गेली 500 वर्षे मंद स्मित हास्याने जिने जगाला भुरळ पाडली ती.. 2015 साली जी 5120 कोटी 41 लाख रुपयांची.मालकीण होती ती…मोनालिसा..भुवया नसलेली मोनालिसा..

दोस्तहो, प्रख्यात चित्रकार लिओनार्डो द विन्चीने 1503 साली रंगवायला सुरु केलेले जे चित्र 1517 साली पूर्ण झाले त्या “मोनालिसा” पेंटिंग बद्दल आज स्मार्ट लिहतोय. मोनालिसा कोण होती पासून आज ती काय आहे हे सारे तुम्ही वाचणार आहात या विलक्षण यादी मध्ये…strange facts of Monalisa in Marathi..

आशा आहे तुम्ही ही विलक्षण पण सत्य गोष्ट नक्की शेअर कराल.

1. मोना डार्लिंग मोनालिसा

“यादों कि बारात” पिक्चर मध्ये अजितचा फेमस डायलॉग आठवला. आपल्या पार्टनरला “मोना डार्लिंग”, “मोना डार्लिंग” असे तो बोलवायचा.

असो, लिओनार्डो विन्चीच्या ज्या चित्राला “मोनालिसा” म्हणून ओळखले जाते त्या चित्राचे मुळ नाव मोनालिसा असे नव्हतेच.

ते पेंटिंग तयार करताना विन्चीच्या समोर बसली होती ती “लिसा घेरार्दिनी” (Lisa Gherardini). तिच्या श्रीमंत नवऱ्याने (Francesco Del Giocondo) विन्चीला बायकोचे पोर्ट्रेट तयार करायला सांगितले होते. म्हणून त्या पेंटिंगचे पहिले नाव La Gioconda असे होते. नंतर त्याचे नाव “Monna Lisa” असे द्यायचे ठरले. इटालियन भाषेत monna हा “मडोना”च लघु फॉर्म. मडोना म्हणजे “माझी डार्लिंग”

परंतु पेंटिंग पूर्ण झाल्यावर दा विन्चीने स्पेलिंग मिस्टेक करून तिची ओळख “Monna Lisa” ऐवजी “MonaLisa” अशी जगाला करून दिली.

2. सम्राट नेपोलियनचे एकतर्फा प्रेम

जग जिंकायची स्वप्ने बघणाऱ्या फ्रांसचा सम्राट नेपोलियन (Napoleon) मोनालीसावर एकतर्फा प्रेम करायचा. तो त्या चित्रातील लेडीवर म्हणजे चित्रावर फिदा होता. म्हणून त्याने ते चित्र स्वतःच्या बेडरूम मध्ये लावले होते अन कित्येक तास तो त्या चित्राकडे बघत बसायचा. त्या चित्रातील मोनालिसाच्या सौंदर्याने मोहित होऊन त्याने इटालियन लेडीशी लग्न करायचे ठरवले अन चित्रातील “लिसा घेरार्दिनी”च्या घराण्यातीलच तेरेसा (Teresa Guadagni) नावाच्या मुलीशी लग्न केले.

3. मृत्यूदाती मोनालिसा

मोनालीसावर फिदा होणारे कैक. हे पेंटिंग 1815 पॅरीसच्या लूव्हर (Louvre) वास्तुसंग्रहालायात लोकांसाठी प्रदर्शित करण्यात आले. जवळपास दहा लाख चित्रे त्या ठिकाणी आहेत परंतु मोनालिसाचे दर्शन घ्यायलाच लाखोंनी लोक जातात. म्युझियमच्या जिन्यावर तिच्या नावे फुलांचे हजारो बुके अर्पण केल जातात. इतकेच नव्हे तर मोनालिसाला लिहलेली हजारो प्रेमपत्रे लूव्हरच्या पत्त्यावर येतात. तिच्या नावाने एक खास मेलबॉक्स तिथे आहे.

सन 1852 साली मोनालिसावेड्या मास्पेरो (Luc Maspero) नावच्या चित्रकाराने “तुझ्या स्मितहास्याने मी वेडा झालोय.. अन आता मारायला मी तयार..” असे पत्रात लिहून आत्महत्या केली. 1910 ला तर कहरच झाला. एका मोना प्रेमीने चित्राच्या समोर उभे राहून तिला बघत बघत स्वतःळा गोळी झाडून मृत्युला कवटाळले. “Mona Lisa often made men do strange things,” आर. ए. स्कॉत्तीने Vanished Smile मध्ये लिहिले आहे..


