२८ जुलै १९१४ ते ११ नोव्हेंबर १९१८ दरम्यान चाललेल्या जागतिक महायुध्दाने अनेक इतिहास रचले. लाखो लोकांचा संहार करताना विविध भयंकर अस्त्रांचा दोन्ही बाजूंनी उपयोग केला. याच महायुध्दातील पाच ऐतिहासिक युध्दगाड्यांची ’स्मार्टदोस्त’ ने केलेली यादी.

१) गारफोर्ड चिलखती गाडी

रशियाकडून वापरल्या गेलेल्या गारफोर्ड चिलखती गाडया सुरक्षिततेच्या दृष्टीने मजबूत होत्या. परंतु सुरक्षा देण्याच्या नादात गाडीचे वजन सुमारे ११ टन झाले होते. केवळ ३० हॉर्स पॉवर इंजिनवर १६-१८ ताशी १६ ते १८ किलोमीटर धावणारी ही अनोखी गाडी.

२) बंदूकधारी चारचाकी सायकल

शस्त्र असलेली इतिहासातील पेट्रोलवर चालणारी पहिली सायकल. ब्रिटीश संशोधक एफ.आर. सिमने ही सायकल विकसीत केली. सायकलच्या पुढील दांडीवर एक मशिन गन, शत्रूपासून बचाव करण्यासाठी चालकासमोर पत्रा अशी अनोखी सायकल चालवणे एक कसरतच होती असे दिसते.

३) वाफेवर चालणारी डेव्हीडसन गाडी

अमेरिकेतील नॉर्थ वेस्टर्न मिलीटरी ऍकॅडमी मध्ये तयार झालेली ही बॉयलरमध्ये तयार होणार्या वाफेवर चालणारी युध्दगाडी. गाडीसमोर कोल्ट पॉईंट ३० कॅलीबर मशीनगन बसवली होती. परंतु चढावर वा उतारावर या गाडीला चालवणे अवघड असायचे कारण बॉयलरमधील पाण्याची पातळी कमी जास्त व्हायची व गाडी बंद पडायची. असो.

४) रोल्स रॉइस चिलखती गाडी

रोल्स रॉइस म्हणजे लक्झरी असा समज. परंतु रोल्स रॉइसने देखील महायुध्दात आपले योगदान चिलखती गाड्या तयार करुन दिले. इजिप्तमधील युध्दात वापरल्या गेलेल्या या गाडयावर रणगाडा विरोधी बंदूका व स्मोक ग्रेनेड लॉंचर होते. पाहिली आहे अशी रोल्स रॉइस?

५) बसींग ASP

आणि शेवटी ज्या देशामुळे महायुध्दा सुरु झाले त्या जर्मनीची बसींग ASP चिलखती गाडी. दहा सैनिकासह तीन मशिनगन व एक २० एम.एम. तोफ असणारी ही चिलखती गाडी सहा सिलींडरच्या इंजिनवर चालायची पाहीले तर एक बंदिस्त घरच वाटते. बरोबर ना?

746 total views, 1 views today