ज्या हिऱ्याबद्दल जगभर चर्चा असती त्या कोहिनूरची किंमत किती असे विचारले असता नादीरशहाच्या पत्नीने हे उत्तर दिले – “जर एखाद्या ताकदवर माणसाला पाच दगड दिले अन त्याला सांगितले की चार दगड चार दिशांना जोरात फेक अन पाचवा दगड आकाशात उंच उडव. तयार होणारा काल्पनिक चौकोन सोन्याने भरला तरी कोहिनूरची बरोबरी होणार नाही”. दोस्तहो कोहिनूर तिचे हे उत्तर अतिशयोक्तीचे म्हणता येत नाही कारण आज मूळ कोहीनूरचा फक्त सहावा भाग असणाऱ्या इंग्लंडच्या राणीच्या मुकुटातल्या कोहिनूरची किंमत 1,500 कोटी रुपये आहे. एकेकाळी 793 कॅरटचा असणारा हा हिरा आत फक्त 105.6 कॅरटचा उरलाय. ज्याला मिळवण्यासाठी हजारो पुरुषांनी रक्त सांडले परंतु फक्त तो फक्त स्त्रीला लाभला अशा कोह – ई – नूर चे पाच अजुबे तुम्हाला जरूर वेगळ्या विश्वात नेतील.

1. केवळ महिला लाभणारा :

कोहिनूरच्या उत्पत्तीबद्दल अनेक चर्चा आहेत. तो आंध्रामधील गुंटूर जिल्ह्यातील गोलकोंडा खाणीत सापडला ही सर्वात प्रचलित चर्चा. कोहिनूरची पहिली ओळख सन 1304 च्या आसपासची. मालवा प्रदेशाचा राजा महालकदेवच्या संपत्तीचा हा हिस्सा. अल्लादिन खिलजीने तो दक्षिणी राजांना मारून युद्धात लुटला. मग दिल्लीतील सुलतानाना मारून इब्राहीम लोधीकडे, मधेच ग्वालियर राजा विक्रमसिंग अन तेथून मग बाबरकडे (जो या हिऱ्याला बाबरहिरा म्हणायचा), मग शहाजाहान, औरंगजेब, मग पर्शियन राजा नादिरशहा, (ज्याने कोहिनूर हे नाव दिले व ज्याची त्याच्याच लोकांनी हत्या केली) मग त्याचा सेनापती दुराणी व आखिरकार पंजाबचा राजा रणजितसिंग. हिऱ्याच्या बदल्यात दुरानिला अफगाणिस्तानमधील राज्य बहाल करण्यात आले. 1304 ते 1849 या साडेपाचशे वर्षात हा हिरा ज्याच्याकडे राहिला त्याचा पराभवच झाला. पंजाबला ब्रिटीशांनी हरवले हा हिरा इंग्लंडला गेला. (ते गिफ्ट होते का लुट याबद्दल सरकारांमध्ये आता मतभेद आहेत) पण या हिऱ्याचा असा इतिहास पाहून ब्रिटीश ज्योतिषांनी हा हिरा फक्त महिलांना लाभतो असा प्रतिपादन के अन तेव्हापासून कोहिनूर राणीच्या मुकुटात विराजमान झाला.

2. मयूर सिंहासानातील बाबरहिऱ्याचे तुकडे :

ताजमहालचे करविते शहाजहान यांनी आपल्यासाठी हिरेजडीत सिंहासनही तयार करवून घेतले होते. या मयूरसिंहासनाला जगातील हा सर्वात मोठा म्हणजे 793 कॅरटचा तत्कालीन बाबरहिरा (आताचा कोहिनूर) भूषवत होता. पण दुर्दैव असे की आपले वडील शहाजहानना औरंगजेब या त्यांच्याच मुलाने कैदेत ठेवले. एक दिवस मयूर सिंहासनातला हा भलामोठा हिरा “होर्तेन्सो बोर्जीया” या व्हिएतनामच्या जोहऱ्याला तासण्यास दिला. या बहाद्दराने तासून तासून या हीऱ्याला फक्त 186 कॅरटचा केला. रागाच्या भरात औरंगजेबाने बोर्जीयाला 1658 साली दहा हजार रुपयाचा दंड ठोठावला व शिक्षा केली.

