अतिश्रीमंत फूटबॉलपटूंची यादी आपण पाहिलीच. आज स्मार्टदोस्त आपणास ५ अतिश्रीमंत ऍक्टर्सची यादी देत आहे. भारतीयांना आनंद होईल अशी गोष्ट ही आहे. कारण बादशहा शाहरूख खानचे नावही त्यात आहे. वेल्थ एक्स संस्थेने ही नांवे प्रसिध्द केली आहेत.

१. जेरी सिनफेल्ड (Jerry Seinfeld):

हॉलीवूडचा हा विनोदी कलाकार. भले लोक त्याच्यामुळे हसले असतील. परंतु जेरीसुध्दा त्यामुळे आनंदी झाला असेल यात शंका नाही, कारण त्याच्या बँक खात्यात सध्या ४९२० कोटी रूपये जमा आहेत.
एखाद्या अॅक्टरकडे एवढे पैसे असू शकतात हे पाहून बऱ्याच जणांना अॅक्टिंगमध्ये करिअर करावे वाटेल. बरोबर ना!

२. शाहरूख खान (Shahrukh Khan):

शाहरूखला किंगखान उगाचच म्हणत नाहीत. नाइट रायडर्सचा मालक, कृत्रीम बेटावर बांधलेले दुबईतील पाम जुमेरातील अलिशान महल. एक ना अनेक. किंगखानची श्रीमंती प्रत्येक बाबतीत झळकते.
असे म्हणतात की एकेका चित्रपटासाठी ३५-४० कोटी रूपये मानधन घेणार्यात शाहरूख ३६०० कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कमेचा मालक आहे. नुकताच त्याचा वाढ दिवस साजरा झाला. स्मार्टदोस्तच्या त्याला वाढ दिवसाच्या शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल…..

३. टॉम क्रूझ (Tom Cruise) :

मिशन इम्पॉसिबलच्या या हिरोने पैसे मिळवण्याचे मिशनही फत्ते केले आहे असे दिसते. स्वत:ची मिळकत ३००० कोटी रूपयांपर्यंत नेवून टॉमने श्रीमंताच्या यादीत तिसरा नंबर पटकावला आहे. अभिनयाआधी कुस्तीसारख्या ताकदीच्या खेळामध्ये रस असणाऱ्या टॉमला पडल्यामुळे गुढग्याला मार लागला अन त्याची कुस्तीगिरी बंद पडली. नंतर लॉस एंजेलिसला जावून त्याने अभिनयाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. त्याच्या “रिस्की बिसनेस” मधल्या कामामुळे त्याला अधिक प्रसिद्धी मिळाली. गोल्डन ग्लोब अवार्डसाठी त्याची निवड झाली अन टॉमची कमाई जोमाने सुरु झाली. आज तो हॉलीवूडमधला एक जागतिक प्रसिद्धी असलेला स्टार आहे.

४. टायलर पेरी (Tyler Perry) :

सन २०११ चा जगातील एक महागडा कलाकार टायलर श्रीमंताच्या २०१४ च्या यादीत चौथ्या क्रमांकावर सुमारे २७०० कोटी रूपयांची शिल्लक ठेवून आहे. भारतासाठी काहीसा अनोळखी पण अमेरिकेतील एक जानेपेह्चाने नाम. स्वतःच्या पैशाने सुरु केलेले एक नाटक नंतर त्याला इतके प्रसिद्धीच्या शिखरावर नेवून ठेवेल हे टायलरला स्वप्नातदेखील वाटले नसेल. परंतु स्टेज शो आणि चित्रपटामधून टायलरने अमाप पैसे मिळवले अन आज तो फोर्ब्सच्या यादीत आहे.

५. जॉनी डिप (Jhony Depp):

पायरेटस ऑफ कॅरेबियनचा नायक गोल्डन ग्लोब ऍवॉर्ड विजेता जॉन ख्रिस्तोफर उर्फ जॉनी डिप पाच नंबरवर २६०० कोटी संपत्ती घेवून. ९ जून १९६३ चा जन्म असलेला जॉनी सुरुवातीस गिटारिस्ट होता. शाळा सोडून वयाच्या १२व्या वर्षापासून त्याने हे उद्योग सुरु केले. “दी किड्स” नावाच्या रॉक बँड मधून जगापुढे आलेल्या या मुलाने नंतर उत्पन्नाचे रेकोर्ड मोडणाऱ्या अनेक चित्रपटामध्ये काम केले.

389 total views, 1 views today