सर्व जग पाण्याखाली जाणार असल्यामुळे नोहाने नौकेची बांधणी केली अन…

दोस्तहो, लहानपणी “नोहाची नौका” ही गोष्ट तुम्ही वाचलीस असेल. जगबुडीमुळे संपूर्ण मानवजात नष्ट होणार होती. नोहाने मानवाला वाचवले अशी गोष्ट बायबल च्या “ओल्ड टेस्टामेंट” मधील बुक ऑफ जेनेसिसमध्ये नमूद केली आहे. ख्रिस्तपूर्व 1200 ते 100 साली लिहलेल्या या रचना. म्हणजे साधारणपणे 2500 वर्षांपूर्वीच्या. मध्यपूर्व देशामधील खासकरून इस्त्राइल भागात लिहिलेल्या. हिब्रू भाषेतील.

दोस्तहो, इतके डिटेलमध्ये सांगावे वाटले कारण त्याचकाळात दूर येथे भारत देशात लिहल्या गेलेल्या “शतपथ ब्राह्मण” या ग्रंथात या जलप्रलयाचा उल्लेख हुबेहूबपणे केला आहे. जो संस्कृत भाषेत आहे. इतकेच नव्हे तर मत्स्यपुराणातील “मनु” ने नौकेच्या सहाय्याने मानव जातीला वाचवले ही कथा अन नोहाची गोष्ट अगदीच सारखी आहे. जणूकाही भारतातील अन मध्यपूर्वेतील तत्ववेत्यांनी एकमेकाना विचारून लिखाण केले आहे.

वाचा तर “मनू” अन “नोहा” एकच होते असे वाटणारे 5 पुरावे.

1. एकच माणूस तारणहार :

पृथ्वीवरील जलप्रलयाची माहिती फक्त “शतपथ ब्राह्मण” या भारतीय प्राचीन ग्रंथात दिली नाही तर “मत्स्य पूराण”, “भागवत पूराण” अन महाभारतातही दिली आहे. तिकडे परदेशात बायबलमध्ये पृथ्वी पाण्याखाली गेली अन समूळ प्राणीजगताचा नाश झाला हे सांगितले आहे. परंतु दोन्ही ठिकाणी या प्रलयातून पृथ्वीला वाचवण्याचे काम देवाने दिले ते फक्त एकच माणसाला असे म्हटले आहे. बायबलमध्ये “नोहा” अन हिंदू ग्रंथात “मनू” हे ते तारणहार. मनुला सत्यव्रत या नावानेही ओळखले जाते. कोठेही बदल नाही. म्हणजे एका ठिकाणी स्त्री वा अनेक योध्यांना हे काम दिलेय असे नाही. देवाने फक्त एका पवित्र माणसाची निवड केली. इतकेच नाही तर दोन्ही लिखाणात देवाने पृथ्वीला वाचवण्यासाठी नौकेचा वापर कर असे या मानवांना सांगितले. म्हणजे पद्धतही सेम..

2. नोहा अन मनु दोघेही तीन मुलांचे वडील :

दोस्तहो, बायबलमधील नोहाला तीन मुले होती. हाम, शेम अन यापेठ. तर मत्स्यपुराणातील मनुलाही तीनच. चर्म, शर्म अन यापठी. दोघांनाही तीनच मुले. अन त्यांची नावेही किती सारखी असे वाटत नाही का? जरा इंग्रजीत याचे स्पेलिंग बघा. Charma, Sharma and Yapeti ही मनूच्या मुलांची संस्कृत नावे. तर Ham, Sham & Japheth ही बायबलमधील नोहाच्या मुलांची नावे. नावामधील हे साम्य मती गुंग करणारे.

3. देवाने दोघांच्या बोटी पर्वतावरच नेल्या :

तप करणाऱ्या मनुला एकेदिवशी एक छोटा मासा तळ्यात मिळाला. मनुने त्याला न मारता त्याचे संगोपन केले. पुढे हा मासा आकाराने वाढतच गेला. म्हणून मनूने त्याला समुद्रात सोडले. तो मासा मत्स्यरुपी भगवान विष्णू होते. त्यांनीच मग मनूच्या बोटीला प्रलयाच्या काळी मदत केली. अन ती बोट मलय पर्वताच्या शिखरापर्यंत नेली.

