मित्र-मैत्रिणींमधील असो वा नवरा-बायकोमधील असो रिलेशनशिप हे फार भावनिक आणि गांभिर्याने घेण्याची बाब असते. दोघांमधील रिलेशनशीप चांगली ठेवण्यासाठी दोघांनीही जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे असतात. परंतु बऱ्याच वेळा रिलेशनशिप विना अडचण, चांगली व निकोप ठेवणे बऱ्याच जणांना जमत नाही. मग येतो दुरावा आणि धुसफूस आणि कधीकधी स्फोटसूध्दा! यामागे असते एक कारण आणि ते म्हणजे आपल्या चुकीच्या समजुती. रिलेशन्स मोडायला यातीलच काही समजुती कारण ठरू शकतात. वाचा तर स्मार्टदोस्तची ही यादी आणि ठेवा आपले रिलेशन्स एकदम ओके….

1. भांडणामूळे प्रेमवाढते. (चूक)

प्रेमिकांमध्ये वाद होतात, भांडण होते आणि लगेचच त्याच्यात प्रेम होते हे पिक्चर मध्ये वारंवार दाखवले जाते. असा समज देखील आहे की नवरा बायकोमधील वाद हे तात्पुरते असतात आणि मिटतात देखील. परंतु हे लक्षात आले आहे की वारंवार होणारे वाद नंतर भयंकर रूप घेऊ शकतात आणि रिलेशन ब्रेकही करू शकतात. याचे कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पध्दत/क्षमता वेगवेगळी असते. चित्रपटात सर्वकाही दोन तासात संपवायचे असते तेव्हा भांडण देखील मिनिटात संपते. प्रत्यक्ष जीवनात ते असे होईलच असे नाही. तेव्हा चित्रपटातील सर्वच सीन्स खरे होत नाहीत हे लक्षात असू द्या.

2. प्रेमात सर्व चुका माफ असतात. (चूक)

चित्रपटामध्ये आपण बघतो की काही झाले तरी प्रेमिकांच्या रिलेशनमध्ये काही फरक पडत नाही. अगदी दोघापैकी एक वारंवार चुका करत असेल तरी. प्रेमात पडलेली वा पडलेला त्याचा पार्टनर सर्व चुका माफ करतो आणि प्रेम तसेच कायम राहते. हॅपी एडींग. परंतू रिअल लाइफमध्ये रिलेशन चांगले राहण्यासाठी मन:पूर्वक प्रयत्न करावे लागतात. केवळ प्रेमात आहे म्हणून कोणी पार्टनरच्या चुका कायम माफ करत नाही. प्रेम व चांगले रिलेशन्स निरंतर ठेवण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करावे लागतात.

3. रिलेशन एकदा झाले की कायमच टिकून व चांगले राहतात. (चूक)

प्रेम मिळवायला वेळ लागतोच आणी  एकदा का रिलेशन्स झाले की नंतर ते कायमच टिकून राहतात असेही नाही. खरेतर रिलेशन आपले मैत्रीसंबंध टिकवून ठेवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. रिलेशन्स हे काही प्लॅस्टिकची फुलझाडे नाहीत की ती कायम फ्रेश दिसतील. आणी हो! कृत्रिम रिलेशन्स कोणालाच आनंद देऊ शकत नाहीत. तेव्हा आपल्या रिलेशन्समध्ये सहजता आणा.  बाते कम मेहनत जादा….

4. टाइम इज बेस्ट मेडिसीन. चर्चा केली नाही तरी खराब झालेले रिलेशन्स कालांतराने चांगले होतात. (चूक,चूक, चूक )

कोणतेही संबंध टिकवून ठेवण्यासाठी संभाषण महत्वाचे असते. एखादा प्रॉब्लेम आला तर त्यावर चर्चा करण्याचे टाळल्यामुळे प्रॉब्लेम कमी होतो व कालांतराने प्रॉब्लेम राहतच नाही असे कधीच होत नाही. किंबहूना तुम्ही वेळीच एकमेकांचे व्हीव्ज समजून घेतले नाहीत तर दूरावा वाढतच जाईल व परतीचे सर्व मार्ग बंद होतील. वेळीच चर्चा करा, समजून घ्या आणी प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करा. या बाबतीत सब्रका फल मिठा असणार नाही….

5. समान आवडी-निवडी असल्या तर रिलेशन्स टिकतात. (चूक)

जेव्हा स्वत:च्या हाताची बोटे सेम नसतात तर दोन व्यक्तीमध्ये आवडी-निवडी सर्वच बाबतीत समान असण्याचे चान्सेस फारच कमी. पण याचा अर्थ समान आवडी-निवडी नसल्यामुळे वारंवार झगडायचे का? रिलेशन्समध्ये एकमेकांना जाणून घेऊन एकमेकांच्या कलेने घेतले तरच मजा आहे. आणि दोघांच्या आवडी-निवडी शेअर केल्या तर लाइफ बोअरींग होण्यापेक्षा त्यामध्ये विविध रंग भरता येतील. गरज आहे समजून घेण्याची. तेव्हा आवडी-निवडी सेम नाहीत म्हणून निराश होवूनका. एकमेकांना जाणा,  वेळप्रसंगी त्यांना त्याच्या आवडी पूर्णकरू द्या आणि पहा रिलेशन्स कसे फुलतात ते. विश यू बेस्ट ऑफ लक.

679 total views, 1 views today