दुसऱ्या जागतिक युद्धाचा काळ. जगावर राज्य करण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्या नाझींना त्यांच्यात आर्यांचे रक्त आहे व अर्यांकडे दैवी शक्ती असते असे वाटत होते. जगावर हुकुमत गाजवताना याच दैवी शक्तीचा उपयोग करता येईल असे त्यांच्यापैकी काहींना वाटत होते. म्हणूनच मूळ आर्यांच्या शोधासाठी आर्यांच्या उगमस्थानामध्ये म्हणजेच हिमालयाच्या शिखरांमध्ये नाझी नेता हेन्रिक हिमलर अनेक तिबेटी साधुंना भेटून गेला होता ही गोष्ट युद्धानंतर जगभर झाली. अन साऱ्या जगाचे लक्ष हिमालयाच्या या भागाकडे वळले. ज्या प्रदेशात हिमलर गेला होता त्या प्रदेशांत अतिप्राचीन मनुष्य वस्ती होती व आकाशातल्या देवाशी त्यांचे कनेक्शन राहावे म्हणून या लोकांनी हिमालयातील या ठिकाणी एक भले मोठ्ठे पिरॅमिड बांधले असे सांगणारे अनेक पुरावे नंतर जगापुढे आले. दोस्तहो, ज्याला आज आपण कैलास पर्वत म्हणून ओळखतो, ज्याभागात देवांचा देव महादेव राहतो असे आपण म्हणतो त्याच त्रिकोणी पर्वताबद्दल आज मी लिहतोय. असे काय सापडले होते या भागामध्ये ज्यामुळे जगाला हा मानवनिर्मित पिरॅमिडच आहे असे वाटले? रशियन राजा निकोलाय रोमोनाव पासून अगदी मार्क्स अन लेनिनना का या कैलास पर्वताचे रहस्य आकर्षित करत होते?

1. रशियन संशोधकाचा दावा :

एकोणीसाव्या शतकाचा प्रारंभ. रशियन संशोधक मुल्दाशेव एका खास मोहिमेवर कैलास पर्वतावर दाखल झाला. लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याने कैलासचे जे चित्र जगासमोर आणले ते खरोखरच थक्क करणारे होते. पर्वताचे शिखर हे साधारणपणे 1800 मिटर चौकोनी असून एखाद्या तासलेल्या दगडी आकृतीसारखे आहे, त्याच्या सभोवतीस इतर लहान मोठ्या आकारच्या इतर 100 त्रिकोणी टेकड्या आहेत हे त्याने सिध्द केले. कैलासचे कडे एखाद्या आरश्यासारखे असून कदाचित जगातील इतर पिरॅमिडशी संदेश पोहचवण्यासाठी केलेला डिश अॅन्टेना जसा काम करतो तसा हा त्रिकोणी टॉवर आहे. हे काही नैसर्गिक काम नाही तर कैलास एक मानव निर्मित पिरॅमिड असेल हा त्याचा दावा नंतर इतर अनेक परदेशी संशोधकांनी मान्य केला. (संदर्भ : G.C. Rawling, The Great Plateau, London, 1905).

2. कैलासवर कोरलेले स्वस्तिक :

तिबेटीयन . ग्रंथात कैलासला यंग द्रंग गी तेग म्हणजे नऊ मजली स्वस्तिक पर्वत असे म्हटले आहे. कैलासच्या दक्षिण बाजूला स्वस्तिक कोरल्यासारख्या रेषा कित्येक किलोमीटर अंतरावरूनही दिसतात. तिबेटीयन बुद्धांच्या मते हे ठिकाण तांत्रिक उपासनेचा देव देमचंग याचे निवासस्थान आहे. हिंदू धर्मातसुद्धा स्वस्तिक चिन्हाला महत्व आहे. देवांचा देव महादेव व पार्वती याच कैलास पर्वतावर वास्तव करायचे असा उल्लेख अनेक ग्रंथात आहे हे आपण जाणतोच. जैन ग्रंथातसुद्धा कैलासचा उल्लेख दैविक उपासनेचे ठिकाण असा आहे.
कदाचित या सर्व धर्मियांना कैलास पर्वतावर अत्यंत प्रगत लोक राहत आहेत हे माहित होते अन त्या प्रगत लोकांनी, देवानी या पर्वतावर स्वस्तिक कोरले असेल जेणेकरून मानवाला त्यांची जाणीव होईल.
आठवतंय ना नाझीचे स्वस्तिक? याच कारणासाठी नाझीनी त्यांचे नाते देवाशी आहे हे दाखवण्यासाठीच स्वस्तिक चिन्हांची निवड केली होती.
संदर्भ : Unsolved Mystery of Mount Kailash, Dec 31, 2012

3. जगाचा सेंटर कैलास :

