आधुनिक जगातील सर्वात जास्त चर्चिला गेलेला डीक्टेटर “अडोल्फ हिटलर” एक गूढ व्यक्तिमत्व होते यात काही शंका नाही. त्याचा आर्य होण्याचा दावा, स्वस्तिक चिन्हाबद्दलच प्रेम, ज्यू लोकांचा द्वेष करत असताना स्वतःचा डॉक्टर अन प्रेमिकाही ज्यू असू देणे, अनेकांना त्याकाळीसुद्धा कोड्यात टाकत होते. अश्या या हिटलरने धुम्रपानावर बंदी आणली होती… इतकेच नाही तर चक्क ख्रिसमस सणावर बंदी आणण्याचा त्याचा प्रयत्न होता.

स्मार्टदोस्त आज तुम्हाला हिटलरने कोणत्या गोष्टींवर बंदी लादली ते सांगणार आहे…

1. प्राणीहत्या अन छळ बंदी कायदा :

जगावर निरंकुश सत्ता करण्याची राक्षशी महात्वाकाशा असलेल्या हिटलरने सत्तेत आल्यावर मात्र प्राणीहत्या अन छळ बंदी कायदा लागू केला होता हे जरा विचित्र वाटते. पण हे सत्य आहे. जानेवारी 1933 ला पॉवरमध्ये आल्यावर नाझी पार्टीने अॅनिमल प्रोटेक्शन लॉं पास केला. ठराविक (धार्मिक) प्राण्यांच्या कत्तलीला बंदी करण्यात आली. शेवटी शेवटी स्वतः शाकाहारी झालेल्या हिटलर या बाबतीत फार कठोर झाला होता.

“इथून पुढे माझ्या राज्यात प्राण्यांचा छळ करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही..” लाखो ज्यू लोकांच्या कत्तलीला परमिशन देणाऱ्या अन जगाच्या तोंडाचे पाणी पळवणाऱ्या हिटलरच्या तोंडाची ची वाक्ये…

ऐकूनच तोंडात बोट घालावे वाटते.

2. इतिहासातील सर्वात मोठी धुम्रपान विरोधी मोहीम :

होय..हिटलरने जगातील सर्वात पहिली अन सर्वात मोठी धुम्रपान विरोधी मोहीम जर्मनीमध्ये राबवली होती. आर्यन वंशाच्या रक्तामध्ये भेसळ होऊ नये अन बलवान आर्यन मुले जन्माला यावीत या हेतूने त्याने धुम्रपानाला बंदी घातली होती. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवनाला बंदी होतीच पण शाळा कॉलेजात या बद्दल प्रबोधन केले जाणे कंपल्सरी होते. धुम्रपान विरोधी सरकारी जाहिरातीचा तर भाडीमारच होता… जगातील ती सर्वात मोठी मुव्हमेंट होती.

स्वतः च्या सुपीरिअर वंशाच्या हिताखातर केलेला हा हिटलरी खटाटोप जर्मनीमध्ये तो होता तोपर्यंत हिट होता.

3. फुटबॉल खेळावर बंदी :

आज फुटबॉल खेळात जर्मनीचा दबदबा आहे. परंतु ह्याच जर्मनीमध्ये या खेळावर बंदी आणण्याचा डाव हिटलरने मांडला होता. हिटलरला कोणत्याच क्षेत्रात जर्मन्सचा पराभव सहन होत नव्हता. 1936 च्या ऑलम्पिक मध्ये हिटलरच्या देखत नॉर्वेने जर्मनचा 2-0 ने पराभव केला. 55000 प्रेक्षकांच्या समोर झालेला हा पराभव पाहून हिटलर फ्युरीयस झाला…

तेथून पुढे त्याने फुटबॉलची एकही मॅच बघितली नाही. इतकेच नव्हे जर्मनीमधून हा खेळच हद्दपार करण्याचा त्याने प्रयत्न केला. जे त्याला शक्य झाले नाही. कायम भीतीत अन दबावात असणाऱ्या जनतेला वेळ घालवायला फुटबॉल हाच काय तो सहारा होता.

4. नोबेल पारीतोषिकावर बंदी :

प्रखर..अगदी वेड्यासारखे प्रबळ राष्ट्रप्रेम असणाऱ्या हिटलरने नोबेल परितोषिकावरही बंदी घातली. नाझीविरोधी लिखाण करणाऱ्या कार्ल व्होन ओस्सिएत्झी (Carl von Ossietzky) ला जेव्हा नोबेल जाहीर झाले तेव्हा हिटलरने हा निर्णय घेतला. एक हिरेजडीत वजनदार पदक, जे गळ्यात मिरवायला फार जड होते, अन 1,00,000 रैसमार्क (Reichsmark) नावचे त्याकाळचे चलन असे “जर्मन नॅशनल प्राईझ”चे स्वरूप होते. अन हो, एक स्वस्तिकही विजेत्याने बाळगायचे होते.

जर्मन कंपनी फोक्स वॅगनची “बिटल” ही जगप्रसिध्द कर तयार करणाऱ्या श्री. पोर्शे यांना यातील एक मेडल मिळाले. अश्या प्रकारची फक्त नऊ पारितोषिके दिल्यानंतर ही प्रथा दुसऱ्या महायुद्धामुळे बंद करण्यात आली. जर्मन्स हरले. प्राईड अन प्राईझ ही… गेले.

5. चक्क ख्रिसमसवर बंदी :

ज्यूद्वेष्ट्या हिटलरला प्रभू येशू “जीजस” हा ज्यू ओरीजीनचा होता याचे दुखः होते. आर्यन वारश्याचा अभिमान असणाऱ्या नाझींनी मग ख्रिसमसचे स्वरूपच बदलायचे ठरवले. “नाताळ”ला धार्मिक उत्सव म्हणायचे नाही असे त्यांनी फर्मान काढले. हिटलरच्या सन्मानार्थ हा सण साजरा करावे असे जनतेला सांगण्यात आले. संत निकोलसच्या ऐवजी सूर्यदेव “ओडीन” ची पूजा करावी, ख्रिसमस ट्री वर स्वस्तिक चिन्ह लावावे अश्या अनेक जाचक अटी लादून त्यांनी मुळ सणावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला होता.

1,287 total views, 2 views today