तर दोस्त, सध्याच्या लक्झरी कार्स म्हणजे फेसाळणारा जोश… एकाच घोटात रोमा रोमात झीणझीण्या आणणाऱ्या… टॉर्क, पिकप अन हॉर्सपॉवर असल्या टेक्निकल शब्दात रमणाऱ्या… फास्ट अन फ्युरियस मधल्या सारख्या.. मॉडर्न फटाकड्या..

या उलट व्हिंटेज कार म्हणजे हळूवारपणे मदमस्त करणारी ओल्ड वाईन.. मनाला व जीवाला उर्मी देणारी ज्योत… 30, 60 अन 90 अश्या नंबरात न बोलणारी.. तर जिभेवर घोळणाऱ्या एक एक बुंदसे अलग अहेसास देनेवाली..

मार्टिन ल्युथर नावाच्या जर्मन साधू अन तत्ववेत्त्याने लिहून ठेवले आहे “ बिअर माणसाने तयार केली तर वाईन देवाने..” दोस्तहो आज तुम्हाला एका वेगळ्या विश्वात नेतो आहे जेथे असेल थोडे वाईनपूराण अन तितक्याच अतिसुंदर व्हिंटेज कार्स..

1. मर्सिडीज डब्ल्यू 196 :

ढलती उम्र में इश्क हो तो अचाराज नाही गालिब…

पुरानी गेंदे ही ज्यादा स्विंग होती है….

सन 1954 च्या फ्रेंच ग्रँड प्रिक्समध्ये मर्सिडीज डब्ल्यू 196 दिमाखाने एन्ट्री केली. आपल्या अनोख्या व्हॉल्व सिस्टीम मुळे चर्चेत राहिलेल्या या जर्मन सुंदरीने त्याकाळच्या अनेक शर्यती जिंकून आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. 1980 ला तिने धावणे थांबवले. परंतु जुने ते सोने या म्हणीप्रमाणे सीझन्ड कारला 90 साली 24 मिलियन डॉलर्स असा सोन्यासारखा भाव मिळाला..

एज ओल्ड वाईनचेही तसेच. ती जितकी जुनी तितकी तिची चव न्यारी अन भाव भारी. अमेरिकेचे दुसरे उपराष्ट्रपती थॉमस जेफरसन यांच्याकडे असलेली 1787 ची लाफिते (Lafite Bordeaux) ही फ्रेंच वाईन 1,04,34060 रुपयांना (एक कोटी चार लाख चौतीस हजार साठ रुपयांना) 1985 साली विकली गेली…

2. फेरारी 250 जि.टी.ओ. :

वाईन सिलेक्ट करताना वाईनची टेस्ट नाही तर हिस्टरी बघितली जाते असे “सायकॉलोजी ऑफ वाईन : ट्रुथ अॅन्ड ब्युटी बाय ग्लास” या पुस्तकात म्हटले आहे. ज्या गावातील फळांपासून वाईन तयार झाली ते गावही महत्वाचे ठरते. तितली माती अन वाईन तयार करायची संस्कृतीही बघितली जाते. जगात बोर्देऔक्स (Bordeaux) हा फ्रांसमधील उत्तरपूर्व भाग रेड वाईन तयार करायच्या कल्चरसाठी आठव्या शतकापासून प्रसिध्द आहे. इथल्या मातीतील लाईमस्टोन (चुनखडी) मुळे वाईनला एक अनोखी चव व स्पार्कलिंग रंग येतो..

व्हिंटेज कार्सच्या बाबतीतही तसेच होते. येथेही हिस्टरीला महत्व दिले जाते. कार्स इतिहासात फेरारी या नावाचा दबदबा होता अन आहे. अन म्हणूनच फेरारीने 1962 ला रेसिंग जगतात उतरवलेल्या अन आता व्हिंटेज झालेल्या “250 जि.टी.ओ.” ला मिळवायला कार लव्हर्स चढाओढ करतात. आता एक रेअर कार बनलेल्या ह्या ओल्डीला पाहतानासुद्धा कोणाचेही दिल पागल होते.. म्हणूनच तिला मिळवायला एका दर्दीने 17 मिलियन डॉलर्स खर्च केले.. क्या बात है…

3. बुगाटी रोयाल टाईप 41 :

