सन 1987 साली डॉक्टर ऑस्कर यांना दक्षिण मेक्सिकोतील ग्वाटेमाला भागातून एक लिफाफा पोस्टाने आला अन त्यातील मजकूर वाचून ऑस्करनी ताबडतोब प्रवासासाठी बांधाबांधी सुरु केली. असे काय होते त्या पत्रात?

ते पत्र ग्वाटेमाला जंगलातील शेतकऱ्याने त्याच्या शेतात सापडलेल्या भल्यामोठ्या दगडी चेहऱ्याबद्दल लिहिले होते अन सोबत एक 1950 साली घेतलेला फोटो पाठवला होता. जो जगाचा इतिहास बदलून टाकू शकला असता. ऑस्करपुढे दोन आव्हाने होती. मेक्सिकोमध्ये त्याकाळी रक्तरंजित सिव्हील वॉर सुरु होते अन त्या परिस्थितीत ज्याच्या शेतात हे दगडी डोके होते त्याचा पत्ता शोधणे म्हणजे मृत्युला सामोरे जाण्यासारखे होते. तरी सुद्धा ऑस्करनी हार मानली नाही अन तो शेतकरी व जंगलातील ती जागा शोधली. परंतु तो पर्यंत वेळ निघून गेला होता अन त्याजागी राहिला होता एक विद्रूप चेहरावजा दगड. वीस फुटाचा भला मोठा दगड. ज्यावरील नाक, डोळे, ओठ अगदी सर्व काही नष्ट केले होते. स्थानिक अतिरेकी गाववाल्यांनी त्या चेहऱ्याचा वापर युध्दकला शिकण्यासाठी टार्गेट म्हणून केला होता. बिनडोक्यांनी डोक्याची पूर्ण वाट लावली होती. अन इतिहासाची सुद्धा..

असे नाही की दक्षिण मेक्सिकोमध्ये अश्या प्रकारची दगडी डोकी सापडली नव्हती. सुमारे ख्रिस्तपूर्व 400 सालीची ओल्मेक संस्कृतीने घडवलेली अनेक दगडी डोकी समुद्रासपाटीला सापडली होतीच. पण त्यातील चेहरे ओबडधोबड अन आफ्रिकन लोकांसारखे होते तर डॉक्टर ऑस्करयांच्याकडील फोटोतील चेहरा हा आखीव रेखीवतर होताच पण आफ्रिकन नव्हे तर युरोपियन लोकांसारखा होता. तसेच ऑस्करच्या मते राहिलेला दगडही फार पुरातन होता जणू ओल्मेक संस्कृतीच्याही पूर्वीचे. म्हणजे फार पूर्वी त्याजागी कोणती तरी वेगळी संस्कृती वावरत होती.

अन हो चेहऱ्याच्या खाली जमिनीत संपूर्ण धड असण्याची शक्यता आहे असे ऑस्करनां वाटले म्हणून त्यांनी खोदकाम सुरूही केले परंतु यादवी युद्धामुळे त्यानां त्या जंगलातून काम अर्धवट सोडून पळून जावे लागले. रहस्याला अन इतिहासाला मागे सोडून..

नंतर हॉलीवूडने या शोधावर बेस्ड “रीव्हीलेशन…बियॉंड” नावाचा चित्रपट काढला. परंतु आज त्या डोक्याची, जागेची जगाला काही कल्पना नाही.. सर्व काही एखाद्या हरवलेल्या इतिहासासारखे. Lost Head of Guatemala has become a mystery… unsolved mystery

नवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.

427 total views, 1 views today