जगात लाखो प्रकारचे प्राणी वावरत असतात. कोणी उडत असतात तर कोणाला पोहण्याची कला अवगत असते. या प्राण्यांमध्येसुध्दा हाजारो प्रकार असतात. आणी हो.. हे सारे हाजारो लाखो प्राणी आकाराने, रंग रूपाने पण एकमेकांपेक्षा हटके असतात. काही फुलपाखरासारखे सुंदर असतात तर काही अगदी किळसवाणे विचित्र असतात. आज स्मार्टदोस्तने अशाच विचित्र प्राण्यांची यादी बनवलेली आहे.

असे का..? अहो माणूस पण प्राणी आहे असे म्हणतात. आणी विचित्र माणसांची आपणास माहिती असतेच ना? असो. माहिती करून घ्यायला हरकत नाही. हो ना?

1. ट्रासिअर

लांब कानवाला व मोठाले डोळे असणारा जगातील सर्वात लहान प्राणी म्हणून ओळखला जाणारा ट्रासिअर काहीसा विचित्रच दिसतो. बाहेर आल्यासारखे चक्राकार डोळे व काटक्यांसारखी लांब बोटे एखाद्या चेटकिणीची आठवण करून देतात. टोकदार कान, शरीरावर केसांचे वेडेवाकडे पुंजके अन असमान शरीर विचीत्रपणात अधिकच भर टाकतात. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारताना हवेतल्या हवेतच पक्षी आणी कधी कधी सापसुध्या पकडण्याची कला अवगत असणारा ट्रासिअर प्रामुख्याने दक्षिण पूर्व आशियामध्ये सापडतो.

2. आय आय

प्रायमेट (मोठे कान, डोळे, लांब बोटे) प्रजातीचा निशाचर आय आय मादागास्कर प्रदेशात सापडतो. एखाद्या घुशीसारखे टोकदार दात, अगदी पातळ त्वचा व लांबलचक मधले बोट अशी रचना असणारा आय आय. आपल्या बोटांनी झाडावर टिक टिक आवाज करून सालीच्या आत असणाऱ्या किड्याचा शोध घ्यायचा, मग टोकदार नखांनी भोक पडून काडी घातल्यासारखी बोटे आत घालून किडे पकडायचे, अन पोट भरायचे असा उद्योग रात्रभर करायचा हा आय आयचा धंदा. पिवळे बटणासारखे गोल डोळे काळ्या रंगात अधिकच खलनायकी दिसतात.

3. विचित्र नाकाचा मोल

“मेन इन ब्लॅक” या चित्रपटातील किड्यासारखा दिसणारा परग्रह्वासीय जेफ नावाचा प्राणी जिवंत बघायचा असेल तर पूर्व कॅनडा आणि अमेरिकेच्या सीमेवर जायला लागेल. येथील मोल नावाचा विचित्र प्राणी तुम्हाला नक्कीच तुम्ही कोठेतरी दुसऱ्या ताऱ्यावर आहात असे जाणवून देईल. नाकाच्या ठिकाणी वळवळणाऱ्या शेपटीसारख्या लालसर मांसल आकरा जोड्या. जणू नाक नाहीतर सोंडीच. (सोंडच अनेक रूप) आपल्या या वळवळणाऱ्या भागांनी आजूबाजूच्या हालचाली टिपून भक्ष शोधणारा हा मोल खवलेदार शेपटीमुळे अधिकच किळसवाणा वाटतो.

4. सँड पपी

वाळवंटातील उंदीर अथवा नेकेड मोल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आफ्रिकन प्राण्याला पाहून कोणीतरी याच्या सर्व अंगाची दाढी (?) केली काय असे तुम्हाला वाटेल. मीच मिचे डोळे, आखूड बारकुळे पाय आणि खालच्या ओठांना बंद करणारे अणकुचीदार दात. शरीरावर केस नाहीत ते नाहीत पण सर्व त्वचा वय झालेल्या प्रमाणे सुरकुतलेली असलेल्यामुळे नेकेड मोल ओंगळ वाटतो. तरी बरे बहुतांशी वेळ तो जमिनीखालीच राहतो.

5. स्फिंक्स कॅट

मांजराचे किती प्रकार पाहिले असतील परंतू “स्फिंक्स कॅट” सारखे विचित्र मांजर कदाचित चित्रातच. कॅनडामध्ये सापडणाऱ्या या मांजराला काही प्रमाणात केस असतात परंतु त्या केसांचा रंग त्वचेच्या रंगासारखाच असल्यामुळे अंगभर चमन गोटा केल्याप्रमाणे स्फिंक्स कॅट दिसते. आकाराच्या मानाने मोठे असलेले कान, एखाद्या लिंबासारखे डोळे आणी जवळ जवळ नसल्यासारख्या भुवया व मिश्या स्फिंक्स कॅटच्या विचीत्रपणात भर टाकतात.

1,959 total views, 2 views today