अनेकांना किंवा जवळ जवळ प्रत्येकाला काही न काही गोष्टीची भीती असते. त्याला फोबिया असे म्हणतात. फोबिया हा एक प्रकारचा आजारच आहे ज्यामध्ये लोकाना एखाद्या गोष्टीची व ती गोष्ट नसल्याची भीती असते. म्हणजे बघा बऱ्याच नवरोबांना सासूबाईंची भीती असते. म्हणजे ते तसे बोलून दाखवत नाहीत पण त्यांच्या वागणुकीत प्रचंड बदल होतो असे दिसून आले आहे. मेडिकल सायन्समध्ये सासूची भीती असण्याला पेंथर्फोबिया का पँथरफोबिया (Pentheraphobia) असे नावसुद्धा आहे. अशी अनोखी भीती जगात असू शकती असे जेव्हा स्मार्टदोस्तला कळाले तेव्हा तयार झाली फोबियाची यादी. वाचा तर माणसे कशा कशाला भितात.

1. सेलफोन जवळ नसल्याची भीती : नोमोफोबिया

शर्ट पँटचे खिसे तपासता तपासता अचानक सेलफोन नसल्याची जाणीव झाली… अन शरीराचा एक भागच नसल्याची भावना जर तुम्हाला होत असेल तर नक्की समजा की तुम्ही नोमोफोबिया या आजाराचे शिकार होत आहात. इंग्लंडमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले कि मोबाईल वापरणाऱ्या ५३ टक्के लोकाना हा आजार झाला आहे. मोबाईल जवळ नसणे वा कव्हरेज नसणे वा त्याची बॅटरी / बॅलंस संपल्याचे लक्षात आल्यावर ही मंडळी फार बिथरतात. डॉक्टरांनी असे पण शोधून काढले आहे की, नोमोफोबिया मंडळी आपला फोन स्वीचऑफ करायलाही घाबरतात. तुम्ही ? ? ?

2. बहुल्याबद्दल भीती : पेडीओफोबिया

असे दिसून आले आहे की काही लोकाना बाहुल्यांबद्दल फार भीती असते. म्हणजे बार्बी सारख्या सुंदर सुंदर बाहुल्या नुसत्या बघितल्यावरसूद्धा हे लोक प्रचंड घाबरतात. शास्त्रंज्ञाच्या मते पेडीओफोबिया (Pediophobia) झालेल्या लोकांना त्यांच्या जीवनात जिवंत माणसांऐवजी बाहुलीच येईल का अशी भीती असते. त्याना एखाद्या रोबोसारखी बाहुलीच त्यांच्या आयुष्यात येत आहे असे विचित्र भास होतात.

3. आरश्याची भीती : इसोपट्रोफोबिया

आरश्यासमोर तासन तास उभे राहून स्वतःला निरखून पहायची अनेकांना सवय असते. अरश्यासमोर पोझ देऊन काचेत दिसणाऱ्या आपल्या प्रतिकृतीचे फोटो काढून घेण्याची हौस तर फार जणांना. अशा परीस्थितीत कोणालातरी आरश्याची भीती (Eisoptrophobia) वाटत असेल तर विचित्रच वाटते. परंतु हे सत्य आहे. इसोपट्रोफोबिया झालेल्या अभाग्याना आरश्याची भीती वाटते. आरश्यातून अमानवी शक्ती त्याचाकडे येईल असे वाटून ते आरसा वापरायचा सोडून देतात. आरसा फुटला तरी या शक्ती आपला ताबा घेतील असे सुद्धा यांना वाटते.

4. लांबलचक शब्दांची भीती : हिप्पोपोटोमॉन्सट्रोसेसक्यूपेडीओफोबिया ? ?

यादीतील स्मार्टदोस्तलादेखील भीती वाटवणारा फोबिया. खरोखरच टाईप करताना त्रास झाला. अन शब्द बरोबर आलाय का नाही ते माहित नाही. असो. तर ही….पेडीओफोबिया झालेल्यांना लांबलचक शब्दांची भीती वाटते हे कळालेच असेल.
चला लवकर पुढे जावूया. शेवटचा फोबिया वाचूया. कारण फारच वेगळा फोबिया आहे. हा फोबिया खरोखरच कोणाला झाला असेल का अशी स्मार्टदस्तची स्वतःची शंका. पण सायन्स जर्नलमध्ये याची नोंद आहे म्हणून येथे यादीतपण त्याची नोंद..

5. सुंदर मुलीची भीती : क्यालीगाय्नोफोबिया

सुंदर मुलींकडे आकर्षित होणारे अनेक. अनेक सुंदर मुलींकडे एकाचवेळी आकर्षित होणारे देखील अनेक. परंतु सुंदर मुलीची भीत वाटणारे ?
खरच काही लोकांना सुंदर मुलीची भीती वाटते. असे नाही की या लोकाना मुलींची भीती असते. मुलींबरोबर हे अगदी कम्फर्टेबल असतात. पण एखादी सुंदर मुलगी पाहिली वा चुकून ती जवळ आली तर या क्यालीगाय्नोफोबियावाल्यांना एकदम नर्व्हस व्हायला होते. एक लक्षात ठेवा ही जलन नव्हे तर आजार आहे. अन तो मुलग्याला व मुलींनापण होवू शकतो. मुलींनादेखील जर इतर सुंदर मुलींची भीती वाटत असेल तर क्यालीगाय्नोफोबियाच झालाय असे म्हणतात.

561 total views, 1 views today