आपणांस नको असणा-या अनेक वस्तु लोक लिलाव बोलणा-या वेबसाईटसवर विकतात. लोकांना कोण कोणत्या गोष्टी नको असतात त्याचा शोध स्मार्टदोस्तने घेतला आणि फार मजेशीर यादी तयार झाली. वाचा तर ई बे वर झालेले अजब लिलाव.

१. बाटलीबंद भूत

इ बे च्या सुरवातीस टीजे नांवाच्या युजरने बाटलीबंद भूत विकायला काढले होते, म्हणजे भूत बाटलीतच होते पण बाटली विकायची होती. टीजे ने विकत घेणा-याला भूतबाधा झाली वा बाटली उघडल्यावर भूत उडून गेले तर त्याची जबाबदारी घ्यायचे नाकारले होते. एका कस्टमरने २,५०,००० रुपयांना सौदा केला ही, परंतु तो सौदा पूर्ण होवू शकला नाही. बाटलीच्या भूताचे रहस्य तसेच बंद आहे.

२. लंडन ऑलिंपिकची हवा

सन २०१२ ला लंडनमध्ये ऑलंपिक स्पर्धा झाल्या. देशो देशींच्या स्पर्धकांना बक्षीसे मिळाली ब-याच गोष्टी विकल्या गेल्या. परंतु एका बहाद्दराने स्पर्धेदरम्यान लंडनमधील हवा एका बाटलीमध्ये भरली आणि ही हवाबंद हवा लिलावात विकण्यास ठेवली. आहे का नाही हवा हवाई.

३. काल्पनिक मित्र

नको असणा-या मित्रापासून आपण दूर रहातो त्याच्याशी बोलायचे टाळतो. कारण तो आपणांस नको असतो, म्हणून काय मित्राला विकायचे ? ई बे च्या वाईल्ड आणि क्रेझी कॅटेगरीत एका इंग्लंडवासियाने मित्र विकायला ठेवला. विचित्र म्हणजे तो मित्र काल्पनिक होता. त्या काल्पनिक मित्राची संपूर्ण माहिती, काल्पनिक नांव जे जॉन मालीपायमन, त्याच्या सवयी इ. बद्दल संपूर्ण माहिती दिली होती. ३१ कस्टमरने लिलावात भाग घेतला आणि एकाने तर जॉन बद्दल तो विवाहीत आहे कां ? असा प्रश्नही विचारला. जॉनचे लग्न झाले नव्हते हे कळाले पण तो सध्या कोठे आहे हे नाही कळाले.

४. संपूर्ण आयुष्य

आयुष्याचा कंटाळा आलाय ? तेच ते रुटीन नको झालेय ? मग विका तर सर्व कांही जे तुमचे आहे आणि व्हा मोकळे या भकास आयुष्यातून. जून २००८ मध्ये इयारन अशर या व्यक्तीने तेच केले, त्याने ई वेबवर पत्नी सोडून गेल्याच्या दुःखात आपले सर्व कांही म्हणजे घर, मोबाईल, मोबाईल मधील कॉन्टॅक्टस, गाडी सर्व १,९२,००० पौंडाना विकले आणि तो चक्क जगप्रवासाला निघाला. नविन आयुष्यात करावयाच्या १०० गोष्टींची त्याने यादी केली, त्यामध्ये स्पेनमधील बैलांच्या शर्यतीत भाग, वर्जीन कंपनीचे अतिश्रीमंत मालक रीचर्ड ब्रॉनसन यांना भेट, आफ्रिकेत शार्कशी मुकाबला अशा अनेक गोष्टी होत्या. या अचाट गोष्टी करत असताना त्याने अनुभवावर पुस्तकही लिहीले आणि त्या पैशात एक छोटेसे बेट विकत घेतले. आता ता ते बेट विकणार आहे.

५. ६१ वर्षांची आजी

ई बे वर काल्पनीक गोष्टी विकताना लोकांना आपण पाहिले. पण मनाला त्रास देणारी एक घटनाही स्मार्टदोस्तला दिसली. झो पेंबरटन नावाच्या एका लहान मूलीने घरातील तिची नावडती आजीच लिलावात विकण्याचा प्रयत्न केला. आजीचे चित्र, तिची संपूर्ण माहिती, या मुलीने ई बे वर पोस्ट केली.ई बे च्या पॉलिसीमध्ये हे बसत नसल्याने तिची रिक्वेस्ट नाकारली गेली ही गोष्ट वेगळी पण कोण काय करेल याचा नेम नाही हे खरे.

482 total views, 1 views today