पाकिस्तान प्रमाणेच उत्तर कोरिया देशही आता जगाची डोकेदुखी बनू लागला आहे. “किम जोंग उन” नावाच्या तथाकथित 33 वर्षाच्या हुकुमशाहने मिसाईल्स, वेगवेगळे अणुबॉम्ब अन हायड्रोजन बॉम्ब बनवून व त्यांचे वारंवार स्फोट घडवून स्वतः व देश एक उपद्रवी प्राणी आहोत हे दाखवून दिले आहे. दोस्तहो ह्या किमचे भयानक वागणे केवळ जगाचीच नव्हे तर त्याच्या कुटुंबाची, देशाचीही डोकेदुखी आहे हे आता समोर यायला लागले आहे. वडिलांच्या अंतयात्रेत पुरेसे रडले नाहीत म्हणून लोकांना शिक्षा देवून त्याने आपल्या खुनशीपणाची जाणीव ज्याने देशाला करून दिली अन मग एन केन कारणांनी लोकांना भयानक पद्धतीने ठार मारत सुटलेल्या North Korean leader Kim Jong-un
किम जोंग उन च्या करामती तुम्हाला नक्कीच सुन्न करतील.

1. कर्दनकाळ किम

वडिलांच्या मृत्यूनंतर 2011 साली किम जोंग उनने उत्तर कोरियावर आपली हुकुमशाही सत्ता राबवायला सुरु केले. जे जे लोक वडिलांच्या मृत्यूनंतर म्हणावे तसे रडले नाहीत त्याना पहिल्यांदा जेलमध्ये बंद करण्यात आले. वडिलांच्या बरोबर काम केलेल्या ऑफिसर्स एक तर काढून टाकण्यात आले व ठार मारण्यात आले. किमच्या डोक्यात लोकाना ठार मारण्याच्या भयंकर कल्पना असतात. मिटिंगमध्ये केवळ डोळे मिटले म्हणून दोन ऑफिसर्सना चक्क विमान विरोधी तोफेसमोर उभे करून तोफ उडवायची कल्पना त्याचीच. त्यांचा केसही दिसता कामा नये ही त्याची ऑर्डर. स्वतःच्या काकाचे कपडे काढून त्याला पिसाळलेल्या कुत्रांच्या पिंजऱ्यात टाकून तो मरताना बघण्याची विकृती त्याचीच. सावत्र भावाला (Kim Jong Un’s older half-brother, Kim Jong Nam) चक्क मलेशियातील विमानतळावर दोन महिलांद्वारा विषाचे इंजेक्शन देवून संपवण्याची विष किमया किमचीच. त्याच्या विचारांना न मानणाऱ्या प्रत्येकाला मारण्याचा विडा उचललेल्या किमने 2014 साली 50 ऑफिसर्सना केवळ दक्षीण कोरियातील टीव्ही प्रोग्रॅम बघितला म्हणून फाशी देण्यात आली. आजमितीला दोन लाख लोकाचा अशाच काहीबाही कारणांनी किमने जेलमध्ये छळ चालवला आहे.

2. केश कर्तनकार किम

कोरियाचा सर्वेसर्वा असा हा हुकुमशहा स्वतःचे केस स्वतः कापतो हे वाचून आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. किम जोंग उन हा खुनशी तर आहेच पण त्याला हे पण माहित आहे की त्याच्या या वागण्याने त्याने अनेक शत्रू निर्माण केले आहेत. या घातकी किमने संहारक अणूबॉम्ब तयार करून जगालाच वेठीस धरण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळेच जगातील अनेक देश त्याला मारण्यासाठी छुपे प्लान्स करतील या शंकेनेच किम सतत अलर्ट असतो. अन सुरक्षितेच्या कारणामुळेच तो स्वतःचे केस स्वतः कापतो. स्वतःच्या स्टाईलने.

अन हो देशातील इतर सर्व नागरिकांनी त्याची ही केसाची स्टाईल चोरायची नाही हा प्रेमळ सल्ला द्यायला तो विसरला नाही बरं का. यंग मुलांचे केस 2 इंच तर ओल्ड लोकांचे पावणे तीन इंच. बस.. यामध्ये सुद्धा उत्तर कोरियात पुरुषांसाठी सरकारने ठरवून दिलेल्या 28 स्टाईल्स प्रमाणेच केस कापावे लागतात. नाहीतर गळाच कापला जातो.

