प्रत्येक खेळामध्ये काही विशिष्ठ शब्द वापरले जातात. जसे फु टबॉल मध्ये पेनाल्टी, कॉर्नर इ. किंवा क्रिकेटमध्ये सिली पॉंईट, लेगसाइड इ. भारतामध्ये आपण क्रिकेट अगदी राष्ट्रीय खेळ असल्यासारखा खेळतो. त्यामुळे क्रिकेट मधील सर्व शब्द आणि त्याचे अर्थ बहुतेक सर्वांना माहीत असतात. म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्या, बघणाऱ्या आणि फक्त कॉमेंटस करणाऱ्याना तरी. परंतु या क्रिकेट नावाच्या जेंटलमन्स खेळामध्ये अनेक शब्द असे आहेत जे आपण कदाचित ऐकले ही नसतील. स्मार्टदोस्तची ही यादी.

1. काऊ कॉर्नर :

क्षेत्ररक्षणाची ही एक वेगळी जागा. लॉंग ऑन आणि डिप मिडविकेटच्या मध्ये सीमारेषेवर जवळ हा काऊ कॉर्नर असतो. या जागेला असे नाव पडायची एक मजेशीर कहाणी आहे.
इंग्लड मध्ये क्रिकेटचा खेळ जोरात असताना डलविय कॉलेजच्या ग्राऊंडवर क्षेत्ररक्षक उभा करताना हा शब्द तयार झाला. या मैदानाच्या विशिष्ट भागात एक गाईचा गोठा होता म्हणून गोठ्या जवळ उभे रहा असे सांगण्यासाठी ‘काऊ कॉर्नर’ असे नाव पडले.

2. गार्डनिंग :

फलंदाज गार्डनिंग करत आहे असे कॉमेंटेटर जेव्हा म्हणतो तेव्हा तो खरोखरच बागकाम करत नसतो तर स्वत:च्या बॅटने पिचवरील छोटे खड्डे मूजवून पिच ठिक करत असतो. खेळाडूंच्या शूजमुळे वा वारंवार बॉल एकजागी पडून त्या भागातील माती सुटी होत असते. ती माती पसरवून त्यावर बॅटने ठोकून लेव्हल केली जाते  तेव्हा फलंदाज गार्डनिंग करत आहे असे म्हणतात.

3. जाफा :

एक सुंदर डिलीव्हरी जी फलंदाजाला कळण्याच्या पलिकडे असते. अगदी न खेळता येण्याजोगी. कधी कधी अशा बॉल्सना ‘कॉर्कर’ असेही म्हणतात.
जाफा हे नाव एकाप्रकारच्या संत्र्याच्या प्रजातीवरून पडले आहे जे अत्यंत सुमधूर असे फळ मानले जाते.

4. फास्ट लेग थेअरी :

तिसाव्या दशकात कूप्रसिध्द झालेल्या बॉडीलाइन गोलंदाजीचे हे दुसरे नाव. इंग्लंडच्या हेरॉल्ड लारवूड आणि बिल बोस ने एक स्ट्रॅटेजी करून फलंदाजांना शॉर्ट पण फास्ट बॉल टाकायचे ठरवले. असे बॉल्स फलंदाजाच्या छातीवर जोरात यायचे जेणेकरून डोके वाचवण्याच्या नादात फलंदाज लेगसाइडला कॅच देवून बसेल. अनेक फलंदाजाना जखमी करायचे कार्यच ह्या भयंकर बॉल्सनी केले.

5. मंकड :

प्रसिध्द भारतीय गोलंदाज विनू मंकड यांच्या नावावरून हा शब्द तयार झाला. १९४७ च्या भारत-ऑस्ट्रेलीया कसोटीमध्ये मंकड बॉलिंग करत असताना त्याच्या लक्षात आले की नॉन स्ट्रायकर एंडला असणारा फलंदाज बिल ब्राऊन धावांसाठी बॉल टाकायच्या अधीच पळायला लागला आहे. तेव्हाच त्याला धावबाद केले तर? ह्या विचारातून मांकड यांनी बिलला आउट केले आणी तयार झाली मंकड थेअरी.

5,012 total views, 1 views today