आयुष्यात यश कोणाला नको असते? आपल्या संसारात, सोशल लाईफमध्ये अन करिअरमध्ये प्रत्येकाला यशस्वी व्हावे असे हमखास वाटत असते. त्यासाठी ते प्रयत्नही करत असतात. परंतु कैकवेळा यश त्यांना हुलकावणी देते. अन त्यातून मिळते ती निराशा. आज स्मार्ट तुम्हाला संसार अन सोशल लाईफमध्ये यशस्वी होण्याच्या टिप्स देणार नाही तर तुमच्या वर्कलाईफ, करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी 5 नुक्से सांगणार आहे. अन ते समजावून सांगताना “फुटबॉल” चा सहारा घेणार आहे. फुटबॉल खेळ आपल्याला कामाच्या ठिकाणी करिअरमध्ये कसे यशस्वी होता येईल याच्या टिप्स देतो हे वाचले तर तुम्हालाही यश नक्कीच गवसेल..

1. मेक शॉर्ट पासेस :

दोस्तहो, करिअरमध्ये टीममध्ये काम करताना सुरुवातीला आपण सर्वजणच एक टार्गेट सेट करून ठेवतो. जे गरजेचे असते. जसं फुटबॉलमध्ये मॅच जिंकणं हे टार्गेट ठेवले असते. बऱ्याच वेळा ही मोठी तर्गेत्स दबाव आणू शकतात. पण टार्गेट मोठं असलं तरी त्याचे अचिव्हेबल टप्पे करता येऊ शकतात. जसे फुटबॉलमधील छोटे छोटे पासेस. आपल्यावर मॅनेजमेंटने, बॉसने हे काम थोपवलंय असं वाटून न घेता, ते आपल्या स्पीडने, आपल्या आवाक्यात घेऊन काम करता येऊ शकते. दुसरं म्हणजे टीममधल्या प्रत्येकाचा स्पीड वेगवेगळा असतो, एकाला जमतंय तर ते दुसऱ्याला का जमू नये असा आग्रह धरण्यात काही अर्थ नाही किंवा मला जमतंय आणि माझा सहकारी का असा बिनकामाचा असंही म्हटलं तर टीमचं टार्गेट अचिव्ह होत नाही. त्यावर उपाय एकच, आपल्या टार्गेटचे छोटे टप्पे करायचे, एक टप्पा गाठला की पुढचा. मग त्या पुढचा. शॉर्ट पासेस देत घेत जायचे. गोल नक्की मारता येईल.

2. डोण्ट लूज द बॉल :

जेव्हा एखादी टीम बॉलवरचा कण्ट्रोल जाऊ देत नाही, त्याच्यावरची मालकी सोडत नाही त्यावेळी समोरची टीम फ्रस्ट्रेट होत जाते, त्यांचा संयम सुटतो.

टीममध्ये काम करताना हेच करणं अपेक्षित असतं. आपल्या कामावरची पकड तर सैल होऊ द्यायची नाही. टार्गेट अचिव्हेबल ठेवायचं त्यातून काम करणाऱ्यांना ऊर्जा मिळते. मुख्य म्हणजे आपण फार वेगानं जातोय किंवा ट्रॅक सोडून भलतीकडेच चाललोय यावरही नजर ठेवता येतेच. छोटे पास, संघातल्या प्रत्येकाचा सहभाग आणि बॉलवरचं नियंत्रण असले तर मॅच हातची जात नाही. आणि गोल होता.

3. कीप कूल :

फुटबॉलमध्ये जिंकण्याचा प्रवास सोपा मुळीच नसतो. तुमच्या गोलपोस्टवर आक्रमण होते, अनेक गोल होता होता राहतात, काही गोल तुमच्यावर होतातही. पण म्हणून काही तुम्ही डिस्टर्ब व्हायला पाहिजेच असे नाही. इट्स पार्ट ऑफ लाईफ. इमोशनल न होता कूल रहा. एकदम शांत. अवघड परिस्थितीतही स्वत:वरचाही ताबा अजिबात ढळू देवू नका. आपणही काम करताना, चिडतो, फ्रस्ट्रेट होतो. त्या फ्रस्ट्रेशनच्या नादात अनेक चुका करतो. फुटबॉलचा मंत्र शिकण्यासारखा आहेच. कीप कूल. चुका होतातच. गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, त्यावेळी शांत रहायचं. म्हणजे अनावश्यक चुका टाळता येतात.

