खरेदीसाठी सतरा पिशव्या घेवून आठरा दुकाने फिरायचे दिवस आता गेले. आता एकच गाडी (पिशवी नव्हे) घेवून डिपार्टमेंट स्टोअरच्या समोर मिळेल तेथे पार्क करायची, मग लाईनमध्ये गुमान उभे रहायचे, अंगावरून त्या सुरक्षारक्षकाकडून बॉम्ब डिटेक्टर फिरून घ्यायचा, आत जायचे अन मग …. बाबा गाडी सारखी बास्केट गाडी धरून फिर फिर फिरायचे. इकडून तिकडे, तिकडून इकडे मग ट्राफिक जाम असेल तर इकडून इकडे. असेच काहीतरी. जे काही दिसेल त्यात हात घालायचा. पायात घालायच्या पँटसाठी अन पाय ज्यावर ठेवतो त्या पायपुसणीसाठी वेगळा साबण, साडीसाठी सॉफ्ट, शर्टसाठी हार्ड अन कॉलर साफ करायसाठी वेगळा साबण घेता घेता खिसा कधी साफ होतो हे कळत देखील नाही. असो. तर हे सारे कसे टाळायचे, डिपार्टमेंट स्टोअरमध्ये खरेदी करताना काय काळजी घ्यायची याची एक यादी स्मार्टदोस्तने केली आहे.

1. आठवड्याचे सर्व दिवस सारखे असतात असे वाटणे :

कदाचित तुम्हाला हे माहितही असेल त्यामुळेच शक्यतो सुट्टीच्या दिवशी तुम्ही खरेदी टाळत असाल परंतु हे ही माहित असुदे की काही काही वस्तू आठवड्याच्या मध्याला स्वस्त असतात. प्रत्येक स्टोअरचे शेल्फमध्ये वस्तू भरण्याचे एक वेळापत्रक असते. शनिवार रविवारच्या गर्दीला पुरेल असे सामान शेल्फमध्ये ठेवण्यासाठी गुरुवार शुक्रवार असे दिवस निवडले जातात. पण त्यासाठी शेल्फवरील वस्तू संपणे गरजेचे असते. म्हणूनच शेल्फ रिकामा करण्यासाठी बुधवार स्टोअरसाठी चांगला दिवस. तोच दिवस ग्राहकांसाठीसूद्धा चांगला नाही का? याच दिवशी बरेच स्टोअरवाले भरपूर डिस्काउंट देतात. म्हणून नेहमीच्या स्टोअरवाल्याला वाचारून आठवड्याचा कोणत्या दिवशी जास्त फायदा होईल ते जाणून घ्या.

2. भर भरून सामान भरणे :

एक लक्षात घ्या की स्टोअरवाले बिझिनेस कसा करायचा हे चांगले जाणून असतात. त्याचमुळे आकर्षक डिस्प्ले, मनमोहक जाहिराती अन खरेदीचे वातावरण तुम्हाला हवे त्यापेक्षा जास्त खरेदीला पाडू शकतात. तेव्हा ज्या वस्तू हव्या आहेत त्याची यादी तयार करून अन तीच यादी घेवून स्टोअरमध्ये जा. नाशवंत वस्तू प्रमाणाच्यापेक्षा जास्त खरेदी करू नका. शक्य असल्यास लहान मुलांना घरी ठेवून जा. अन हो ! स्टोअरमध्ये तुम्ही स्वतः लहानांसारखे वागू नका. नाहीतर नको असताना कोल्डड्रिंकची भली मोठी बाटली केवळ स्वस्त मिळते या हट्टाने घरी आणू नका.

3. चुकीच्या ठिकाणी खरेदी करणे :

खाण्याचा किंवा न खाण्याचा खरेदीशी काही संबंध असेल का याची स्मार्टदोस्तला देखील शंका होती. परंतु रिकाम्या पोटी किंवा भूक असताना चॉकलेट बिस्कीटांच्या भिंतीमधून बास्केट गाडी नेताना हळूच दोन चार बिस्कीट पुडे कधी खरेदी केले जातील याचा नेम नाही. तेव्हा भरल्या पोटी खरेदीला जा. नको असलेले खाद्य पदार्थ, वस्तू तुम्ही टाळू शकता. स्टोअरमधल्या नव्या कोऱ्या पॅकबंद वस्तूंचा वास तुम्हाला खरेदी करायला भाग पाडू शकतो. खरेदीच्या वेळी एखादी मिंटची गोळी वा चुईंगगम तोंडात चघळा अन पहा परिणाम होतो का? हा! ती गोळी शेल्फमधलीच उचलून तोंडात घालू नका. वाईट परिणाम होऊ शकेल.

4. किंमतीची माहिती नसणे :

रोजच्या जीवनात वारंवार लागणाऱ्या वस्तूंच्या किंमती माहित नसल्यास तुम्ही विनाकारण पैसे वाया घालवू शकता. तेव्हा सजगता दाखवने कधीही चांगले. 1 लिटर म्हणजे 1 किलो नाही हे जसे माहित पाहिजे तसेच एम. आर. पी. म्हणजे किंमत नाही हे सूद्धा. जमेल तसे वेग वेगळ्या दुकानांची माहित घेतल्यास खोट्या सेलची खरी बाजू कळेल. नही तो किमत चुकानी पडेगी..

5. उपाशी पोटची खरेदी महागाची :

खाण्याचा किंवा न खाण्याचा खरेदीशी काही संबंध असेल का याची स्मार्टदोस्तला देखील शंका होती. परंतु रिकाम्या पोटी किंवा भूक असताना चॉकलेट बिस्कीटांच्या भिंतीमधून बास्केट गाडी नेताना हळूच दोन चार बिस्कीट पुडे कधी खरेदी केले जातील याचा नेम नाही. तेव्हा भरल्या पोटी खरेदीला जा. नको असलेले खाद्य पदार्थ, वस्तू तुम्ही टाळू शकता. स्टोअरमधल्या नव्या कोऱ्या पॅकबंद वस्तूंचा वास तुम्हाला खरेदी करायला भाग पाडू शकतो. खरेदीच्या वेळी एखादी मिंटची गोळी वा चुईंगगम तोंडात चघळा अन पहा परिणाम होतो का? हा! ती गोळी शेल्फमधलीच उचलून तोंडात घालू नका. वाईट परिणाम होऊ शकेल.

522 total views, 2 views today