राष्ट्रीय उद्याने मुळातच नैसर्गिक जैवसंपत्तीने नटलेली असतात. त्यात एखाद्या देशाने जाणीवपूर्वक या संपत्तीचे संवर्धन करायचे ठरवले तर… पृथ्वीवर जणू स्वर्गच.
स्मार्टदोस्तने अशाच स्वर्गवत सौंदर्यअसणार्‍या 5 सुंदर राष्ट्रीय उद्यानाची यादी बनवली.

1. प्लिटबाइसलेक, क्रोएशीया :

क्रोएशिया मधील प्लिटवाइस राष्ट्रीय उद्यान नैसर्गिक डोंगर, नद्या व तलावांनी परीपूर्ण आहे. बहूतांशी तलावांच्या पाण्यामध्ये ट्रावरटाइन नावाचा पदार्थ सापडतो. यामुळे पाण्याला एक मोहक निळसरपणा येतो आणि पाणी स्वच्छ चमकदार होते. याचमुळे एक स्वर्गीय नजारा प्लिटबाइस उद्यानात पहावयास मिळतो. हायकिंग करणाऱ्यासाठी तसेच निसर्गात निवांत काळ घालवणाऱ्यासाठी  प्लिटवाइस एक सुंदर ठिकाण.

2. सागरमाथा राष्ट्रीय उद्यान, नेपाळ

नेपाळमधील निसर्गसौंदर्याबद्दल आपणास माहीतच आहे. सुंदर हिमशिखरे, शेर्पांची घरे, माऊँट एवरेस्टचा नजारा या सर्वांमुळे सागरमाथा उद्यान तुम्हाला एक सुंदर अनुभव देते. भारतापासून जवळच असलेले हे ठिकाण लाइफमध्ये एकदातरी जरूर पहा.

3. इगूवाझू (Iguazu) अर्जेंटीना व ब्राझील :

अर्जेंटीना आणि ब्राझील देशांदरम्यान असणारे हे उद्यान. शेकडो लहान-लहान धबधब्यांनी बनलेले इगूवाझू फॉल्स एका चंद्राकार कड्यावरून फेसाळत खाली येतो. पूर्ण नैसर्गिक वनसंपदा व प्राण्यांना येथे संरक्षण असल्याने इगूवाझू आपले सौंदर्य टिकवूनआहे. विशेषतः वन्यप्राण्याच्या मुक्त विहारामुळे एक वेगळाच अनुभव हे उद्यान देते.

4. ग्रँड कॅनॉय, अमेरीका :

कोलॅरॉडो नदीने शेकडो वर्षांपासून अविरत वाहून तयार केलेले नैसर्गिक शिल्प सौंदर्य. युनेस्कोने नैसर्गिक आश्चर्य म्हणून गौरवलेले हे ठिकाण. अरिझोना मध्ये सुमारे १२,००,००० एकर्समध्ये हा चमत्कार पहावयास मिळतो. अमेरिकेतील सर्वात स्वच्छ हवा असलेले हे ठिकाण सुंदर राष्ट्रीय उद्यानाच्या यादीत वरच्या क्रमांकावरआहे.

5. स्नोडोनेया, वेल्स :

३५६० फूट उंचीच्या स्नोडोन पर्वत रांगात वसलेले ह्या अतिसुंदर उद्यानाला हजारोनी पर्यटक भेट देतात. फोटोग्राफर्सचे नंदनवन असणाऱ्या  या उद्यानाला ६० किलोमीटर्सचा समुद्रकिनारा देखील आहे. ऐतीहासिक दगडी राजवाडे, गढ्यांचे अस्तित्व असणारे स्नोडोनेया एक अतिसुंदर ठिकाण आहे.

919 total views, 1 views today