3. खादाड पेदाड किम

किमचा फोटो बघितल्यावर तो जरा जास्तच हेल्दी वाटतोय ना? त्याच्या या जाडीचे राज त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीत लपले आहे. (खरे म्हणजे लपलय असे म्हणता येत नाही) किमला स्विझर्लंड चीज फार आवडते. फार म्हणजे फार. सरकार खास त्याच्यासाठी चीज आयात करते. तर या अति चीज खाण्यामुळे किंचे गाल गोबरे अन शरीर गोल. दोस्तहो, गोष्ट इथेच थांबत नाही. किमला रशियन व्होडका पिण्याचा पण किरकोळ शौक आहे. 2016 साली त्याने पिण्यावर सुमारे दोन कोटी सत्तावन लाख रुपये खर्च केले आहेत असे डेली मेलचे म्हणणे आहे. गोष्ट इथेच थांबत नाही तर किम चेन स्मोकरही आहे. देश उपासमारीत असतांना धूर काढण्यावर किमने 2016 साली दीड कोटी रुपये खर्च केले. गोष्ट इतक्यातच संपत नाही. खादाड पेदाड अन धुराडे असलेल्या या किमने स्वतःसाठी तरुण मुलींची एक प्लेझर टीम तयार केली आहे अन त्यांच्या सुखसोयींसाठी होणाऱ्या वारेमाप खर्चाचे आकडेही भान्नाटच आहेत.


4. टॉयलेटला न जाणारा दैवी शक्तीचा किम

किम बद्दल उत्तर कोरियात एक खौफ आहे. कदाचित त्यामुळेच तिथली जनता किमला एक दैवी देणगी समजतात. जनतेचे असे मानणे आहे की किम जोंग उन देव आहे अन त्याला कधीही सामान्य माणसाप्रमाणे एक वा दोन नंबर करायला लागत नाही. वयाच्या तीसऱ्याच वर्षी तो चारचाकी चालवायला लागला. तो कोठल्या शाळेत शिकला हे कोणालाच माहित नाही. काहींच्या मते तो “पाक उन” या खोट्या नावाने स्वित्झर्लंड मध्ये शिकला. (Pak Un from North Korea)  पण कोणत्या शाळेत हे माहित नाही. गम्मत म्हणजे त्याचा जन्म कोणत्या साली झाला ह्याबद्दलसुद्धा एकमत नाही पण विद्यापीठात शिकत असताना त्याने 1500 पुस्तके लिहिली यावर लोकांचा ठाम विश्वास आहे. म्हणजे दिवसाला एक पुस्तक असा त्याचा लिहायचा स्पीड होता. याबाबतीत कदाचित रजनीकांतपण आवक होईल असे वाटते.

5. घड्याळाचे काटे उलटे फिरवणारा किम

किम हा उलट्या दोकाचा अन उलट्या काळजाचा आहे हे आत्तापर्यंत समजलेच असेल. जगाच्या उलट्या दिशेने कोरियाला न्यायचेच या उद्देशाने हर रोज नाव नाव पैतरे आजमावयाचा त्याचा सतत प्रयत्न. म्हणूनच कोरियातील पहिल्या हुकुमशाह “किम II संग” या आजोबांसारखा दिसावे या उद्देशाने त्याने चक्क प्लास्टिक सर्जरी करवून घातली. आता ऐतिहासिक चेहरा मिळाल्यावर देशाला इतिहासातच ठेवायचे म्हणून त्याने सरकारी सोडून इतर सर्व टेलिव्हिजन, इन्टरनेट यावर बंदी घातली. इतकेच नव्हे तर उत्तर कोरियाचे घड्याळ इतिहासात नेले. त्या देशातील सर्व घड्याळाचे काटे मागे फिरवायचा हुकुम दिला. त्याप्रमाणे देशाची घड्याळे 15 ऑगस्ट 2015 आर्ध्या तासाने मागे घेण्यात आली.

दोस्तहो, हे सर्व वाचल्यावर काटेच नाही तर उत्तर कोरियाचे वासेच फिरले आहेत असे वाटते. हो..ना..?

नवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.

920 total views, 1 views today