हजारो वर्षांचा इतिहास असणारा भारत हा एक मोठा देश, ज्यामध्ये सतत काही ना काही घडत असते. काही घटना आपल्याला अगदी सहज सर्व काही सांगून जातात. परंतु काही अकल्पित घटना रहस्ये बनून राहतात. वर्षानुवर्षे तपास करूनसुध्दा ही रहस्ये उकलता येत नाहीत. स्मार्टदोस्तने अशाच न सोडवता आलेल्या भारतीय रहस्यांची यादी केली आहे.

1. न खाता-पिता वर्षांनूवर्षेजगलेले प्रल्हाद जानी :

सन 2010 मध्ये सुमारे 35 वैज्ञानीाकांची एक टिम प्रल्हाद जानी या अवलीया साधूची पाहणी करत होते… कारण एकच जानीचे अन्नाचा एकही कण न खाता वा पाण्याचा थेंब न पिता वर्षांनुवर्षेजगणे.

गुजरात मधील मेहसाणा जिल्हातील प्रल्हाद यांना चुनरीवाले माताजी असेही ओळखले जायचे. टिमने जानींची अहोरात्र पाहणी केली.  कॅमेरापुढे त्यांचे व्हिडीओ रेकॉर्डींग करण्यात आले. पंधरा दिवसांच्या बंद खोलीतील प्रयोगामध्ये जानीचा संबंध पाण्याशी फक्त सकाळी तोंड धुताना व आंघोळ करताना आला. परंतू तेव्हाही त्यांनी पाणी पिल्याचे आढळून आले नाही.

२००६ ला डिस्कव्हरी चॅनेलने सुध्दा दैवी शक्तीचे वरदान असलेला माणूस म्हणून जानींची मुलाखत टि.व्ही. वर दाखवली. योगाची किमया का दैवी शक्ती या साधूला जिवंत ठेवत होती. हे अजून देखील रहस्यच बनून राहिले आहे. भारत सरकारच्या ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ फिजीओलॉजीचे’ वैज्ञानीकच नव्हे तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया इ. प्रगत देशातून आलेल्या वैज्ञानिकांना देखील हे कोडे सोडवता आले नाही.

संदर्भ : डेली मेल, लंडन ,7 मे 2010 व बीबीसी न्यूज.

2. शांती देवींचा पुनर्जन्म :

पुर्नजन्माविषयीची ही रहस्य न उलगडलेली कहाणी. शांती देवी या दिल्ली मधील महिलेची, ११ डिसेंबर १९२६ ला जन्म झालेल्या या मूलीला साधारणपणे चार वर्षांची असताना तिच्या  गत जन्माविषयी अनेक किस्से आठवू लागले. तिच्या मते मथुरेतील एका व्यापाऱ्याची ती बायको असून आणी एका बाळाला जन्म दिल्यावर दहा दिवसांनी तिचा मृत्यू झाला. पालकांना जेव्हा हे पटले नाही तेव्हा तिने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. शाळेतील हेडमास्तरांनी या गोष्टीची चौकशी केली तेव्हा खरोखरच मथुरेतील केदारनाथ या व्यापाऱ्याची बायको लुगडी देवीशी तंतोतंत वर्णन जूळणारी कथा शांती देवी सांगते आहे हे लक्षात आले. नंतर केदारनाथ आणि त्याच्या मुलालाही शांती देवीने ओळखले. गोष्ट फार पुढे गेली आणी प्रत्यक्ष महात्मा गांधी पर्यंत ही बाब पोहचवण्यात आली. आणि एक सरकारी चौकशी झाली. १५ नोव्हेंबर १९३५ ला चौकशी समितीसमोर शांती देवीने प्रत्यक्ष मथुरेत जावून गत जन्माचे सर्व पुरावे दाखवून दिले. गूढ म्हणजे चौकशी समितीला देखील शांती देवी ही पूर्वजन्मांची लुगडी देवी आहे हे पटले.

संदर्भ : जर्नल ऑफ रिलीजन ऍन्ड सायकीकल रीसर्च.

3. लडाखमधील लोहचुंबकाच्या टेकड्या :

लेह-कारगील-बाल्टिक नॅशनल हायवेवर सुमारे १४००० फूट उंचीवर असणाऱ्या मॅग्नेटिक टेकड्या हा एक रहस्याचाच भाग आहे. असे म्हणतात की आपल्या वाहनाचे इंजिन जरी बंद केले तरी वाहने अपोआपच टेकडी चढून जातात. काही मदती शिवाय. जणू एक अमानवी शक्तीच त्यांना टेकडीवर ढकलत नेते. नैसर्गीक गुरूत्वाकर्षणाच्या विरूध्द होत असलेले हे कार्य एक रहस्यच आहे वाटते. परंतू अनेकांच्या मते हा एक दृष्टीभ्रम असून खरोखर वाहने टेकडी उतरत असताना सूध्दा ती टेकडी चढत आहेत असे वाटते. त्यामुळेच इंजीन बंद असले तरी ते वाहन चढ चढते असे दिसते.

4. 1600 वर्षे न गंजलेला धातूचा खांब – दिल्ली :

दिल्लीच्या कुतूब भागात गेले 1600 वर्षांपेक्षा जास्त काळ न गंजता टिकून राहीलेला हा धातूचा खांब धातूशास्त्राचा एक अजब नमुना आहे. इतिहासात भारतीय धातूशास्त्र किती प्रगत होते ते दाखवणारा हा पुरावा अजून देखील सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाला न उलगडलेले कोडे आहे.ऊन, हवा, पाण्याचा काहीही परीणाम न होता हजारो वर्षे जसाचे तसा असणारा हा खांब 7 मिटर उंचीचा असून त्याची न गंजण्याची प्रक्रिया एक आधुनिक भारतीय रहस्य बनून राहीली आहे.

संदर्भ : एनशंट हिस्टरी दि मेहरूली आयर्न पिलर.

5. जगातील पहिले विमान राइट बंधूनी नव्हे तर महाराष्ट्राच्या तळपदेंनी उडवले होते का?

संपूर्ण जगाला सांगण्यात आलेली वा माहीत असलेली गोष्ट म्हणजे राइट बंधूंनी जगातील पहिले विमान बनवले. परंतू जून  1895 मध्ये, म्हणजे राइट बंधूच्या विमानाच्या नऊ वर्षेआधी मुंबईमध्ये विमान उडवण्याचा पराक्रम ‘शिवकर बापूजी तळपदे’ यांनी केला होता अशी बातमीवजा नोंद तत्कालीन प्रसिध्द आंतरराष्ट्रीय टाइम्स आणि इतर काही भारतीय वृत्तपत्रांनी केली आहे. तळपदेंचे ते विमान 1500 फूट उंचीवर उडाले होते आणी त्याचे नाव त्यांनी ‘मरूतसखा’ असे ठेवले होते. हवेपेक्षा जड अशा वस्तूचे इतक्या वर उडवणे हा जगातला पहिला प्रयोग होता. पैशा अभावी तळपदेंना तो प्रयोग पुढे नेता आला नाही.

तळपदेच्या त्या विमानाचे पुढे काय झाले याचे रहस्य कागदपत्रांच्या अभावामुळे रहस्यच राहीले.

संदर्भ : विमाना एअरक्राफ्ट ऑफ एनशंट इंडीया ऍन्ड ऍटलांटीस.

1,070 total views, 1 views today