4. स्वीच युवर रोल :

फुटबॉल टीममध्ये प्रत्येक खेळाडूचे रोल ठरलेले असतात. डिफेण्डर, सेण्टर फॉरवर्ड, मीड फिल्डर अशा ज्याच्या त्याच्या भूमिका ठरलेल्या. पण माझ्या पायात चेंडू आहे तर माझा मीच जाऊन गोल करीन, कुणालाच पास देणार नाही, असा हटवादीपणा जीनाकानाऱ्या संघात दिसत नाही. उलट अत्यंत सफाईनं प्रत्येक खेळाडू आपली भूमिका बदलत असतात. जसा चेंडू पुढं जाईल, तसतसा अंदाज घेत त्या त्या ठिकाणचा खेळाडू पुढे सरकत असतो. मुख्य म्हणजे असे रोल बदलण्यात कुठल्याच खेळाडूला कमीपणा जिंकणाऱ्या टीमला वाटत नाही.

टीम स्पिरीट वेगळं काय असतं? आपलं टार्गेट जसं, त्या कामाची मागणी जशी तसतशी टीममधल्या प्रत्येकानंच आपली भूमिका बदलून ते ते काम करायचं असतं. अमुक काम मीच का करू, मला हे काम सांगताच कसं असं टीममध्ये कुणाला वाटलं तर टीम हरणारच. मीच एकटा गोल करीन, बाकीचे मागे असा हट्ट करणारे खेळाडू टीमला हरवतात.

घोळ न घालता, रोल असे स्वीच करणं ज्या खेळाडूंना उत्तम जमत तेच यशस्वी होतात.

5. नोबडी इज बिगर दॅन टीम :

फुटबॉलच्या वर्ल्डकप फायनलची 2014 मधील एक गंमत सांगतो. जर्मनीने आर्जेन्टिनाचा 1 – 0 ने पराभव केला. ज्यानं विनिंग गोल केला तो मारिओ गोट्झे, मिडफिल्डर. तो काही प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता, बाहेर आराम करत होता. एक्स्ट्रॉ म्हणून तो ऐनवेळेस संघात आला आणि विनिंग गोल करून गेला. अर्जेण्टिनाकडे मेस्सी होता पण जर्मन टीममध्ये मात्र असा एकही टीमपेक्षा मोठा खेळाडू नव्हता. नॉट अ सिंगल प्लेअर इज इन्डिस्पेन्सिबल हे त्यांचं सूत्र होतं. प्रत्येक खेळाडू महत्त्वाचा आणि तो त्याक्षणी त्याच्या पूर्ण क्षमेतनंच खेळायला हवा. प्रत्येक खेळाडूच्या स्कीलला त्यांनी विशेष महत्त्व दिलं. नव्या वर्ककल्चरमध्ये हे सूत्र महत्त्वाचं ठरायला हवं. टीममधला प्रत्येक माणूस महत्त्वाचा. त्याचं काम, त्याचं कौशल्य महत्त्वाचं. एखादाच सुपरपरफॉर्मर सगळ्यांपेक्षा वेगळा असू शकतो, पण तो म्हणजे टीम नव्हे. तो नसला तरी टीम जिंकलीच पाहिजे, हाच सामान्य नियम.

जर्मनीच्या टीमकडून, फुटबॉलकडून हेच तर शिकायचंय की, स्टार्स नव्हे, प्लेअर्सच चॅम्पियन ठरतात.

करिअरमध्ये नव्या वर्ककल्चर यशस्वी होण्यासाठी हेच तर अपेक्षित आहे जे फुटबॉल आपणास अचूक समजावून सांगतो.

466 total views, 1 views today