4. मोनालिसाच्या भुवयांचे रहस्य

मोनालिसाला भुवयाच नाहीत हे बघून अनेकांना धक्काच बसतो. लिओनार्डो द विन्ची सारख्या महान चित्रकाराने अशी भयंकर चूक केलीच कशी?

काहींच्या मते कदाचित भुवया उडवायची फॅशन असेल. परंतु रिसर्च तसे सांगत नाही. काहींच्या मते मोनालिसाचे हे चित्र अजूनही अपूर्ण आहे. पूर्ण व्हायच्या आधीच हे चित्र प्रदर्शित झाले आहे. कारण विन्ची हा परफेक्शनिस्ट होता. तो चित्रातील बारकावे अगदी मन लावून पूर्ण करायचा.

पण हे ही सत्य नाही हे 2007 साली केलेल्या अल्ट्रा डिटेल डिजिटल स्कॅनमध्ये सत्य जगापुढे आले. खरे पाहता विन्चीने मोनालिसाच्या भुवया चित्रित केल्या होत्याच परंतु वेळोवेळी केलेल्या साफसफाईमध्ये रंग फेड होत गेले. भुवया नसलेले कपाळ जगापुढे आले.

240 मेगापिक्सेल मल्टी स्पेक्टर इमेजिंग कॅमेऱ्याने केलेल्या परीक्षणात विन्चीने जवळपास रंगाचे 30 लेयर्स/स्ट्रोक्स चित्रात दिले होते अन भुवयांचे बारकावे अचूक दाखवले होते हे सिध्द झाले.

हुश्श.. म्हणजे मोनालिसाला भुवया होत्या तर.

4. मोनालीसावर हल्ला अन तिची चोरी

आज मोनालिसा लूव्हर संग्रहालयातील जगातील एका अत्यंत सुरुक्षित खोलीमध्ये बुलेटप्रुफ काचेच्या मागे सुखात आहे. परंतु हे सुख तिला सुखासुखी मिळाले नाही. तिच्यावर अनेकांनी प्रेम केले पण अनेक वेळा हल्ला ही झाला. 1956 साली एका माथेफिरूने तिच्यावर दगड फेकला तर 2009 एका रशियन पर्यटकाने काचेचा मग फेकून मारला. तिच्यावर अॅसिड फेकण्यात आले तर तिची चोरी पण केली गेली.

1911 साली मोनालिसा अचानक म्युझियम मधून गायब झाली. तिच्या चोरीने साऱ्या फ्रांसवर शोककळा पसरली. काही केल्या ती सापडली नाही. पोलिसांनी अनेकांना पकडले तर चक्क दुसऱ्या महान चित्रकारावर म्हणजे पाब्लो पिकासो (Pablo Picasso) वर पण संशय व्यक्त करण्यात आला. परंतु मोनालिसा काही सापडली नाही.

परंतु दोन वर्षांनी इटलीमध्ये “व्हीन्सेन्झो पेरुगिया” Vincenzo Perugia नावाच्या माणसाला मोनालिसाची विक्री करताना पकडण्यात आले. विशेष म्हणजे हे महाशय लूव्हर म्युझियम मध्येच कामाला होते.

व्हीन्सेन्झो इटलीचा राष्ट्रभक्त होता अन मोनालिसा ही इटलीची आहे म्हणून त्याने एके संध्याकाळी कोटाच्या आत तिला लपवले अन चोरी केली.

काहींच्या मते मार्क़ुइस (Marquis of the Vale of Hell) नावाच्या माणसाने व्हीन्सेन्झो कडून हे काम करवून घेतले. सत्य काय ते अजून गुपितच.

तर दोस्त अशी ही सौंदर्यवती मोनालिसाची विलक्षण कहाणी. लाकडाच्या तीन तुकड्यावर तैल रंगात रंगवलेली मोनालिसा आकाराने लहान म्हणजे फक्त 30 बाय 21 इंचाची आहे पण तिचा इतिहास अन तिच्यासाठीचे कारनामे मात्र महान आहेत. हो ना?

नवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.

3,175 total views, 3 views today