कैलासचा हा भूभाग जगाचा सेंटर आहे हे अनेक पौराणिक ग्रंथात लिहले आहे. अॅक्सीस मंडी, जगाचा मध्य वा नाभी या असे ओळखल्या गेलेल्या या रहस्यमय पण त्याच बरोबर पवित्र पर्वताला तिबेटमध्ये कांग रिनपोचे म्हणजे बर्फाचा मौल्यवान हिरा या नावाने ओळखले जाते, तोच हा मेरू पर्वत वा सुमेरू पर्वत. कैलासच्या चार बाजू बरोबर पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशेस तोंड करून आहेत. याच चारी बाजूंकडून चार वेग वेगळ्या नद्या उगम पावतात ज्या पृथ्वीला चार भागात विभागतात. हा काही योगायोग समजता येत नाही. धर्मग्रंथात कैलासला पृथ्वीचे 7 चक्र म्हणून म्हटले जाते. याचा अर्थ पृथ्वीवरून परग्रहावर संदेश पाठवण्यासाठीचे कैलास हे ठिकाण होते. विष्णू पुराणात तर कैलास भोवतीच्या सहा पर्वतरांगा ह्या कमळाच्या सहा पाकळ्या असून कैलास हा पृथ्वीचा मध्य भाग आहे असा उल्लेख आहे. आकाशातून खरोखरीच तसे दृश्य दिसते.

4. मानस अन राक्षस सरोवर : सूर्य अन चंद्राच्या आकृत्या

कैलासच्या पायथ्याला मानस सरोवर आहे हे तुम्हाला माहीतच असेल. त्याला लागूनच राक्षस तळे आहे. पण मी आता पुढे जे सांगणार आहे ते कदाचित तुमची माती गुंग करेल. मानस सरोवर हे सूर्यासारखे गोलाकार आहे व ते जगातील उंचावरील गोड्या पाण्याचे सरोवर आहे. मानसला पवित्र मानले जाते. याच मानस सरोवराजवळ राक्षस तळे आहे. पटणार नाही पण राक्षस तळे हे चंद्रासारखे अर्ध गोलाकार आहे. त्याहून थक्क करणारी गोष्ट म्हणजे हे तळे खाऱ्या पाण्याचे आहे. चित्रात तुम्हाला ही तळी किती जवळ आहेत हे समजेलच. मानस कायम शांत असतो पण राक्षसवर सतत प्रचंड वारा घोंगावत असतो. हे नैसर्गिक वाटते का? साऱ्या जगात खाऱ्या व गोड्या पाण्याची सरोवरे इतक्या जवळ जवळ कोठेच सापडत नाहीत.

5. कैलास जवळ एक ममी ठेवण्याची जागा? :

कैलास पर्वत मानव निर्मित आहे असे वाटण्याचे आणी एक कारण म्हणजे पर्वताच्या पायथ्याला सापडलेल्या अनेक गूढ गुंफा. कैलासच्या चिनी बाजूला “सार्कोफेगस नंदा” (Sarcophagus Nanda) हे ठिकाण आहे. सार्कोफेगस म्हणजे ममी ठेवण्याची जागा. जगात पिरॅमिड राजाचे मृत शरीर चिरंतन ठेवण्यासाठी व त्याच्या पुढच्या प्रवासासाठी तायार केलेली जागा असते हे तुम्हाला माहीतच आहे. चिनच्या बाजूस सापडलेल्या या गुंफा हा तत्कालीन प्रगत मानवाच्या अंशास “डीप मेडीटेशन” स्वरूपात ठेवण्यासाठीच केल्या आहेत असे चिनी प्राचीन ग्रंथात लिहले आहे. याचा अर्थ जेव्हा मानव जातीचा अंत होईल तेव्हा पुनश्च मानवनिर्मितीस या गुंफा मधील अवशेष उपयोगी येतील या उद्देशानेच काहीसा प्रयोग येथे केला असेल अशी शंका संशोधकांना येते. कैलासचे अतिशीत वातावरण एखाद्या फ्रीज सारखे कामही करू शकेल हे नक्की.
तेव्हा दोस्तहो, कैलास पर्वत हे एक गूढ प्रकरण आहे. यावर चढाई करायला गिर्यारोहकांना बंदी असणे, येथे राहिला तर तुम्ही लवकर म्हातारे होता असे वारंवार सांगणे हे काहीसे विचित्र आहे. अन त्यामुळेच कैलास मानवाचा परग्रहावासियाशी संपर्क कायम ठेवण्यासाठी केलेला आठ पायऱ्यांचा त्रिकोणी मनोरा वा पिरॅमिड आहे का ही शंका. जमले तर अधिक माहित घ्या तुम्हाला नक्की पटेल.

2,710 total views, 3 views today