अमेरिकेचा शोध लावणारा म्हणून कोलंबसची जगभर ओळख आहे. कोलंबसच्या समुद्रसफारींचा त्याच्या हुशारीचा आणि धाडसाचे धडे कैक वर्षे आपण शिकत आलो. इतकेच नाही तर खुद्द अमेरिकेतही कोलंबसच्या या  विजयी सफरीचा दिवस साजरा केला जातो. परंतु कोलंबस विषयी आपण बऱ्याच गैरसमजुती बाळगत आलो हे अभ्यासाअंती सिध्द झाले आहे. अशाच गोष्टी ज्या कोलंबसचे चुकीचे चित्र रंगवतात. स्मार्टदोस्तने जमा केलेली नेटवरची खरी माहीती. वाचा Misconceptions Schools Still Teach About Christopher Columbus.

1. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. (चूक) :

अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला असे शिकवले जाते. परंतू कोलंबसने अमेरिकेचा शोध लावण्यापूर्वी त्या मोठ्या खंडप्रायप्रदेशात मूळचे रहवासी हजारोंनी रहातच होते. म्हणजे कोलंबसने नवीन राहण्यायोग्य रिकामा प्रदेश शोधून काढला नाही तर तेथे पूर्वीपासूनच लोक राहत होते. तुम्ही म्हणाल कोलंबसने एक यूरोपीयन म्हणून प्रथम अमेरिकेवर पाऊ ल ठेवले. परंतू ते ही खरे नाही कारण कोलंबस तिथे पोहोचण्याच्या शंभर वर्षापूर्वीच दर्यावर्दी ‘लिफ एरीक्सन’ याने सध्याच्या न्यूफाऊँड लॅड या भागात स्वत:ची कॉलनी स्थापन केली होती. म्हणजे कोलंबसने प्रवास सुरू करण्याच्या आधीच दुसऱ्या एका युरोपीयनने अमेरिकेत डेरा टाकला होता. कोलंबस पोहचला तो बहामा या प्रदेशात.

लाइव्ह सायन्स मासिकाच्या मते “What Columbus “discovered” was the Bahamas archipelago and then the island later named Hispaniola”.

2. कोलंबसचे नाव ख्रिस्तोफर कोलंबस होते. (चूक) :

अजब वाटेल पण ज्याच्याबद्दल आपण पिढ्यान-पिढ्या बोलत आलो त्या कोलंबसचे आडनाव पण कोलंबस नव्हते आणि नावपण ख्रिस्तोफर नव्हते. या गृहस्थाचे मूळ स्पॅनिश नाव “ख्रितोबल कोलोन” (Cristobal Colon) असे होते. म्हणजे हा मूळचा ख्रितोबल आहे तर?

थांबा.. मिस्टरी येथेच संपत नाही. ख्रितोबलचा जन्म इटलीत झाला होता असे इटालियन अमेरिकन म्हणतात. पण गम्मत म्हणजे इटलीचाच जन्म 1861 पर्यंत झाला नव्हता. कोलंबसच्या सफारी 1492 च्या दरम्यान सुरु झाल्या तेव्हा इटली हा देशच मुळी अस्तित्वात नव्हता. असो या ग्राहस्थाचे जन्माच्या वेळेचे  नाव  ‘ख्रितोफोरो कोलंबो’ (Cristoforo Colombo) असे होते. नंतर तो स्पेनवासी झाला तेव्हा ख्रिस्तोबल कोलोन झाला. नंतर याच ख्रिस्तोबल कोलोनच्या नावाचा  प्रवास  ‘ख्रितोफर कोलंबस’ या नावाशी संपला. आज आपण त्याला या शेवटच्या बदलेल्या नावाने ओळखतो. खऱ्या नावाने नाही. वा रे Christopher Colombus.

3. कोलंबस गुलामांची विक्री करायचा. (बरोबर)

कोलंबस हा धाडसी दर्यावर्दी होता आणी तो फक्त नवनवीन प्रदेशांचा शोध लावण्याचे काम करायचा असा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे.परंतू कोलंबस हा मुळात एक गुलामांची विक्री करणारा दर्यावर्दी होता. पोर्तुगालसाठी हे काम तो मोठ्या प्रमाणावर करायचा.  इस्पानोला या प्रदेशाचा राज्यपाल Governer of Hispaniola म्हणून त्याने बरेच वर्षे काम केले होते. किंबहुना याच काळात त्याने गुलामांच्या विक्रीस प्रारंभ केला. त्याने स्थानिक राहिवाश्यांचा अतोनात छळ केला. वॉशिंग्टन पोस्ट वार्तापत्रात five-myths-about-christopher-columbus या सदराखाली ही माहिती प्रसिध्द झाली आहे.

4. कोलंबसकडे ‘निना’ आणि‘पिंटा’ नावाची गलबते होती. (चूक)

असे शिकवले जाते की सन 1492 ला कोलंबस नवीन जगाचा शोध घेण्यास सागरात उतरला तेव्हा त्याच्याकडे ‘निना’, ‘पिंटा’ आणी ‘सांता मारीया’ ही गलबते होती. सांता मारीयाबद्दल आपण आधी वाचले आहे. परंतु निना आणि पिंटा अशी गलबते मुळात अस्तित्वातच नव्हती.
खलाशांनी पाडलेली ही टोपण नावे होती. One ship was named the Santa Maria, but the other two names that we use today are just nicknames used by the crew. जूआन निनो या जहाज मालकामुळे पडलेले निना आणि स्पॅनिश भाषेत नाच-गाणी करणाऱ्या स्त्रियांवरून विनोदाने तयार झालेले पिंटा अशी ही दोन टोपण नावेआहेत.

5. पृथ्वी गोल आहे हेसिध्द करण्याचा कोलंबसचा प्रयत्न होता. (चूक)

कोलबंसच्या समुद्रसफारीचा एक मुख्यहेतू म्हणजे दुनिया गोल आहे हे दाखविणे असा होता असे बरेचजण शिकवतात. कोलंबसची बोट एका ठिकाणावरून निघाली अन अनेक वर्षांनी परत त्याच ठिकाणी आली. अन मग त्याला साक्षात्कार झाला की पृथ्वी गोल आहे. दोस्तहो, हे सत्य नाही, कारण कोलंबसला तसे करण्याची गरजच नव्हती. इसवी सन पूर्व सहाव्या शतकातच पायथागोरसने पृथ्वीच्या गोलपणाबद्दल सत्य जगासमोर आणले होते. म्हणजे यानंतर सुमारे 2000 वर्षांनी सर्व जगाला माहीतच होते की पृथ्वी गोल आहे. Pythagoras proved that the planet was round way before, in 600 BC, so it is foolish to think Columbus went on a quest to prove something that was already proven.

तेव्हा कोलंबसने काही पृथ्वीच्या गोलपणाबद्दल शोध लावण्याचा प्रयत्न केला नाही, हे सत्य आहे. अन जर कोणी शाळेत तसे शिकला असाल तर ते चुकीचे आहे.

नवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.

591 total views, 2 views today