वाईन कशी प्राशन करावी याचे पण एक शास्त्र आहे. डीम लाईट, लाऊड म्युझिकवर झिंग झिंग झिंगाट म्हणत झिंग येउस्तोवर प्यायचे हे पेय नोहे. हे म्हणजे लक्सरी कार हायवेवर बुंगाट पळवल्यासारखे होते. वाईन टेस्टताना वातावरण शांत, स्वप्नील पाहिजे. हळुवार मधुर संगीताच्या साथीत प्रथम थोडे बुंद जिभेच्या टोकावर टेकवायचे अन मग एकेक घोट मुखामध्ये घोळवायचा अन मगच त्याला पुढे जावू द्यायचा. त्यावेळी फक्त स्वादच नाही तर तो सुंगंधही जाणून घ्यायचा. सोबत खारीडाळ अन कांदा असला चकणा घेवून डाव मांडायचा नाही, तर चीज क्यूब्जनी खेळ रमवायचा ..

व्हिंटेज कार्स पण तश्याच हाताळायच्या असतात. त्यांना रोडवर पळवायचे नसते तर त्यांची सुंदरता हळुवारपणे जाणवून घ्यायची असते. बुगाटीने अशीच एक रोयाल तयार केली होती. चित्रात दाखवलीय ती अतिश्रीमंत लोकांसाठी तयार केलेली बुगाटी टाईप 41. चक्क 14 फुट लांबीची ही रोयाल उच्च प्रतीच्या साहित्यापासून तयार केली होती. 1931 चे हे मॉडेल म्हणजे कलाकुसरीचा एक उत्तम नमुना. केवळ 42 हजार डॉलर्सची ही कार नंतर 1987 ला 90 लाख डॉलर्सना विकली गेली.


4. फेरारी 330 टी. आर. आय. :

फेरारीची टेस्टारोझा सेरीजमधील ही सुंदरी… नावातील टेस्ट वरून स्मार्टला आठवली वाईन कशी टेस्ट करावी याची विस्तृत माहिती. वाईन जिभेने नाही तर आधी नजरेने टेस्ट करायची असते. कशी ते जरूर वाचा.

वाईनमॅग डॉट कॉम म्हणते की “ग्लास काठोकाठ भरू नका तर तो वनथर्ड  भरा. ग्लासमध्ये डीप आत बघा. त्याने तुम्हाला रंगाची व डेन्सीटीची जाणीव होईल. वाइनचा सुगंध तुम्हाला वेगळ्या विश्वात न्यायला सुरुवात करेल. मग हात वर करून ग्लास प्रकाशात धरा. वाईन मधून पाझरणारा प्रकाश त्याच्या श्रेष्ठतेची जाणीव करून देईल. तिची चमक तुम्हाला सांगेल की तिच्याकडे तुम्हाला देण्यासाठी काय उर्जा आहे. मग ग्लास सावकाशपणे तिरका करत वाईनला काठापर्यंत येऊ द्या. आता तुम्हाला त्यातल्या कलर शेड्स दिसतील…. सर्व काही इतमानाने करायचे आहे… वा क्या बात है..

सन 1950 मधील फेरारीची 330 टी. आर. आय. व्हिंटेज नजरेने टेस्ट करतानासुद्धा तुम्हाला असेच करावे वाटेल. काही गडबड नको.. हो..ना ?

5. अल्फा रोमिओ टिपो बी. :

ना पीने का शौक था, ना पिलाने का शौक था;
हमे तो सिर्फ नज़र मिलाने का शौक था;
पर क्या करे यारो, हम नज़र ही उनसे मिला बैठे;
जिन्हें सिर्फ नज़रों से पिलाने का शौक था।

दोस्तहो, लेखाचा अंत अल्फा रोमिओ ह्या जगातील पहिल्या सिंगल सिट ग्रँड प्रिस्क कारने करतोय. जगात अश्या केवळ सहा कार्स बनवल्या गेल्या. 1932 ची ही केवळ बघितले तरी नशा आणणाऱ्या ह्या अल्फा बद्दल अल्फाज कमी पडतील असे वाटते… आपल्या नुसत्या दर्शनाने घायाळ करणाऱ्या अल्फाची तुलना “स्क्रीमिंग इगल कॅब्रीनेट” या व्हिंटेज वाईनशी करावी वाटते ज्याच्या एका बॉटलला चक्क 3,00,00,000 (तीन कोटी रुपये) मोजले गेले…

असो.. मग काय ? बसायचे ?

776 total views, 2 views today