भारताच्या उत्तरेस असलेले तिबेटमधील ल्हासा ठिकाण. चीनी सैनिकांना डोंगरात काही संस्कृत कागदपत्रे सापडली. त्यांनी ती उडत्या तबकड्यावर संशोधन करणाऱ्या डॉक्टर रुथ रेना यांना संशोधनासाठी पाठवली असता उजेडास आली पुराणातल्या विमानाबद्दलची विलक्षण माहिती. डॉक्टर रुथ यांच्या मते पुरातन भारतीयाच्याकडे हवेपेक्षा जड वस्तू हवेत उंच उडवायची कला अवगत होती. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला भेदून अवकाशात झेप घेण्यासाठी “लाघिमा” सिद्धीचा वापर करण्याचे शास्त्र भारतात विकसित झाले होते. लाघिमा म्हणजे मानसिक शक्तीचा अत्युच्य अवतार. ज्याद्वारे सिध्द लोक एका जागेवरून वा एका कायेमधून दुसरीकडे विनासायास प्रवास करू शकतात.  (संदर्भ : www.ufoaevidence.org) डॉक्टर रुथनी हाती आलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून अनेक पुरावे दिले जे सांगू शकतात की पुराणातील विमाने ही सत्य गोष्ट आहे.वाचा तर ही अभिमानस्पद यादी.

1. भारद्वाज ऋषिनी लिहलेले वैमानिक शास्त्र :

सन १८७५ ला एका हिंदू देवळात इसविसनपूर्व चौथ्या शतकात भारद्वाज ऋषिनी लिहलेले वैमानिक शास्त्र हा ग्रंथ सापडला. त्यांनी तो अनेक पुरातन ग्रंथावरून लिह्ल्याची नोंद आहे. या महान ग्रंथात विमान उडवण्याच्या पद्धतीपासून अगदी विमानची वादळ, विज यापासून कसे संरक्षण करायचे याचे शास्त्रीय वर्णन केले आहे. या ग्रंथात एकून आठ भाग आहेत आणी प्रत्येक भागामध्ये आकृत्यासाहित विवेचन आहे. विमानच्या महत्वाच्या ३१ पार्टस पासून ते पार्टस बनवण्यासाठी लागणाऱ्या 11 प्रकारच्या उष्णतारोधक धातुवजा मटेरियलची माहिती आहे.

2. हिटलरने वापरले संस्कृत ग्रंथ :

जागतिक युद्धाच्या पूर्वीपासून हिटलर व नाझी प्राचीन संस्कृत ग्रंथाचा अभ्यास करत होते. तिसाव्या दशकात जर्मन शास्त्रज्ञांचे एक पथक भारत व तिबेट येथे हवेत उडणाऱ्या विमानांचा अभ्यास करण्यासाठी येऊन गेले. महाभारत, रामायण व द्रोणपर्वातील विमानांचा त्यांनी अभ्यास केला. ग्रंथात एका गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या व पाऱ्याचा वापर करून अतिवेगात उडणाऱ्या वस्तूची त्याना माहिती मिळाली. त्याच माहितीवरून नाझींनी आपल्या व्ही – 8 रॉकेटसाठी पल्स जेट इंजिन तयार केले.

3. अलेक्झांडर दी ग्रेट व भारतीय उडत्या तबकड्या :

सुमारे दोन हजार वर्षापूर्वी अलेक्झांडर दी ग्रेटने भारतावर हल्ला केला होता. त्यावेळेच्या इतिहासकारांनी नोंद केल्याप्रमाणे अलेक्झांडरच्या सैन्यावर उडत्या तबकड्यासदृश चक्राकार वस्तुंनी हवेतून चक्कर मारल्या. पायदळ त्यामुळे खूप घाबरले.परंतु त्या भारतीय उडत्या तबकड्यानी सैन्यावर हल्ला केल्याची नोंद नाही.

 4. मोहेंजोदारो हे विमानतळ होते? :

मोहेंजोदारो व दक्षिण अमेरिकेच्या इस्टर आयलंडमध्ये सापडलेले शिलालेख कमालीचे सारखे आहेत. रशियन शास्त्रज्ञांना तुर्केमेनिस्तानमध्ये सापडलेले एखाद्या द्रोणाप्रमाणे दिसणाऱ्या मोठ्या वस्तूमुळे पुन्हा एकदा मोहेंजोदारो हे विमानतळ होते का असा प्रश्न इतिहासतज्ञांना पडला आहे. कारण पुराणात अनेक ठिकाणी पाऱ्यासदृश्य ज्वलनशील पदार्थाचा वापर करून हवेत उडणाऱ्या अर्धगोलाकार विमानांचा उल्लेख आहे. जगातील सात धर्म/तीर्थ स्थळांशी रामराज्यामध्ये संबंध होते हे तर म्हटलेच आहे. आणि त्या अतिदूर ठिकाणांना जाण्यासाठी विमाना सारख्या वाहनाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. वर सांगितल्या प्रमाणे मोहेंजोदारो व दक्षिण अमेरिकेच्या इस्टर आयलंडमध्ये सापडलेले शिलालेख कदाचित या दोन टोकांना असलेल्या विमानताळावरील दिशादर्शक व माहिती देणारे फलक असतील असे शास्त्रज्ञांना वाटते.

5. समरंग सूत्रधारा ग्रंथातील आकृत्यावर आधारित जगातले पहिले विमान :

समरंग सूत्रधारा या संस्कृत ग्रंथात एकूण २३० ओव्या आहेत. हा ग्रंथ हवेत उडणाऱ्या वाहनाविषयीच आहे. पाश्चिमात्य संशोधक स्टेफन काप (Stephen-Knapp ) व विल्यम क्लारेन्डन (William Clarendon ) यांनी या ग्रंथाचे अभ्यास व भाषांतर केले आहे. त्यातून असे दिसून येते की पुराणातील ही विमाने मर्क्यूरी व्हरटेक्स इंजिनाचा वापर करत असावीत. त्यांच्यामते ही विमाने एका चक्राप्रमाणे असावीत ज्याच्या मध्यभागी सौर शक्तीचा वापर करून इंधन तापवणारी यंत्रणा असेल. तयार होणाऱ्या उष्णतेमुळे विमानातील पाती एखाद्या हवेच्या भोवऱ्या प्रमाणे फिरतील. सहाजिकच ते वाहन हवेत उंच उडेल व त्यामध्ये बसलेले प्रवासी विनासायास दूर अंतर पार करू शकतील. स्मार्टदोस्तने भारताची रहस्ये या लेखात उल्लेख केलेले मुंबईचे शिवराम बापुजी तळपदे यांनी याप्रकारच्या तंत्राचा वापर करून राईट बंधूंच्या आधीच जगातले पहिले विमान उडवले होते. स्टेफन काप यांनी तालपडे यांनी हवेपेक्षा जड वस्तू सुमारे १५०० फुट उंच उडवले होते याच उल्लेख केला आहे. या सर्व पुराव्यावरून पुराणातील विमाने खरोखरची विमाने होती हे म्हणू शकतो. कालांतराने उपलब्ध संस्कृत साहित्याचा अभ्यास भारत करू शकला नाही. अन भारत विमानशास्त्रांमध्ये मागे पडला.

1,029 total views, 1 views today