आपल्या अफलातून पदलालित्याने आणि बेभान गाण्याने कोट्यावधी रसिकांवर राज्य करणाऱ्या  मायकेल जॅक्सन बद्दल आपण बरेच काही जाणून आहोत. त्यांचा तो प्रसिध्द ‘मून वॉक’ पासून ते चेहऱ्यावर केलेल्या जवळपास 7 प्लॅस्टीक सर्जरीं पर्यंत देशोदेशींच्या चाहत्यांना पुष्कळ काही माहीत आहे. म्हणून जेव्हा स्मार्टदोस्तला मायकेलविषयी नविन माहिती काय द्यायची असा प्रश्नन पडला तेव्हा समोर आली काहीशी विचित्र वाटणारी, परंतु खरीखुरी माहीती.

1. मायकेलला स्पायडर मॅन व्हायचे स्वप्न होते

अनेकांना पॉवरफुल दैवी शक्ती असणारा मनुष्य बनायची इच्छा असते. अफाट संपत्तीचा मालक असलेल्या मायकेललाही असेच एक स्वप्न होते, ‘स्पायडर मॅन बनायचे’. त्याने ते वेगळ्या मार्गाने पूर्ण कराण्याचा प्रयत्न सुध्दा केला. मार्व्हल कॉमिक्स या कंपनीकडे स्पायडर मॅन चित्रपटाचे स्वामित्व होते. नव्वदच्या दशकात जेव्हा मार्व्हल कॉमिक्स आर्थिक अडचणीत होती तेव्हा मायकेलने ती कंपनीच विकत घेवून स्वत:च स्पायडर मॅनचा रोल करण्याचा मायकेलने घाट घातला. ते काही शक्य झाले नाही आणि टोबे नावाच्या दुसऱ्या  कलाकारानेच स्पायडरमॅन साकारला.
नंतर सुध्दा एक्स मॅन चित्रपटात प्रोफेसर एक्सचा रोल मायकेलला करावा वाटला. डिल जमले नाही आणि पॅट्रीक स्टिवार्टने तो रोल केला.

संदर्भ: टीनन्यूज.कॉम

2. मायकेलला त्वचा पांढरी होण्याचा त्वचारोग होता

आफ्रिकन अमेरिकन वंशाचा मायकेल रंगाने लहानपणापासून काळसर होता. परंतु ‘व्हायटिलिगो’ हा त्वचेचा रंग जाणारा आजार मायकेलला झाला. या आजारामुळे मायकेलच्या शरिरावर पांढरे चट्टे उठू लागले. डॉ. अरनॉल्ड क्लेन या त्वचारोग तज्ञाने बरेच उपचार केले परंतु मायकेलची त्वचा संपूर्णपणे पांढरी पडली.

गम्मत म्हणजे उपचार करणाऱ्या डॉ. अरनॉल्ड यांच्या डेबी रोवे या नर्स बरोबरच दरम्यान मायकेलने लग्न केले आणि त्याला मायकेल ज्युनिअर आणी पॅरीस अशी दोन मुले झाली.

संदर्भ: इन.विकीपेडिया

3. मायकेल जॅक्सनला थोड्या प्रमाणात टक्कल होते

मायकेलला तरूण वयापर्यंत डोक्यावर भरपूर केस होते परंतु १९८४ पासून त्याला कृत्रिम केसांचा विग घालावा लागला. कारण त्याला पडलेले टक्कल.  ही मायकेलच्या आयुष्यातील एक दूर्देवी घटना होती. पेप्सी कंपनीच्या एका जाहिरातीचे शूटींग करीत असताना स्टेजवरील आगीचा लोळ सोडणाऱ्या  मशीनमधील ज्वाळा अचानक भडकल्या आणि मायकेलचे केस मागील बाजूने जळू लागले. बेभान होवून डान्स करणाऱ्या मायकेलला ते समजलेच नाही. इतर सहकारी  धावत येवून आग विझण्यापूर्वी नुकसान होवून गेले होते. मायकेलला तद्नंतर विगच वापरायला लागला. मायकेलचे हे सन १९८४ सालचे गुपीत पुढची २५ वर्षे जगासमोर आणले गेले नाही. परंतु सन २००९ ला यू.एस. विकली या साप्ताहिकाने हा गौप्यस्फोट करणारा व्हिडीओच प्रसिध्द केला.

संदर्भ: यू.एस. विकली

4. मायकेलला प्लॅस्टिक सर्जरीबद्दल भयंकर ओढ होती

पेप्सीच्या अपघातानंतर मायकेलच्या जीवनात बऱ्याच दु:खदायक घटनांची मालिका सुरू झाली. डोक्यावरील ऑपरेशन्स नंतर मायकेलला पेन किलर गोळ्या घ्यायची सवय जडून गेली. हळू हळू स्वत:च्या चेहर्‍याबद्दल तो फारच संवेदनशील झाला. त्यामुळे त्याने  एकामागोमाग एक प्लॅस्टिक सर्जरी करून घेतल्या. हनुवटीवर पडणारी खळी, ओठांचा आकार, चेहऱ्याची ठेवण, कपाळाची उंची एक ना अनेक सर्जरींची मालिकाच मायकेलने सुरू केली. अगदी नाकाचा आकार बदलण्यापर्यंत त्याची मजल गेली.

मायकेलला जडलेला हा एक प्रकारचा मानसिक आजारच होता.

5. मायकेलचा चिंपाझी ‘बबल’

विचित्र वागायची मायकेलला जणू सवयच होती. ह्या फार मोठ्या कलाकाराने एकदा एक चिपांझीचे पिल्लू विकत आणले. या पिल्लाचे नामकरण ‘बबल’ म्हणून करून मायकेल सर्वत्र बबलला घेऊन फिरू लागला. त्याला स्वतंत्र बेड देणे, बाथरूमची सोय करणे इ. करत करत बबलला ‘मून वॉक’ करायला शिकवण्यापर्यंत बबलचे लाड झाले. परंतू बबल जेव्हा मोठा झाला तेव्हा हे चिंपाझीचे धूड स्वत:च्या मुलांना त्रास देईल म्हणून मायकेलने बबलला प्राणिसंग्रहालयाला भेट दिले.

संदर्भ: डेलीमेल.कॉम

601 total views, 5 views today