असा एक काळ होता जेव्हा सुंदर मुलीची गणना राजा रवी वर्मांच्या चित्रातील मुलगी अशी व्हायची. जणू काही ती रवीवर्मांच्या चित्रातून बाहेर पडून पृथ्वीवर आली आहे असे म्हटले जायचे. राजा रवीवर्मांची चित्रे होतीच तशी सुंदर अन जिवंत. शंभर वर्षांनी आज देखील अनेक भारतीय घरात ज्यांच्या चित्रांचे फोटो तुम्हाला पहायला मिळतील तेच ते राजा रवीवर्मां. तर दोस्तहो आज आपण भारतीय आधुनिक चित्रकलेचे जनक, चित्रकारांचा राजा व राजामधील चित्रकार, राजा रवीवर्मांबद्दल 5 आठवणी ताज्या करणार आहोत ज्या तुम्हाला या अवलियाचे अनोखे पैलू दाखवेल.

1. चित्रांच्या प्रचंड मागणीमुळे पोस्टाची सुरुवात :

किलीमानूरच्या राजवाड्यात उमाम्बा आणि निलकंदन यांना 1848 साली जन्मलेल्या या बाळाने चित्रकलेत लहानपणापासूनच आपला दबदबा निर्माण केला. चित्रकलेचे शास्त्रोक्त शिक्षण शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्वतः अशी एक शैली तयार केली ज्यामध्ये भारतीय व ब्रिटीश शैलीचा अनोखा मिलाफ होता. नल दमयंती, दुष्यंत शकुंतला व हिंदू धर्मातील देव देवतांची त्यांची चित्रे इतकी प्रसिध्द झाली की त्याना रोज हजारोंनी टपाल पत्रे यायला लागली. परंतू किलीमानूर हे काही मोठे गाव नव्हते की जेथे पोस्ट ऑफिस होते. जगातून येणाऱ्या या पत्रांचा ओघ पाहून एक स्पेशल केस म्हणून किलीमानूरला पोस्ट ऑफिस सुरु करण्यात आले.

2. घराघरात हव्या असणाऱ्या चित्रांसाठी प्रिंटींग प्रेस :

राजांची चित्रे भारतीयांना इतकी हवी हवीशी असायची की त्याची मागणी पूर्ण करण्यासाठी 1894 ला ओलीओग्राफी प्रेस सुरु करण्यात आली. राजांची ओरीजनल चित्रे फार महाग असायची. त्याकाळी म्हणजे शंभर वर्षांपूर्वी त्यांच्या चित्रांना रुपये पन्नास हजार अशी किंमत आल्याची नोंद आहे. त्यांच्या ओलीओग्राफी प्रेस सुरु करण्याच्या धाडसी निर्णयाने कॉमन माणसालादेखील राजा रवीवर्मा घरात आणता आला.

3. बक्षिसे मिळतात म्हणून स्पर्धेतून माघार :

वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी म्हणजे सन 1873 ला व्हिएन्नाला झालेल्या जागतिक चित्र प्रदर्शनात राजांनी पहिल्या क्रमांकाचे पारितोषक मिळवले. बक्षिसे मिळवणे हे त्यांना अजिबात नवे नव्हते. त्यांच्या चित्रांनी इतकी बक्षिसे मिळवली की राजांनी डिक्लेअर केले की ते परत कधी स्पर्धेत भाग घेणार नाहीत. तरी सुद्धा त्यांच्या चित्रांची प्रसिद्धी कणभरही कमी झाली नाही. परंतु त्यांच्या या निर्णयामुळे आदर वाढला तो वेगळाच.

4. त्यांच्या आयुष्यावर तब्बल चार चित्रपटांची निर्मिती :

राजा रवीवर्मा खरोखरच एक प्रगल्भ व्यक्तिमत्व होते. त्यांचे बालपण, चित्रकलेवरील त्यांची भक्ती, त्यासाठी त्यांनी केलेली भ्रमंती, केलेले प्रयोग हे सर्व काही अलौकिक होते. त्याचमुळे रवीवर्मांना जाणून घेण्यासाठी आणी त्यांचे आयुष्य लोकांसमोर आणण्यासाठी अनेकांनी छोटे मोठे चित्रपट तयार केले. 2014 साली रणदीप हुडा, नंदना सेन याचा “रंग रसिया” हा त्यांच्याच आयुष्यावर होता. विशेष म्हणजे राजा रविवर्मांवर हा चौथा चित्रपट होता.

5. चित्रांवर आधारित जगातील महागडी साडी :

गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्यांच्या चित्रावर आधारीत साडीची जगातील सर्वात महागडी साडी म्हणून नोंदली गेली आहे. मध्यभागी रवीवर्मांची “लेडी म्युझीशियन” सभोवताली व बोर्डरला रवीवर्मांची इतर चित्रे असलेली ह्या चेन्नई सिल्क साडीची किंमत फक्त रुपये 50,00,000 होती. रुपये पन्नास लाख…..? काय नाही त्या साडीत… थोडे हिरे, थोडं प्लाटीनम, थोडे रुबी, एमराल्ड, यलो सफायर, टोपाझ, पर्ल, थोडंस सोनं …….. राजाची जय हो ……

2,808 total views, 7 views today