1852 साली प्रिन्स अल्बर्टने परत हिरा कट करवून घातला अन त्याला फक्त 105.6 कॅरटचा केला. आज जो कोहिनूर म्हणजे “प्रकाशाचा पहाड” जग पाहते तो मूळ हिऱ्याचा एक तुकडा आहे….फक्त तुकडा…

3. जगग्नाथ मंदिराचा कोहिनूर धोब्याकडे :

पंजाबचे राजे रणजीतसिंग यांच्याकडे कोहिनूर शेवटी आला हे सांगितलेच. त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात हा हिरा पुरीच्या जगन्नाथ मंदिराला दान करावा असे लिहिले होते परंतु त्यांच्या मृत्युनंतर फक्त 13 वर्षाच्या त्यांच्या दुलीपसिंग याला इस्ट इंडिया कंपनीने सिंहासनावर बसवले. या दुलीपसिंगचा गार्डियन म्हणून डॉ. लॉगीन या इंग्लिश सरदाराची नेमणूक करण्यात आली. या लॉगीनने छोट्या दुलीपला हा हिरा व्हिक्टोरिया राणीला भेट देण्यास सांगितले जे दुलीपसिंगला हाईड पार्क, लंडनला समक्ष 1851 करावे लागले. दुलीपसिंगांचा इंग्लंड म्युझियममधील फोटो सोबत.

याच लॉगीनने एके दिवस हा हिरा आपल्या कोटाच्या खिशात ठेवला अन तो कोट नंतर अनावधाने धोब्याला दिला. धोब्याने तो आपटा आपटी न करता परत आणून दिला हे विषेश.

4. HMS Medea जहाजाचा खडतर प्रवास :

इंग्लंडपर्यंत कोहिनूरचा प्रवास अनेक अडचणीना सामोरे जात झाला. 1 फेब्रुवारी 1850 ला व्हिक्टोरिया राणीच्या प्रतिनिधीच्या समोर मुंबईत कोहीनूरला लाल रंगाच्या एका छोट्या लोखंडी पेटीत ठेवण्यात आले. त्याला सीलबंद करण्यात आले. नंतर परत या सीलबंद डब्याला एका मोठ्या लोखंडी तिजोरीत बंद करून परत सील ठोकण्यात आले. कप्टन रामसे व ले.कर्नल मॅकेसन या मोठ्या हुद्द्यावरील अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले. परंतु त्याना नेण्यासाठी चीनवरून येणारे HMS मेदिया हे जहाज अडचणीत सापडले व एप्रिलपर्यंत आलेच नाही. नंतरच्या प्रवासात बोटीवर कॉलराची साथ सुरु झाली अन अनेक लोकाना जीव गमवावा लागला. साथ इतकी वाढली की मॉरीशसला पोहचल्यावर तिथल्या लोकांनी बोटीला आगच लावून द्यायचा हुकुम केला. कसेतरी समजावून बोटीला पुढील प्रवासाला परवानगी मिळवण्यात आली पण समुद्रात या बोटीवर तब्बल बारा तास प्रचंड वादळाचा तडाखा बसला. चार महिन्यानी म्हणजे 1 जूनला कशीबसे हे जहाज इंग्लंडला पोहचले.

5. सहाव्या जॉर्जने लपवला कोहिनूर :

“दी संडे टेलेग्राफ” या प्रसिध्द ब्रिटीश पत्रकाने 1990 साली एक सनसनाटी गौप्यस्फोट केला. दुसऱ्या जागतिक युद्धाच्यावेळी इंग्लंडवर आक्रमणाचा धोका पाहून तत्कालीन सहाव्या जॉर्ज या राजाने कोहिनूर लपवण्याचा निर्णय घातला. कोहीनूर लपवण्यासाठी त्याने शोधलेली जागा फार भन्नाट होती. विंडसर कॅसल या राजवाड्यापासून 32 किलोमीटरवर असणाऱ्या एका तलावाच्या तळाशी कोहिनूरला लपवण्यात आले. हे गुपित फक्त राजा अन सर ओवेन मोर्सहेड या सहकाऱ्याला माहीत होते. युद्धानंतर ओवेनने हे सिक्रेट फ्रेंच आर्मी जनरल व त्याच्या बायकोला सांगितले.

दोस्तहो.. राजा जॉर्जने कोहिनूरसाठी केलेली ही धडपड खरोखरच जायज आहे असे वाटते कारण स्वातंत्र्यानंतर फक्त भारतच नव्हे तर पाकिस्तान प्रधानमंत्री झुल्फिकारआली भुत्तो, अफगाणिस्तानमधून तालिबान्यांनीदेखील कोहिनूरवर आपला हक्क सांगितलाय….

897 total views, 1 views today