नोहाच्या बाबतीतपण तसेच झाले. देवाने नोहाच्या बोटीला प्रलयाच्या काळी मार्ग दाखवला अन ती बोट अरारात पर्वतावर नेली.

दोस्तहो, देवाने दोघांनाही बोटच तयार करायला सांगितले (म्हणजे जादुई विमानवगैरे दिले नाही) दोघांनाही स्वतः मार्ग दाखवला. मनूची बोट तर माश्याच्या रूपातील भगवान विष्णूंनी पर्वतावर ओढून नेली. म्हणजे बघा प्रलयकाळ संपेस्तोवर बोट तरंगत ठेवली अन मग पाणी उतरल्यावर परत जमिनीवर आली असे काही झाले नाही. विशेष म्हणजे दोन्ही बोटींना स्टेअरिंग व्हील वा शिडे नव्हते. चित्रात तुम्हाला तसे काहीच दिसत नाही. तरीसुद्धा बोटी बरोबर पर्वतावरच येऊन थांबल्या. तरंगत कोठेही गेल्या नाहीत.

4. शेकडो वर्ष वयाचे नोहा अन मनु :

जेव्हा पृथ्वीवर जलप्रलय होणार याची जाणीव मनुला झाली तेव्हा त्याने मलय पर्वताच्या पायथ्याला तपस्या करायला सुरुवात केली. मत्स्यपुराणात असे म्हटले आहे की मनुची तपस्या हजार वर्षे सुरु होती अन नंतर प्रत्यक्ष ब्रम्हदेव प्रसन्न झाले. त्यांनीच मनुला तुझ्यामुळे मानव जात वाचेल असा वर दिला. (“मनु” मुळेच आपणाला “मानव” असे म्हटले जाते हे लक्षात असू द्या)

तिकडे देवाने नोहाची निवड केली कारण “नोहा” हा निष्कलंक अन श्रद्धाळू माणूस होता. देवाने नोहाला बोट बांधायला सांगितली. नोहाला बोट तयार करायला 100 वर्षे लागली. जेव्हा बोट तयार झाली तेव्हा नोहा 600 वर्षाचा होता. प्रलय संपल्यावरसुद्धा नोहा 350 वर्षे जगला. म्हणजे नोहा टोटल 950 वर्षे जगला. दोघेही शेकडो वर्षे जगले.

त्यांच्या वयातील साधर्म्य विचार करायला लावते नक्कीच.

5. नोहा मनु अन नंबर सात :

देवाने मनुला अन नोहाला बोट तर बांधायला सांगितलीच पण प्रलयानंतर ओसाड बनणाऱ्या पृथ्वीवर परत जीवसृष्ठी उभी करण्यासाठी काही गोष्टी बरोबर घ्यायला सांगितल्या. त्या काय ते पहा.

बायबलच्या अनुसार देवाने नोहाला प्रत्येक प्रकारच्या प्राण्यांच्या अन पक्ष्यांच्या सात जोड्या बरोबर घ्यायला सांगितल्या. नोहाबरोबर त्यांची पत्नी, तीन मुले अन तीन सुना म्हणजे एकूण सात लोक होते. इकडे मनुला विष्णू देवाने मनूबरोबर सात ऋषींना (सप्तर्षी) घ्यायला सांगितले. प्राण्यांच्या प्रजाती अन झाडांची रोपे व बियाही घ्यायला सांगितल्या.

म्हणजे दोन्ही बोटीमध्ये एक प्रमुख माणूस सोडला तर एकूण सात इतर लोक होते.

सातच कसे ? जास्त वा कमी का नाहीत हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना?

दोस्तहो, नोहाची कथा व मनुची कथा इतकी सारखी आहे हे या 5 पुराव्यावरून समजलेच असेल. इतर कोणताही विचार न करता त्याकाळच्या तत्ववेत्यांचे विचार किती सारखे होते असे आपण म्हणायला हरकत नाही. हो..ना?

भारतीय व जागतिक पौराणिक ग्रंथाचा अभ्यास करणाऱ्या ए.जे.ए. डूबीस यांनी 40 वर्षे या विषयावर अभ्यास करून आपल्या पुस्तकात हेच मत मांडले आहे.

संदर्भ : ‘Hindu Manners, Customs and Ceremonies’, A.J.A. Dubious

1,332 total views, 3 views today