तरी त्यांनी सतत, दीर्घकाळ, अथक लढा दिला. किती वर्ष लागली त्यांना. किती अफाट संघर्ष केला. मात्र या संघर्षासाठी त्यांच्याकडे प्रचंड संयम होता. प्रचंड जिद्द होती. खरंतर त्या संयमाची आणि जिद्दीचीच सगळी परीक्षा असते. तुमच्याकडे भरभरून जगण्याची तयारी आहे, तुम्हाला गोष्टी वेगळ्या दिसतात, पण तुमच्याकडे संयम नाही, सातत्यानं काम करण्याची तयारी नाही, चिकाटी नाही तर काय उपयोग बाकी तुम्ही कितीही गुणवान असण्याचा?
तुम्ही किती दीर्घकाळ काम करू शकता, किती चिकाटी दाखवता यावर तुमचं यश किती छोटं, किती मोठं हेही ठरतंच.
बोला, किती वाट पहायची तुमची तयारी आहे? मुख्य म्हणजे आहे का? ती असेल आणि सारं जग विसरून आपण जे करतो त्यातला आनंद विलक्षण हावरटपणो जगता येणार असेल तर जग तुमचं!
पण तुम्ही म्हणाल की, आज आत्ता, एका रात्रीत मला जग जिंकून दाखवायचंय. तर बघत रहा स्वप्न, कुणी अडवलंय? पण स्वप्न अशी पूर्ण होत नसतात. हे तरी निदान आपल्याला माहिती हवं.

394 total views, 1 views today