सौरमालेत सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर असणारी आपली पृथ्वी मूळातच एक नैसर्गिक चमत्कार आहे. मोफत ऑक्सीजन, मोफत पिण्याचे पाणी आणि पोषक वातावरण देणाऱ्या या पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणे आहेत जी निसर्गाचे चमत्कारीक रूप दाखवून देतात. निसर्गाचे हे रूप पाहिल्यावर मानवाच्या स्वतःला ग्रेट समजण्याच्या वल्गना किती फोल आहेत ते लगेच समजते.

1.  नरकाचा दरवाजा :

‘‘डोअर टू हेल’’ असे भयंकर नाव असणारे हे ठिकाण म्हणजे खरोखरच नरकाचा दरवाजा असल्यासारखे वाटते. तूर्केमेनीस्तान मधील दरवाजा नावाच्या खेड्यामधील हा प्रचंड मोठा खड्डा. (दरवाजा हा शब्द पर्शियन आहे. मराठीमध्ये सूध्दा हा शब्द वापरला जातो) सन १९७१ मध्ये जमीनीखालील नैसर्गिक वायूचा शोध लावण्यासाठी ड्रीलमशीनने भोक पाडत असताना अचानक सर्व जमीनच खचली. सर्व कामगार व मशीन्स सहीत. सारेकाही क्षणात पृथ्वीच्या पोटात गडप झाले. आणि उघडला हा नरकाचा दरवाजा. सूमारे ७० मिटर व्यासाच्या ह्या खड्ड्यातून लाव्हारसाच्या ज्वाला व विषारी वायू आजअखेर बाहेर पडत आहे. धाडशी असाल आणि खड्ड्यांच्या कडेवरून आत पहाल तर लाव्हारसाची नदीच खालून वाहत आहे हे दिसेल.

2. उल्कापाताने तयार झालेले ‘लोणार सरोवर’ :

बासाल्ट दगडामध्ये तयार झालेला जगातील एकमेव नैसर्गिक चमत्कार. सूमारे ५०,००० वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील बूलढाणा जिल्ह्यातील लोणार गावामध्ये एक भयंकर उल्का आदळली. अंतराळातून एक लाख टनापेक्षा जास्त वजनाचा एक दगड सेकंदाला १८ किलोमिटर या प्रचंड वेगाने लोणारवर अदळला. या धक्क्याने पृथ्वीवर जवळजवळ दोन किलोमीटर व्यासाचा आणि १५० मिटर खोलीचा खड्डा पडला. एखाद्या सहा मेगाटन वजनाच्या बॉम्बमूळे तयार होईल अशी उष्णता यामूळे तयार झाली. कालांतराने या खड्ड्यामध्ये पाणी साचून त्याचे खाऱ्या  पाण्याच्या सरोवरामध्ये रूपांतर झाले.

३. रोराईमा पर्वतावरी ढगांमधील पठार :

ब्राझीलच्या टोकाला रोराईमा पर्वतावरील एक अतिसूंदर पठार त्याच्या अनोख्या उंचीमूळे प्रसीध्दीस आले आहे. सूमारे ४०० फूटांच्या सरळसोट कड्यांवर तयार झालेला हा एक त्रिकोणी प्रदेश. या भागात जवळपास रोजच पावूस पडतो. त्यामुळे सगळीकडे हिरवाई.पठारावर पोहचण्याचा एकच मार्ग म्हणजे कड्याला लागून तयार केलेला लोखंडी पायऱ्या. त्या मार्गावरून जाणेसुद्धा एक दिव्यच. तुम्ही रॉक क्लाइम्बर असाल तर सरळसोट कड्यावरून चढत वर जायचा विचार करू शकता. पण जेव्हा तुम्ही हे कठीण दिव्य पार पडता अन जेव्हा तूम्ही पठारावर जाता तेव्हा मात्र सर्वबाजूनी ढगांनी तूम्हाला वेढलेले असते. जणूकाही ढगांच्या गादीवरच तूम्ही उभे असता. एक स्वर्गीय अनूभव देणारा नजारा एक चमत्कारच.

4. फक्त पाचच लोकांनी पाऊल ठेवलेले जगातील सर्वांत उत्तरेकडील ठिकाण :

पृथ्वीवरील सर्वांत उत्तरेकडील जमीनीचा भाग म्हणून ‘८३-४२‘ या नावाने  या टोकाला ओळखले जाते. हा एक छोटासा ३५ मिटर लांब, १५ मिटर रूंद व ४ मिटर उंच प्रदेश उत्तर ध्रूवापासून ४०० मैलावर आहे. सभोवताली फक्त बर्फ, बर्फ आणि बर्फच. जगण्यायोग्य एकही गोष्ट नाही. अश्या या भूभागावर आजवर फक्त पाचच लोकांनी पाऊल ठेवले आहे. सन १९९८ पर्यंत एक दुसरेच “याक्नू” नावाचे ठिकाण जगाचे उत्तर टोक म्हणून प्रसिद्ध होते. जेव्हा उत्तर ध्रुव बर्फाने झाकलेला असतो तेव्हा आपला ८३-४२ मात्र एकटाच बर्फावर विराजमान असतो. एखाद्या ध्यानस्थ योग्याप्रमाणे निश्चल.

5. उकळत्या चिखलाचे रोटोरूवा :

न्यूझीलंडच्या उत्तरेस रोटोरूवा नावाचे एक बूडबूड्यांचे शहर आहे. बूडबूड्यांचे अशा अर्थाने की या शहरात जागोजागी उकळत्या चिखलांची तळी आहेत. पृथ्वीच्या पोटात होणाऱ्या रासायनिक प्रक्रीयेमूळे या तळ्यातून गरम वाफेचे बूडबूडे येतात. या शहराला ‘‘कूजक्या अंड्यांचे शहर’’ असेही ओळखतात. कारण जमिनीखालील घडामोडींमूळे गंधक वायूंचा फवारा या तळ्यांतून बाहेर पडतो. यामूळेच वातावरणात एक नाकोशी दूर्गंधी तयार होते. अजब पृथ्वीचा अजब चमत्कार म्हणूनच ओळखले जाते रोटोरूवाला.

1,100 total views, 1 views today